शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत उभे राहता येईना…..
शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी
कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत अंत्यविधीनतर प्रार्थनेसाठी उभे राहता येईना इतकी दुर्दशा झाली आहे. याबाबत शिरुर शहरातील ख्रिच्शन बांधवांनी शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.स्मिता काळे यांना निवेदन देऊन खंत व्यक्त करत याबाबती अडचण दुर करण्याची मागणी केली आहे.
शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत उभे राहता येईना…..
शिरुर मधील ख्रिश्चन बांधवांची खंत ! मुख्याधिकारी स्मिता काळे यांना निवेदन !
शिरुर,दि.2 ऑगस्ट : (कल्पना पुंडे मॅडम यांच्याकडुन )
शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी
कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत अंत्यविधीनतर प्रार्थनेसाठी उभे राहता येईना इतकी दुर्दशा झाली आहे. याबाबत शिरुर शहरातील ख्रिच्शन बांधवांनी शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.स्मिता काळे यांना निवेदन देऊन खंत व्यक्त करत याबाबती अडचण दुर करण्याची मागणी केली आहे.
शिरुर शहर ‘मिनी इंडिया’ !
शिरुर : एक सांस्कृतिक कार्यक्रम
शिरुर शहर मिनी इंडिया आहे.दक्षिणेतील राज्यांतुन कैकाडी,कामाठी,वगैरे येवुन राहिले आहेत.इतर कर्नाटक,आंध्रप्रदेश,केरळ,तामिळनाडूत,पश्चिम बंगाल,ओरिसा येथुन आले लोकही राहतात.व्यवसाय करतात.शिरुर वसताना पासुन मुख्य जुन्या नोंदींमधे मुस्लिम मोठ्या संख्येने इथे आले होते.घोड्याची नाळ बनवणारी एक मुस्लिम जमातीचा उल्लेख जुन्या कागदपत्रांमधे असल्याचे समजते.आज त्या जातीचे शिरुर शहरात कोणी नाही.असेही समजते.मुख्य लोक या ठिकाणी प्रारंभी मुस्लिम होते.या गावाला वेस नाही.याचा अर्थ हे नदीकाठचे ठिकाण म्हणुन लोक येत गेले.उत्तरेकडुन मारवाडी लोक आरंभी घोड्यांवर आले होते. असे जुने लोक सांगतात.या व्यवसाय प्रेमी लोकांनी इथे असणारी मुख्य पेठ वसवली.त्यातुन एक आंतरराष्टीय ख्यातीचे उद्योगपती या पेठेतुन निर्माण झाले.आज पंजाबी, बिहारी,छत्तीसगड,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान,हरियाणा इ.उत्तरेकडुन आलेल्या लोकांची स्वतःच्या मालकीची घरे व व्यवसाय आहेत.त्यांचे मराठी माणसापेक्षा असणारे वेगळेपण सहज दिसुन येते.काची ही उत्तर भारतातील एक मच्छीमारी व्यवसाय करणारी जमात ही जुनी रहिवासी आहे. त्यांचा तोच प्रमुख व्यवसाय ते आजही करतात.खास पैलवानकीची परंपरा असलेला उत्तरेकडील यादव किंवा गोपाल इथे मधून गोपाळ वस्ती निर्माण झाली.तसे दुर्मिळ असणारे मुस्लिम मदारी लोकाची एक वस्ती मदारी मोहल्ला इथे आहे. जवळ जवळ भारतातील प्रत्येक भागातील माणुस शिरुर शहरात आपल्याला पहायला मिळतो.तो ही त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह ! म्हणुन मी मिनी इंडिया असे म्हटले.’शिरुर‘
Dr.Nitin Pawar,Editor – satyashodhaknews.com
‘संपादकिय टच”
“जगातील प्रमुख तीन धर्म ख्रिच्शन, मुस्लिम व यहुदी हे अब्राहमीक परंपरेतील आहेत.अब्राहम हे त्यांचे एक मुळ पुरुष कामन common मानले जातात.हे बायबल च्या जुन्या करारा मधील एक महत्वाचा उल्लेख असलेले पुर्वज आहेत.या तिन्ही धर्मियांना अब्राहम हे पुजनीय आहेत.जुन्या करारातील उत्पत्ती प्रकरण तिन्ही धर्मियांना सारखे प्रमाण आहे.इस्लाम मधे नव्या व जुन्या करारातील बायबल मधील उल्लेख असलेल्या थोर पुर्वजांना प्रेषित मानले गेले आहे.येशु ख्रिस्त यांना देखील ! तरीही या तिन्ही धर्मियांचा इतिहास रक्तरंजीत राहिला आहे.आजही इस्रायल गाझा पट्टीतील युद्ध सुरू आहे.
यहुदींचे हिब्रू बायबल ही आहे.ते हिब्रू भाषेत आहे.बायबलही अनेक आहेत.जसे रामायणेही अनेक आहे.जैन रामायण, बौद्ध जातकातील दशरथ जातक,तमिळ रामायण वगैरे आहे.हे दिर्घकाव्य अत्यंत रमणीय आहे.बोध देणारे आहे.सुंदर अशा उपकथा आहेत.त्यामुळे दुरदुरपर्यंत ही कथा गेली.इंडोनेशियापर्यंत गेली.मानवी मनाला भावली.आजही तशीच आहे.
धर्म निर्माण झाले त्यावेळी आजची राष्ट्रव्यवस्था Nation नव्हती. म्हणुन बरेच गैरसमज आहेत.अमुक धर्म अमुक देशाचा आहे असे मानणे.हा एक गैरसमज आहे. धर्म एक तत्वज्ञान देतो.तत्वज्ञान सर्व मानवजातीसह ब्रह्मांडाविषयी व्याख्या करण्याचा प्रयत्न करते.म्हणुन एका धर्माचे लोक वेगवेगळ्या देशांत आढळतात.आधुनिक काळात सर्वत्र सर्व धर्मीय कमी अधिक संख्येने आढळतात.
मृतदेह दफन करणे किंवा दहन करणे हे त्या धर्मातील तत्वज्ञानावर अवलंबून असते. यहुदी, ख्रिच्शन, मुस्लिम या तिन्ही धर्मियांत मृतदेहांचे दफन केले जाते.शेवटी एक दिवस कयामत किंवा प्रलयाचा येतो.सर्व नष्ट होते.ईश्वर सर्व मृत व्यक्तींना जिवंत करतो.प्रत्येकाला त्याचे पापपुण्य दाखवले जाते.पापी लोकांना अनंत काळ नरकात यातना सोसण्याची शिक्षा केली जाते.तर पुण्य करणार्यांना स्वर्गात पाठवले जाते.
स्वर्गात जिथे अनंत काळ तारुण्य,सर्व फैसिलिटी, मद्याच्या नद्या,अप्सरा,गंधर्व,नृतक,कल्पवृक्ष, कामधेनु गाय इ.इ.अशा सर्वकाळ आनंदी असे जीवन असते.इ.इ.अशा कल्पना केल्या गेल्या आहेत. हिंदु धर्मात दफन न करता अग्नि दिला जातो. म्हणजे मृत देह हा नश्वर मानला आहे.आत्मा हा शरीर सोडतो.परमात्याला जावून मिळतो.म्हणजे अनंतात विलीन होतो.असे मानले जाते. म्हणुन तो मृत देह जाळला जातो.दफन केला जात नाही. अद्वेताचे हे तत्वज्ञान आहे.आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो “
शिरुर मधील ख्रिश्चन समाज दुर्लक्क्षितच…
याला येशु ख्रिस्त प्रेरित ख्रिश्चन धर्मिय अपवाद कसे असतील?ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या भारतातील धर्मप्रसाराचा एक काळ होत.यांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्ये केली.इतरही काही कारणांनी काही लोक येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनले.शिरुर शहरातील लाटेआळी भागात हा समुदाय राहतो.आडनावे अस्सल मराठी आहेत.हे विषेश ! बाकी डेव्हिड,थामस,रिचर्ड इ.नावे आहेत.पण आडनावे गायकवाड, जाधव वगैरे बहुदा पुर्वीच्या दलित जातींमधील आहेत.स्वरुपही तसेच पहायला मिळते. ‘कन्ह्वरर्टेड’ म्हणुन देखील त्यांना एक वेगळे विशेषण आज ही आहे.पुर्वी इथे चर्चही होता.त्याच्या जागेबाबत वाद असल्याचे समजते.संख्येने कमी अशा या समुहाचे शहरात राजकिय वजन कमी आहे. त्यामुळे म्हणा.किंवा हिंदुत्वाच्या जागरुकतेमुळे या मिशनरी लोकांचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे.
संविधानाने दिले एक व्यक्ती एक मुल्य…
पण संविधानाने सर्वांना एक व्यक्ती, एक मुल्य प्रदान केलेले आहे.संपुर्ण भारताची सामाजिक व धार्मिक व्यवस्था अशीच आहे.लोकशाही एक उदारमतवादी व्यवस्था असते.म्हणुन अल्पसंख्यांक समुहालाही मोकळेपणाने जगता यावे. म्हणुन विशेष अशा तरतुदी केल्या गेल्या आहेत. कोणावरची अन्याय होवु नये असा यामागचा उदात्त हेतु आहे.
धार्मिक कार्यक्रमासाठी जागा नाही. …
पण शिरुर शहरातील ख्रिश्चन बांधवांकडे दुर्लक्षच झाले अशी आजची त्यांची स्थिती आहे. गेल्या अनेक दशकांपासून शिरूर शहरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना त्यांचे संस्कृतीत आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण शिरूर शहरांमध्ये कुठेही जागेची तरतूद केलेली नाही.अशी खंत या समुहाला वाटते. त्याचबरोबर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग घेण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. एखादे सांस्कृतिक भवन देखील नाही.ही खूप शोकांतिका आहे.असे या समुहाला वाटते.
सुंदर दफनभूमी आज जर्जर अवस्थेत. ..
तसेच ख्रिश्चन दफनभूमी मध्ये धार्मिक परंपरेनुसार अंत्यविधीनंतर शेवटच्या प्रार्थनेसाठी कुठेही एकत्र थांबण्याची किंवा विधी करण्याची सोय केलेली नाही . ख्रिश्चन दफन भूमी जी रामलिंग रोडला आहे.अत्यंत सुंदर अशा समाध्या इथे आहेत.त्यावर मृत व्यक्तीची नावे कोरुन ठेवलेली आहेत.ख्रिश्चन धर्मात एक चांगली पद्धत आहे की मृत व्यक्तीची माहिती अशा दफन केलेल्या जागेवर असते.त्यात काही इंग्रज ख्रिश्चनही आहेत.पण अलिकडे या जागेत भरपूर मोठ्या प्रमाण मध्ये रानटी झाडांचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे . अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने आज 31जुलै रोजी शिरूर नगर परिषदेच्या सन्माननीय मुख्याधिकारी स्मिता काळे मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे. याच्यावर त्यांनी निर्णय घेऊन गैरसोयी दुर करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नेतृत्व नाही,राजकिय बार्गेनिंग पावर नाही…
प्रभावी असे नेतृत्व या समुहाकडे आज नाही.पुर्वी ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कडून मिळणारी मदत जवळ जवळ संपुष्टात आली आहे. हा समुह शांतताप्रिय आहे.काहीसा आत्ममग्न आहे.सार्वजनिक जिवनात काम करणार्या कार्यकर्यांची वाढला आहे. राजकिय दृष्ट्या बार्गेनिंग पावर नाही.अशा स्थितीत याकडे दुर्लक्ष झाले आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आताशिरुर नगरपालिका प्रशासन यावर काय कृती करते,याची हा समुह वाट पाहत आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com