
Contents
- 1 शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळावर पुनर्नियुक्ती !
- 1.1 शिरुर चे शिवाजीराव आढळराव पाटील समर्थकांमधे त्यांच्या निवडीने उत्साहाचे वातावरण !
- 1.1.1 शिरुर,दि.24 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 शिरुर लोकसभेला प्रबळ दावेदार उमेदवार होते शिवाजीराव आढळराव पाटील….
- 1.1.3 गरिबांसाठी हक्काचे घर…..
- 1.1.4 शिरुरचे समर्थक शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबरोबर कायम….
- 1.1.5 शिरुर विधानसभा निवडणुक येत आहे. …
- 1.1.6 शिरुर लोकसभेतील सहा विधानसभा मतदार संघात दादांचा प्रभाव किती परिणाम करणार ?
- 1.1.7 About The Author
- 1.1 शिरुर चे शिवाजीराव आढळराव पाटील समर्थकांमधे त्यांच्या निवडीने उत्साहाचे वातावरण !
शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळावर पुनर्नियुक्ती !
शिरुर चे शिवाजीराव आढळराव पाटील समर्थकांमधे त्यांच्या निवडीने उत्साहाचे वातावरण !
शिरुर,दि.24 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळावर पुनर्नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शिरुरच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांमधे या निवडीने उत्साहाचे वातावरण संचारले आहे.शिरुर शहरातील श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खंद्या समर्थक नगरसेविका सौ.अंजली मयुर थोरात यांनी ‘सत्यशोधक न्युज’ शी बोलताना सांगितले आहे.
शिरुर लोकसभेला प्रबळ दावेदार उमेदवार होते शिवाजीराव आढळराव पाटील….
(शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शिरुरमधील समर्थक)
यासंदर्भात 23 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय काढला होता.त्यामधे 2024 मध्ये शिरूर लोकसभा जागेसाठी महाआघाडीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. ज्यांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे केली होती. पण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी राजीनामा दिला होता.कारण पुणे म्हाडाचे अध्यक्ष हे सरकारी लाभ असलेले पद होते.शिरुरचे माजी खासदार श्री.आढळराव पाटील यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुणे म्हाडाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यास तयार असल्याचे जाहीर केले.’शिरुर‘
गरिबांसाठी हक्काचे घर…..
या कामात पुर्ण क्षमतेने काम करण्याची संधी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा वाढवली आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून म्हाडाने ‘गरिबांसाठी हक्काचे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय, म्हाडाच्या पुणे प्रादेशिक मंडळासाठी धोरणात्मक काम करणे, कामाचे मूल्यमापन करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे, कामाचा दर्जा वाढवणे, जास्तीत जास्त नागरिकांसाठी घरबांधणीचा लाभ मिळवणे याला माझे प्राधान्य असेल.असेही शिवाजीराव आढळराव पाटील सांगितले आहे. प्रशासकीय कार्ये गतिमानपणे सुव्यवस्थित करण्यासाठी
देशाच्या पंतप्रधानांनी साकारलेली प्रधानमंत्री आवास योजना शिरूर लोकसभा मतदारसंघात कार्यान्वित होत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नियुक्तीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक जनतेमध्ये समाधान व्यक्त केली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत श्री.शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे प्रबळ दावेदार उमेदवार होते.ते दोन वेळा शिरुर लोकसभा मतदार संघातुन खासदार म्हणून निवडून गेले होते.त्यावेळी ते शिवसेनेत होते.त्यावेळी शिवसेनेत नंतर झालेल्या घडामोडी घडलेल्या नव्हत्या.मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेसच्या ( अजित पवार) चिन्हावर निवडणूक लढले होते.तरी ते महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार होते.
शिरुरचे समर्थक शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबरोबर कायम….

आज ते आणि शिरुर शहरातील त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत.यात नगरसेविका सौ. अंजली मयुर थोरात या प्रमुख मानल्या जाणार्या आहेत.विद्यमान खासदार हे शिरूर शहराकडे त्यावेळी फिरकले नाहीत.याबद्दल त्यांनी कडाडून टिका केली होती.शिरुर शहरातील शिवाजीराव आढळराव पाटील समर्थरक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार तसेच महाआघाडीतील घटक पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आढळराव यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार केला होता.मात्र श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुर लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला होता.डा.अमोल कोल्हे ,राष्ट्रवादी कांग्रेस अक्ष शरदचंद्र पवार हे निवडून आले आहेत.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ हे अनेक बाबतीत महत्वाचे कार्यालय आहे. राज्यात सरकार महायुतीचेच आहे.श्री.अजितदादा पवार हे सरकारमधे उपमुख्यमंत्री आहेत.श्री.आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे साहजिकच त्यांचे समर्थक काहिसे निराश झाले होते.पण या महत्वाच्या पदावर त्यांची फेरनिवड झाल्याने त्यांचे समर्थक व चाहते यांना दिलासा मिळाला आहे.
शिरुर विधानसभा निवडणुक येत आहे. …
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे.त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. श्री.शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत.त्यांच्यासाठी जोरदार लढाई होणार हे स्पष्ट आहे.श्री.शिवाजीराव आढळराव पाटील व त्यांच्या समर्थक कार्यकर्यांची भुमिकेला महत्वाचे स्थान आहे हे निश्चित !
विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुक यांमधे राजकिय गणिते व जुळवाजुळव वेगळी असते. मतदार व कार्यकर्ते आता पुर्वीपेक्षा राजकीयदृष्टया जास्त सजग आहेत.धोरणात्मक निर्णय घेतात. धोरण ठरवतात.नेता ठरवतात.अक्ष ठरवतात.झेंडा,चिन्ह ठरवतात.बदललेल्या राजकिय परिस्थितीशी जुळवून घेतात.कुठे काही गंभीरता ,हिंसा अशा मार्गांपासुन दुर राहून देश एका यादवीसम परिस्थितीतुन सुखरुप बाहेर आला.वास्तव मान्य केले. लवचिकपणा दाखवला.
शिरुर लोकसभेतील सहा विधानसभा मतदार संघात दादांचा प्रभाव किती परिणाम करणार ?
तसे बरेच भावनिक व स्फोटक घडामोडी घडल्या. प्रचंड मोठे कुणबी आरक्षण आंदोलन झाले.पण कायदा व सुव्यवस्था यांचे भान ठेवले गेले.लवचिक ,सामंजस्याचे दर्शन घडले.दोन समाजात कटुता संघर्ष दंगली घडवण्याची शक्यता होती. तिलाही लोकांनी भिक घातली नाही.तसे प्रयत्न माणुन पाडले.हा भारतीय जनतेचा ऐतिहासिक विजय आहे.कार्यकर्ते, समर्थरक व चाहते यांनी अभुतपूर्व संयमाचे व कायदा पालनाचे उदाहरण जगाला दाखवून दिले. समर्थक ,चाहते व कार्यकर्ते सर्वच पक्षांकडे असतात.ते मान्य केले.
एक मात्र शिरुर शहरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात पुन्हा एकदा रणधुमाळी शिरुरकरांना आगामी विधानसभा निवडणूकीत पहायला मिळणार !