‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल’ प्रकरणात अनेक कुटप्रश्न ? न्याय न मिळाल्यास प्रशासनाला कळवून आत्मदहन करणार- सुमन साळवे!
'सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल' प्रकरणात अनेक 'कुटप्रश्न' ? निर्माण होत आहेत. या प्रकरणांमध्ये ' न्याय न मिळाल्यास प्रशासनाला कळवून आत्मदहन करणार' असे पिडीता सुमन साळवे यांनी आज (27 जुन) ला सांगितले आहे. 'सत्यशोधक न्युज' च्या टिम ला असुन माहिती मिळवुन 'दुध का दुध ! और पानी का पानी' करताना रोज नवीन माहिती मिळत असल्याने या प्रकरणामध्ये गुंतागुंत वाढणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान 'सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल' प्रकरणात कोनती 'बदनामी ' झाकण्याचा प्रयत्न कोण आणि का करत आहेत? ते लवकरच कळेल व शिरुर शहरातील इंग्लिश मीडियम शाळांमधील ,'अर्थ' का 'रण' (?) पुढे येणार असे दिसत आहे.'इतर 'काही' शाळांच्या महत्वाची माणसे ,पालक व 'एक' राजकीय पक्ष देखील या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असल्याचे समजते.
‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल’ प्रकरणात अनेक ‘कुटप्रश्न’ ? निर्माण होत आहेत. या प्रकरणांमध्ये ‘ न्याय न मिळाल्यास प्रशासनाला कळवून आत्मदहन करणार’ असे पिडीता सुमन साळवे यांनी आज (27 जुन) ला सांगितले आहे. ‘सत्यशोधक न्युज’ च्या टिम ला असुन माहिती मिळवुन ‘दुध का दुध ! और पानी का पानी’ करताना रोज नवीन माहिती मिळत असल्याने या प्रकरणामध्ये गुंतागुंत वाढणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान ‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल’ प्रकरणात कोनती ‘बदनामी ‘ झाकण्याचा प्रयत्न कोण आणि का करत आहेत? ते लवकरच कळेल व शिरुर शहरातील इंग्लिश मीडियम शाळांमधील ,’अर्थ’ का ‘रण’ (?) पुढे येणार असे दिसत आहे.’इतर ‘काही’ शाळांच्या महत्वाची माणसे ,पालक व ‘एक’ राजकीय पक्ष देखील या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असल्याचे समजते.
‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल’ प्रकरणात पक्षपातीपणा ?
‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल’ प्रकरणात सामान्य अर्थाने ‘पोलीस’ हा घटक सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आणि बेकायदेशीर असलेल्या गुन्ह्यापासून आणि इतर धोकादायक घटनांपासून नागरिकांचे सरंक्षण यासाठी संबंधित आहे. ही महत्वाची जबाबदारी पार पाडण्याचे काम करत असतो. एखाद्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात आणि प्रथेनुसार पोलीसच प्रथम साक्षीदार, पीडित आणि आरोपींच्या संपर्कात येतात.असे आम्ही मानतो.म्हणुन ‘निपक्षपाती ‘तपास अधिक महत्वाची बाब आहे. हे अधोरेखीत आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, पोलीस हे मुख्यतः आरोपीची ओळख पटवतात आणि गुन्हेगारी खटल्यामध्ये आरोपीचा अपराध सिद्ध करण्यासाठी फिर्यादीला मदत करतात.वेळ प्रसंगी मध्यस्थी करून ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनाने काही गोष्टी टाळणे व अधिक तपासात हयगय करणे इ.बाबी केल्याचे फिर्यादीच्या कडुन मिळालेल्या माहितीनुसार दिसत असल्याने शिरुर पोलिस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत .
अनेक कुट प्रश्न?
‘सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम ‘शाळेत कथीत ‘मधधुंद डान्स’ व डी जे सारखा मोठा आवाज कमी करण्यावरून वाद मिटता-मिटत नाही अशी परिस्थिती आहे. रोज या बाबतीत नागरिक,पालक,’केरळ कनेक्शन ‘ जागेचा वाद,शिक्षक शिक्षीकांच्या पदव्याबाबत ,करोडो रुपयांची उलाढाल,तालुक्यातील एका मोठ्या नेत्याची ,’शाळा’ प्रशासन देखील एकाच ‘व्यक्तीकडे’ असल्याने राजकीय वजन वापरुन पिडीतांवर दबाव टाकला जाणे,त्यांचे काहीच एकुण न घेता येरवडा जेलची भिती घालणे, ‘बाउंसर’ टाईप पी.ए.की बॉडीगार्ड की शिपाई की कर्मचारी की आणखी काही (?) व्यक्तीची ‘मसल पॉवर ‘ वापरणे, आधी ट्राफिक पोलिस असलेल्याचा या घटनेत ‘खास’ रोल ,एका तपास अधिकार्याची बदली, परस्परविरोधी माहिती सांगणे,नेमका वाढदिवसाचा दिवस कोनता होता ? आणि तो साजरा करण्यात आलेला दिवस, प्रारंभीची माहिती असलेला व्हिडीओ डिलीट करणे, फिर्यादी महिला असताना एकही महीला पोलिस न येणे,फिर्यादीच्या गाडीत पोलिस बसणे किंवा न बसणे,पोलिसाचा ड्रेस खाजगी की ड्युटीवरचा ? हे न आठवणे,पाल्य याच शाळेत शिकत असल्याने या दिवशी ”विशेष सहकार्य’ करणे,घटनास्थळी नेमके किती पोलिस उपस्थिती होते या संबंधीच्या माहितीत संदिग्धता, मोबाइल फोन बळजबरीने घेणे,पासवर्ड बळजबरीने घेणे, व्हिडीओ डिलीट करणे, सी सी टी व्ही अद्याप न तपासणे,केरळ मधुन शिक्षिका (?) आणणे,त्यांच्याकडुन ‘इतर’ काही ‘कामे’ (?) करवुन घेतली जाणे,इ.अनेक बाबतीत पिडीता सांगत असलेली माहिती,काही पालक,इतर यांवरुन नव-नवीन खुलासे समोर येण्याची व त्या दृष्टिने तपास करण्याची पिडीतेची मागणी व पिडीतेने समाजाला व महिलांना या लढ्यात (?) सहकार्य करण्याचे केलेले आवाहन पाहता पिडीतेची दिर्घकाळ न्यायासाठी लढण्याची तयारी पाहता हे प्रकरण साधे नाही,असे दिसते.
पिडीता व तिचा मुलगा भयभित स्थितीत मिसिंग?
पिडीता मधल्या काळात भितीमुळे ‘मिसिंग’ (?) असणे,त्याकाळात भयाण अवस्थेत राहणे,मानसिक संतुलन बिघडणे,पिडीतेचा मुलगा भयभित स्थितीत राहणे ही सगळी कठिण परिस्थिती पिडीतांना भोगावी लागणे हे सर्व गंभीर बाब आहे.
मोठ्या बजेटची शाळा म्हणुन?
मोठ्या बजेटची शाळा,मोठ्या लोकांची शाळा,म्हणुन फिर्यादीचे म्हणणे ऐकुनच न घेणे.मिटले आहे,मिटले आहे असे म्हणून वेळ मारुन नेणे,मद्यधुंद अवस्थेबाबत वैद्यकीय तपासणी करण्याचे टाळणे इ.बाबी केवळ शाळेचे नाव,प्रतिष्ठा, अहंकार, पैसा यांच्यासाठी दोन तीन महिने एका कुटुंबाला त्रास होणे.त्या कुटुंबातील पुरुष देखील त्रस्त व ग्रस्त होवुन ढसाढसा ओक्साबोक्शी रडणे आणि शेवटी पोलिस ठाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणे व पोलिसांनी तो रोखणे अशा सर्व गंभीर बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. एवढे झाल्यावर सुमन सखाराम साळवे यांची फिर्याद दाखल करणे हे निपक्षपाती वर्णनाचे म्हणावे असे आहे का?
15 आरोपींची नावे काय आहेत?
त्यानंतर देखील एकुण 17 पैकी दोन वगळता इतर १५ जणांची नावे पत्रकारांना उपलब्ध न करुन देणे,तपास अधिकारी मुंबईला जाणे.बदली होणे.दुसर्या अधिकार्याकडे तपास देणे. अदयाप एकाही आरोपीला ताब्यात न घेणे या बाबी समाधान कारक नसल्याचे नागरिक मत व्यक्त करत आहेत.’दाल मे कुछ काला है’ असेही शिरुर चे नागरिक म्हणत आहेत.
या प्रकरणामध्ये फिर्यादी सुमन सखाराम साळवे यांच्या कडून अनेक आरोप शिरूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व सेंट जोसेफ स्कूल मधील प्रशासन यांच्यावर करण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर सेंट जोसेफ शाळा प्रशासन फिर्यादी विरुद्ध प्रथम दर्शनी एकटवलेले दिसत असून शाळेवर झालेल्या आरोपांचे उत्तर प्रत्यारोप करून देताना दिसत आहेत.
‘सत्यशोधक न्यूज’ प्रतिनिधीशी बोलताना २० जून २०२४ रात्री १०:३० वा घडलेल्या घटनेबाबत दोन्ही बाजूकडून अनेक बाबींचा खुलासा झाला आहे.तो वरकरणी सहज सोपा वाटत असला तरी या प्रकरणात आणखीन काही ‘गुढ’ (?) आपल्या पोटामध्ये आणि घेऊन दूरवर पसरलेलं आहे का? त्याची व्याप्ती किती वाढेल ? हे आताच सांगणे कठीण काम आहे.
सत्यशोधक न्यूज ची टीम नॅन्सी पायस यांच्याशी चर्चा करताना !
सत्यशोधक न्यूज प्रतिनिधी व टीमशी बोलताना मुख्यध्यापक नॅन्सी पायस यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे. तो खालीलप्रमाणे आहे,
“सुमन साळवे यांच्यासह त्यांचा मुलगा अनाधिकाराने शाळेच्या आत आले व त्यांनी परवानगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करून शाळेत गोंधळ घातला. शिक्षकांच्या अंगावर धावून आले. शाळेतील शिक्षकाचा वाढदिवस साजरा करत असताना संगीत लावले होते. डीजे लावला नव्हता. आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झाला असून आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहोत.तक्रारीत काही तथ्य नसून विनाकारण शाळेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेल्या २५ वर्षा पासून शिक्षण क्षेत्रात आहे.माझ्या कडून अनेक वकील,प्रशासकीय अधिकारी,शिक्षक,घडले आहेत. समाज घडवण्याचे हे पवित्र काम करत असताना असे आरोप कसे कोणी करू शकतात. एका अश्या आरोपामुळे माझी कारकीर्द झाकाळली जाऊ शकत नाही.शाळा प्रशासन व माझ्या कारकीर्दीवर विश्वास असणाऱ्या पालक,सरळ-शांत असणाऱ्या शिरूरकर नागरिकांना आवाहन आहे की शाळे-बरोबर खंबीरपणे उभे रहा. सुमन साळवे यांचा पती व मुलगा यांनी केलेल्या खोट्या आरोपाविरुद्ध न्यायालयात त्यांचे विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहोत” —- नॅन्सी पायस, मुख्याध्यापिका, सेंट जोसेफ स्कूल, शिरूर.
सुमन व सखाराम साळवे, पिडीत
(फिर्यादी) सुमन सखाराम साळवे यांनी
‘ सत्यशोधक न्यूज’ प्रतिनिधीशी बोलताना आणि शाळा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यावर खालील प्रमाणे आरोप लावले आहेत. ‘२० जून २०२४ रोजी सेंट जोसेफ शाळेमधून कर्कश आवाज येत होता.माझा मुलगा अभ्यास करत होता. मी पाहायला गेले की कोण डी.जे. वाजवतेय ? शाळा दुपारी २:३० वाजता बंद मोरे. मग रात्री अप-रात्री डी जे कोण वाजवत आहे हे मी पहायला गेले. तर मला माहित नव्हते की शाळेत शिक्षक लोक पार्टी करताहेत. कोण दुसरेच म्हणून मी मोबाईल मध्ये शूटिंग काढत होते. मी प्रिन्सिपल मॅडमला दाखवेन,सांगेन की रात्री काहीजण पार्टी करतात,या उद्देशाने म्हणून ! पण त्या रात्री शाळेची प्रिन्सिपल, शाळेचे शिक्षक,शिक्षिका सगळेच ड्रिंक/मद्यप्राशन करून, मोठ्याने संगीत लावून लज्जा उत्पन्न होईल अशा अवस्थेमध्ये डान्स करत होते. त्यांनी माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतला.
पोलिसांनी आम्हाला समजून सांगण्याऐवजी अरे-रावेची भाषा केली. आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन आले. माझा मोबाईल पोलिसांनी घेऊन त्यामधील व्हिडीओ डिलीट केले. व आमच्यावरच गुन्हा नोंदवला त्यामुळे मी व माझे कुटुंबीय डिप्रेशन मध्ये गेलो. म्हणून मी माझ्या न्याय हक्कासाठी नाईलाजने अंगावरवर पेट्रोल ओतुश आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला.शिरूर व पंचक्रोशीतील संवेदनशील सामाजिक संघटना, महिला, न्याय- हक्क समिती यांना माझी विनंती आहे की मी एक सर्वसामान्य घरातील महिला असून आज माझ्यावर अन्याय होऊन सुद्धा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तरी आपण माझ्या न्याय- हक्कासाठी चाललेल्या लढाईमध्ये सहभागी होऊन अन्याय विरुद्ध वाचा फोडावी.
अन्यथा अश्या होणाऱ्या अन्याय विरुद्ध कोणीही अबला नारी उभी राहणार नाही. गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकांचा आवाज असाच दाबला जाईल. माझ्या पाठीशी उभे रहा. अशी आपणास हात जोडून विनंती करत आहे.”
‘सत्यशोधक’ प्रतिनिधीशी बोलताना एका पोलीस कर्मचार्याने नाव न छापायच्या अटीवर दिलेली प्रतिक्रिया, ‘सेंट जोसेफ’ प्रशासन व फिर्यादी यांच्या गोंधळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला आणि तो आमच्याच अंगलट आला’ !
शिक्षण क्षेत्रातील लाबींग !
या प्रकरणी विशेष बाब म्हणजे आता शिक्षण क्षेत्रातून एक लॉबी कार्यान्वित झाली असून शिरूर शहरातील एका पक्षाला बरोबर घेऊन “सेंट जोसेफ” शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलन करणार असल्याची दबक्या आवाजात शिरूर शहर पंचक्रोशी मध्ये चर्चा चालू आहे.शाळेवरती कायमच मेहरबानीचा हात ठेवणाऱ्या नेते मंडळींचा येणाऱ्या काळात पर्दा पाश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
येणाऱ्या काळात आमदार,खासदार, पोलीस प्रशासन,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर काय भूमिका घेतात यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com