काळुबाई मंदिर देखील चोरटे सोडीनात अशी स्थिती शिरुर तालुक्यात निर्माण झाली आहे.शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील काळुबाई मंदिरातुन चोरी झाली आहे.शिरुर आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावातुन चोरट्यांनी काळुबाई मंदिराचे कुलुप तोडुन साउंड सिस्टिम व सोन्याचे दागीने लंपास केले आहेत. शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
काळुबाई मंदिरातुन चोरी ! शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील घटना !
शिरुर , दिनांक 25 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
काळुबाई मंदिर देखील चोरटे सोडीनात अशी स्थिती शिरुर तालुक्यात निर्माण झाली आहे.शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील काळुबाई मंदिरातुन चोरी झाली आहे.शिरुर आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावातुन चोरट्यांनी काळुबाई मंदिराचे कुलुप तोडुन साउंड सिस्टिम व सोन्याचे दागीने लंपास केले आहेत. शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच’
“कथा सविंदणे गावची आणि तेथील शाळेची “
सविंदणे गाव धार्मिक प्रवृत्तीचे गाव आहे. इथली यात्रा शाकाहारी असते.देवही शाकाहारीच ! इथलं ग्रामदैवत भैरवनाथ आहे.हे जागृत देवस्थान आहे असे भाविक मानतात.भैरवनाथ मंदिरात सुपारी लावतात.सुपारी कौल देते असेही भाविक गावकरी मानतात.चोरी करुन चाललेला चोर वेशीबाहेर पडला तेव्हा तो आंधळा झाला.म्हणून परत गावात आला देवाची माफी मागितली. मग डोळस झाला.भैरवनाथ मंदिराला सोन्याचा कळस आहे.एकंदरीत देवभोळे लोक आजच्या काळात देखील आहेत.
गावात गैरकृत्य अपवादानेच घडलेली आहेत.चोर काही भौतिकवादी वैज्ञानिक नसतो.तो इतरांप्रमाणेच असतो.भितीने तो आंधळाच काय ! मरुही शकतो ! हार्ट अटॅकने ; घाबरुन !त्याभितीने शिंगणापूर प्रमाणे चोरी करण्याचे चोरांचे धाडस होत नाही. माणुस सगळ्यांच्या मागे लागेल ! पण देवाच्या नाही.देवाचा कोप झाला तर काहीच्या काही होवू शकते. तरी एक से एक विख्यात चोर,दरोडेखोरांनी नामवंत ठिकाणी दरोडे टाकल्याच्या कथा प्रचलित आहेत. वेळ,दिनांक, ठिकाण, व्यक्ती यांचे नाव सांगुन चैलेंज देउन दरोडे टाकल्याच्या कथा प्रचलित आहेत.
चोरट्याला ही जागृत देवस्थानाची भिती काळुबाई मंदीराला लागू होत नाही, असे वाटले असावे.म्हणुन त्याने ते ठिकाण निवडले असे मानायला जागाही आहे.घटना किरकोळ जरी असली, दोन तीन दिवसांत चोर सापडेलही ! पण चोरी झाली असेल तर ही गावच्या नागरिकाने केली असेल तर ते चांगले नाही.
सविंदणे गावातील एक शेतातील घर !
सविंदणे गावचा शैक्षणिक इतिहास पाहिला तर आश्चर्यच वाटेल ! तिथे सायन्सचे ज्युनिअर कॉलेज आहे.प्रसिद्ध माध्यमिक विद्यालय आहे.इथुन विद्यार्थी भारतात आणि भारताबाहेरही गेले आहे.इथला निकाल शंभर टक्केच लावण्याची परंपरा आहे.पालक नामांकित तालुक्याच्या ठिकाणच्या सायन्स ज्युनिअर कॉलेजला विद्यार्थी जवळच सविंदण्याच्या ज्युनिअर कॉलेजला पाठवतात.विद्यार्थी यशस्वी होतात. असा लौकीक या गावच्या शिक्षणाचा आहे.पंचक्रोशीतील पालक मुलांना इथे पाठवतात.इथे अजुन अगदी बारावीच्या विद्यार्थांनासुद्धा गैरवर्तन केले तर शिक्षक मारतात.पालक आक्षेप घेत नाही. गावात शिक्षकाला पाहीले की विद्यार्थी आदराने ते ठिकाण सोडतात.अशी पद्धत आता फार दुर्मिळ झाली आहे. असे शिक्षक दुर्मिळ व विद्यार्थी विद्यार्थिनीही दुर्मिळ झाले आहेत.
मी या शाळेचा माजी Topper विद्यार्थी आहे.याचा मला अभिमान आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ही शाळा आहेत.संस्थेतही सातत्याने प्रथम,द्वितीय,तृतीय स्थान मिळवणारे विद्यार्थी विद्यार्थिनी इथे दरवर्षी असतात.मी ही त्यातला एक होतो.ते अनुभव आज अंगावर शहारे आणतात !
काळुबाई मंदीर चोरीची हकिकत. …
सविंदणे गावचं शेती शिवार…
फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिकत अशी की दि. 10/07/2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता ते दिनांक 11/07/2024 रोजी सकाळी 7:00 वाजण्याच्या दरम्याण संविदणे ,तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे गावच्या हद्दीतील एका टेकडीवर श्री काळुबाई मंदीर आहे.या टेकडीवरील काळुबाई मंदीर येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने मंदीराच्या दरवाजाचे कुलुप कोणतरी कशाने तरी तोडले. मंदीरात प्रवेश केला.
मंदीरातील खाली वर्णन केल्याप्रमाणे वर्णनाचे साउंड सिस्टीम व सोन्याचे दागीणे चोरून नेले आहेत. म्हणुन अज्ञात चोरट्या विरुध्द शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे आहे :-
1) 20,000/- एक काळे साचे, 250 एच. पी. आहुजा कंपनीची साउंड सिस्टीम मशीन व त्यास असलेला एक काळ्या रंगाचा माईक.
2) 14,000/- दोन ग्रॅम वजनात सुरुवातीला केलेले सोन्याच्या दागीण्याचे मंगळसुत्र त्यास सोन्याच्या दागीण्यातील दोन वाट्या आहेत.ते काळ्या मन्यात गुंफलेले आहे. त्यात हळुहळू भावीकांनी वाहीलेल्या सोन्यात वाढ करण्यात आली आहे असे एकुण 34,000/- रुपये इतक्या किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
या चोरीचा दिवस व गुन्हा दाखल करण्याचा दिवस यामधे बराच अवधी निघुन का गेला आहे? याची माहिती घेतली असता कारण समजले !
काळुबाई मंदीर चोरीचा गुन्हा दाखल करण्यास विलंब का?
गुन्हा उशिरा दाखल झाला आहे. त्याचे कारण साउंड सिस्टीम कोणी नेली आहे याची फिर्यादी गावात चौकशी करत होते. पंरतु सदर चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेऊन तो मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री झाली. आज रोजी 25 जुलै 2024 ला फिर्यादी श्री.बाबाजी ज्ञानेश्वर नरवडे, वय- 38 वर्षे, धंदा -शेती, राहणार . संविदण , तालूका- शिरूर, जिल्हा यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनला गु.र.न 652/2024 असुन भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर श्री.सुनील उगले हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री.मोरे हे आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास शिरूर पोलीस करत आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com