
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर तालुक्यातुन ‘बेपत्ता’ होण्याच्या सलग घटना : आई,मुलगा रामलिंगमधुन तर महिला भाजी बाजार येथुन बेपत्ता ! तर तरडोबाची येथील संतोष पाचर्णे यांची अकाली एक्झिट !
- 1.1 शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
- 1.1.1 शिरुर,दि.5 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
- 1.1.2 शिरुर जवळील तरडोबाची वाडी येथील संतोष पाचर्णे यांचा अकाली मृत्यु. …..
- 1.1.3 मृत्यु दु:खदायक…
- 1.1.4 शिरुर पोलीस स्टेशनला नोंद……
- 1.1.5 ——- शिरुर जवळील रामलिंग रोड येथुन आई व मुलगा बेपत्ता?
- 1.1.6 नाव-
- 1.1.7 ——- शिरुर येथील भाजी बाजार येथुन महिला बेपत्ता. …
- 1.1.8 बेपत्ता व्यक्तीचे नाव व वर्णन :
- 1.1.9 शिरुर पोलिसांकडून तपास सुरू. …
- 1.1.10 About The Author
- 1.1 शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
शिरुर तालुक्यातुन ‘बेपत्ता’ होण्याच्या सलग घटना : आई,मुलगा रामलिंगमधुन तर महिला भाजी बाजार येथुन बेपत्ता ! तर तरडोबाची येथील संतोष पाचर्णे यांची अकाली एक्झिट !
शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
शिरुर,दि.5 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
शिरुर तालुक्यातुन ‘बेपत्ता’ होण्याच्या सलग घटना घडल्या आहेत.यात आई,मुलगा रामलिंगमधुन तर एक महिला भाजी बाजार येथुन बेपत्ता ! झाली आहे. तर तरडोबाची येथील संतोष पाचर्णे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली आहे. वरील घटनांचाशिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर जवळील तरडोबाची वाडी येथील संतोष पाचर्णे यांचा अकाली मृत्यु. …..

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 07/00 वाजण्याच्या सुमारास खबर देणार हर्षराज संतोष पार्णे, वय -23 वर्ष, व्यवसाय -दुधडेअरी, राहणार, तर्डोबाची वाडी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांचे वडील संतोष सखाराम पाचर्णे, वय -45 वर्ष, हे नेहमीप्रमाणे अहमदनगर येथे दुध आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दुध घेवुन आले.त्यांनी शिरूर येथील त्यांचे स्वतःच्या डेअरीवर दुध देवुन ते कारेगाव येथील त्यांचे डेअरीवर निघुन गेले.’शिरुर‘
मृत्यु दु:खदायक…
त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हर्षराज संतोष पाचर्णे, तर्डोबाचीवाडी व त्यांची आई कविता असे दोघे कारेगाव येथील त्यांच्या डेअरीवर गेले. त्यावेळेस त्यांचे वडील हे कारेगाव येथील डेअरीवर होते. तेव्हा हर्षरराज पाचर्णे तेथील काम आवरून व त्यांची आई पुन्हा शिरूरला निघाले. शिरूरला येत असताना हर्षराज पाचर्णे देणार यांचा मावसभाउ गौरव बो-हाडे यांच्या घरी बो-हाडे मळा येथे थांबले. नंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास ते व आई असे बो-हाडे मळा येथुन निघुन त्यांच्या घरी तरडोबाचीवाडी येथे आले. तेव्हा त्यांना त्यांचा घराचा दरवाजा बंद दिसला.त्यामुळे हर्षराज पाचर्णे यांनी दरवाजा लोटला . आतमधुन दरवाजाला कडी लावलेली होती असे त्यांनी जाणवले. तेव्हा त्यांनी दरवाजा वाजवुन आवाज दिला. परंतु आतमधुन कोणताही आवाज आला नाही. त्यामुळे खबर देणार व त्यांची आई यांनी खिडकी उघडुन आतमधे पाहीले.तेव्हा त्यांना त्यांचे वडील संतोष सखाराम पाचर्णे, वय- 45 वर्ष हे पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहायाने फाशी घेतलेले दिसले. तेव्हा त्यांनी आरडाओरड केला. त्यामुळे आजुबाजुचे लोक तेथे जमा झाले. सर्वांनी मिळून दरवाजा तोडुन संतोष सखाराम पाचर्णे, वय- 45 वर्ष , यांना खाली उतखुन घेतले. तत्काळ त्यांना श्रीगणेशा हॉस्पीटल,शिरुर येथे घेवुन आले . डॉक्टरांनी तपासुन 8:20 वाजता संतोष पाचर्णे हे मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर खबर देणार यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली.त्यानंतर मयत दाखल केले आहे.
शिरुर पोलीस स्टेशनला नोंद……
शिरूर पोलीस स्टेशनला मयत रजिष्टर नंबर 99/2024, बी. एन. एस. एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.शिरुर पोलिसांनी ही नोंद केली.दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. खबाले हे करत आहेत.पुढील तपास पोलिस नाईक मोरे हे करत आहे. प्रभारी अधिकारी,पोलिस निरिक्षक श्री.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे.
——-
शिरुर जवळील रामलिंग रोड येथुन आई व मुलगा बेपत्ता?

शिरुर पोलिसांनी दिलेल्या व फिर्यादीत नोंदवल्याप्रमाणे
हकीकत अशी की दिनांक 03/08/2024 रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास रीतिक सखाराम साळवे, वय- 21 वर्ष, धंदा- शिक्षण, राहणार- रामलिंग, तालुका,शिरूर, जिल्हा – पुणे यांची आई सुमन सखाराम साळवे ,वय- 44 वर्ष ,राहणार- रामलिंग, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे व भाउ जिवन सखाराम साळवे, वय- 18 वर्ष ,राहणार-रामलिंग, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे हे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेले आहेत. म्हणून बेपत्ता अशी नोंद दाखल केली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे नाव व वर्णन आईचे वर्णन पुढील प्रमाणेः
नाव-
1) सुमन सखाराम साळवे ,वय-44 वर्ष, राहणार, रामलिंग तालुका- शिरूर, जिल्हा पुणे, रंग काळा सावळा, चेहरा गोल, केस काळे लांबसडक, उंची 5 फुट , अंगात चुडीदार, पायात चप्पल, कानामध्ये सोन्याची रिंग, पायामध्ये पैजन व जोडवे, कपा ळावरती लाल रंगाची टिकली तसेच
भाउ
2) जिवन सखाराम साळवे, वय- 18 वर्ष, राहणार, रामलिंग ,तालुका-शिरूर, जिल्हा – पुणे , रंगाने काळा सावळा, चेहरा गोल, केस काळे व मध्यम उंची 5 फुट 5 इंच, नेसणीस काळ्या रंगाचा ट्रॅक पॅन्ट व फुलबाहयाचा शर्ट शिरूर पोलीस स्टेशनला मिसींग नंबर – 94/2024 अशी नोंद करण्यात आली आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत. तर पुढील तपास पोलिस नाईक श्री. शिंदे हे करत आहेत.प्रभारी अधिकारी श्री. जोतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन ,पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
——-
शिरुर येथील भाजी बाजार येथुन महिला बेपत्ता. …
आणखीन एका बेपत्ता होण्याच्या घटनेत पोलिस सुत्रांनी व शिरुर पोलिस स्टेशन मधील नोंदींनुसार हकीकत अशी की राजेंद्र नंकु शुक्ला ,वय- 41 वर्ष ,धंदा- वेल्डींग काम ,राहणार – मलठण रोड ,शिकापुर, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे मो.नं.9503836602. यांची पत्नी सौ. मनिषा राजेंद्र शुक्ला, वय-35 वर्षे, राहणार-शिक्रापुर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे ही शिरूर गावच्या हद्दीतुन भाजी मार्केट, शिरूर येथुन कोणास काही एक न सांगता निघुन गेली आहे. ती अद्याप पर्यंत घरी आलेली नाही. खबर देणार यांनी तिचा शिरूर परीसर व नातेवाईक यांचेकडे शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. म्हणून मिसिंग ,बेपत्ता अशी नोंद शिरूर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.शिरूर पोलीस स्टेशनला हा मिसींग नंबर 95/2024 असा नोंदवण्यात आला आहे.
बेपत्ता व्यक्तीचे नाव व वर्णन :
नावः मनिषा राजेंद्र शुक्ला, वय- 35 वर्षे ,राहणार, शिक्रापुर, तालुका – शिरूर, जिल्हा-पुणे, रंग काळा सावळा, चेहरा उभट, केस काळे लांबसडक, उंची 5 फुट , अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, कानामध्ये सोन्याची रिंग, गळ्यात सोन्याचे मंगळसुत्र, पायामध्ये पैंजन व जोडवे, कपाळावरती लाल रंगाची टिकली, मो नं. 9356593875 असे आहे .
शिरुर पोलिसांकडून तपास सुरू. …
पुढील तपास पोलिस हवालदार श्री उबाळे हे करत आहेत.
दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री.शिंदे हे आहेत.
प्रभारी अधिकारी,पोलिस निरिक्षक श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.