गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा होणार उचित गौरव !
गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा उचित गौरव होणार आहे.
गडचिरोली येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.वृतपत्र विक्रेते यांचे कार्य सहसा कोणी विचारात घेत नाही. किंबहुना टवाळकीचा विषय केला जातो.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला गेलेला माध्यम Media हा आहे.तर मिडियाचा आधार वृतपत्र विक्रेते असतात.कधी रस्त्यावर ,कधी बसस्थानकात फिरुन,कधी सायकलवरुन घरोघरी जाउन वृत्तपत्र पोचवणारा वृतपत्र विक्रेता हा घटक किती महत्वपूर्ण कार्य करत असतो.याचा आपल्याला अंदाज येवु शकतो.
गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा होणार उचित गौरव !
गडचिरोली येथे होणार वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन !
शिरुर,दिनांक 28 जुलै : (श्री.प्रकाश करडे यांच्याकडुन )
गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा उचित गौरव होणार आहे.
गडचिरोली येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.वृतपत्र विक्रेते यांचे कार्य सहसा कोणी विचारात घेत नाही. किंबहुना टवाळकीचा विषय केला जातो.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला गेलेला माध्यम Media हा आहे.तर मिडियाचा आधार वृतपत्र विक्रेते असतात.कधी रस्त्यावर ,कधी बसस्थानकात फिरुन,कधी सायकलवरुन घरोघरी जाउन वृत्तपत्र पोचवणारा वृतपत्र विक्रेता हा घटक किती महत्वपूर्ण कार्य करत असतो.याचा आपल्याला अंदाज येवु शकतो.
वृतपत्र विक्रेता जीव धोक्यातही घालतो !…
कधीकधी वृतपत्र विक्रेता हा त्यातील काही वादग्रस्त मजकुरामुळे दुखावलेल्यांचे लक्ष ठरतो.कधी कोण काय बोलते.तर कधी कोण काय टोमणा मारतो.एक एक रुपयासाठी काय जीव काढतोस असे हिणवतात.तिन्ही रुतुत येईल त्रास उन,वारा,पाऊस यांची पर्वा न करता हा वृतपत्र विक्रेता फिरतो.क्वचितच त्याचा स्टेजवर सत्कार होतो.’गडचिरोली‘
वृतपत्र विक्रेते 26,27 जानेवारी 2025 ला येणार एकत्र. ..
गडचिरोली येथे येत्या 26 व 27 जानेवारी 2025 ला वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच संदर्भात आता पर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. वृतपत्र विक्रेता संघटनेच्या पुढील कामकजाची रुपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. बालाजी पवार साहेब यांनी नुकतीच गडचिरोली येथे भेट दिली आहे.
वृतपत्र विक्रेत्यांची संघटना…..
त्यावेळी त्यांच्या सोबत राज्य संघटनेचे विभागीय संघटन सचिव श्री. विनोद पन्नासे (चंद्रपुर), राज्य कार्यकारणी सदस्य श्री. चंद्रकांत घाटोळ (नांदेड) हे होते. गडचिरोलीच्या भेटी दरम्यान श्री. पवार साहेबांनी आता पर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती घेतली आहे. झालेल्या कामावर समाधान व्यक्त केले. तसेच पुढील कामासंदर्भात मार्गदर्शन केले. काही सुचना केल्या.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच”
” संघटन ही एकुणच जगण्याच्या संघर्षात आवश्यक बाब लोकशाहीत महत्वाची असते.संघशक्ती प्रभावीपणे कार्य व ध्येयधोरणे यांवर विचारविनीमय करुन निर्णय घेउ शकणारी एक कायदेशीर संस्था असते.अशा संस्थांची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे.अनेक असंघटित क्षेत्रे आहेत.त्यांची दखल घेतली जात नाही. परिणामी त्यांच्या समस्या सोडवण्याचा एक मार्ग बंद होतो.
किमान प्रत्येक क्षेत्रातील शिक्षित वर्गाने एकत्र येत विचार विनीमय करणे गरजेचे आहे. आजमितीला असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे.त्यांना कामगार कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत.त्यांचे अव्याहतपणे शोषण होत असते.कमी मजुरीत जास्त राबवून घेतले जाते.कामाचे तास,आवश्यक सुट्टी,रजा,महिला कामगाराना प्रसुतीकाळात सुविधांची उपलब्धता नसणे.अशा अनेक बाबतीत कोनतीही नोंद व व्यवस्थापन करण्यासाठी तत्पर नाही.कागदावर आहेत.पण प्रत्येकक्षात ते अंमलात येत नाही.”
यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी सुद्धा केली. कार्यक्रम स्थळ खुपच सुंदर असल्याचे ते म्हणाले आहेत.तसेच श्री.पन्नासे साहेब, श्री. घाटोळ साहेब यांनी सुद्धा अधिवेशनाच्या तयारी विषयी काही मार्गदर्शक सुचना केल्या.गडचिरोली शहरात प्रथमच एखादे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू. असे गडचिरोली संघटनेने म्हटले आहे.
वृतपत्र संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठकीला उपस्थिती. …..
आजच्या बैठकीला गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल बाळेकरमकर, सचिव श्री.लोमेश बांबाळे, कोषाध्यक्ष श्री. प्रशांत वाढई, सह सचिव श्री. मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख श्री. अंकुश बोबाटे, सदस्य श्री. राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, रविंद्र कांबळे, संदिप आकरे, देवेंद्र बारापात्रे, आदि सदस्य उपस्थित होते.
वृतपत्र विक्रेता उपेक्षितच…..
वृतपत्र विक्रेत्यांचे कार्य पाहता सरकारने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिने योजना तयार केली पाहिजे.अनेक बाबी करता येण्यासारख्या आहेत.पण हा घटक सरकारकडून नेहमी दुर्लक्षित राहतो.श्रम न करणार्यांचे स्वागत,मानसन्मान होतात.’ल डे सिपाही नाम हो सरदार का’ असे हे प्रकरण आहे.हीच रित आहे.ताजमहाल ज्यांनी आपल्या हातांनी बांधला त्या कारागीरांचे,मजुरांचे कधी नाव कुठे सापडत नाही.गडकिल्ले बांधणारे मजुर व कारागीर यांची नावे वाचायला मिळत नाहीत. कांस्टेबल फ्रंटला जातो.नाव अधिकार्यचे होते.सैनिक फ्रंटला जातो.नाव पंतप्रधानाचे होते.कामगार आपले श्रम लावून उत्पादन करतो.नाव उद्योगपतीचे होते.कार्यकर्ता मतदारांच्या घराघरात जाउन त्यांना मतदानासाठी घेउन येतो.नाव आमदाराचे होते.शिक्षक झटतात.निकाल शंभर टक्के लागतो.नाव संस्थेचे होते.असे कितीतरी !
वृतपत्र विक्रेत्यांचे संघटन आवश्यक. …
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या किती संघटना आहेत.ते माहित नाही. परंतू संघटितपणे काम करणे आवश्यक आहे. वारंवार आपल्या अडचणी,समस्या सरकार पर्यंत पोचल्या पाहिजेत.यासाठी लक्ष असणे गरजेचे आहे. वृत्तपत्र संघटना राज्यस्तरीय अधिवेशन 26 ,27 जानेवारीला राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोली येथे घेत आहे.त्याला महाराष्ट्रातील तमाम वृतपत्र विक्रेते आणि माध्यमांतील संबंधित लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या राज्यव्यापी अधिवेशनाला बराच अवधी उपलब्ध आहे. त्याकाळात वृतपत्र विक्रेत्यांना संघटित करण्याचे प्रयत्न सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे. गडचिरोली हे महाराष्ट्रात अगदी उत्तरेचे वरचे टोक आहे.हा जिल्हा बहुतांशी आदिवासी बहुल भाग असलेला आहे.दुर आहे.उर्वरित महाराष्ट्रापासुन दुर जरी असला तरी वृतपत्र विक्रेत्यांनी आपल्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. म्हणुन न चुकता आधी नियोजन करुन या अधिवेशनाला उपस्थित रहावे.वेळोवेळी आवश्यक त्या सुचना व माहिती कळवली जाईल.असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com