
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण तर शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला !
- 1.1 शिरुर तालुक्यात बस चालक व वाहकास मारहाण ! बाबुरावनगर मधुन 60 हजार रुपये किंमतीची होंडा मोटारची चोरी !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 30 ऑगस्ट: (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
- 1.1.2 शिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण —
- 1.1.3 शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल. ..
- 1.1.4 —–
- 1.1.5 दुसर्या घटनेत. ..
- 1.1.6 शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला !
- 1.1.7 शिरुर मधील बाबुरावनगर येथुन हा गेलेला माल पुढील प्रमाणे आहे—-
- 1.1.8 गुन्हा दाखल. ..
- 1.1.9 About The Author
- 1.1 शिरुर तालुक्यात बस चालक व वाहकास मारहाण ! बाबुरावनगर मधुन 60 हजार रुपये किंमतीची होंडा मोटारची चोरी !
शिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण तर शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला !
शिरुर तालुक्यात बस चालक व वाहकास मारहाण ! बाबुरावनगर मधुन 60 हजार रुपये किंमतीची होंडा मोटारची चोरी !
शिरुर,दिनांक 30 ऑगस्ट: (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
शिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण करण्यात आली आहे तर शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला गेली आहे. दोन्ही फिर्यादी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.शिरुर मधील बाबुरावनगर मधुन ही 60 हजार रुपये किंमतीची होंडा मोटार सायकल चोरीला गेली आहे.
शिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण —
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 29/08/2024 रोजी 14 : 10 ते 14/30 वागण्याच्या दरम्यान शिरुर तालुक्यातील जांबुत गावच्या हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस.टी. बस थांब्यावर बस थांबवली गेली.त्यानंतर या एस.टी. बस नं. एम एच 14 बी.टी. 4279 यामधुन प्रवाशी उतरत असताना राहुल सोनवणे याने त्याचे ताब्यातील डम्पर बसच्या समोर उभा केला. फिर्यादी श्री. कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर, बॅच नं. 45154, वय-52 वर्षे ,व्यवसाय-नोकरी,राहणार- टाकळी हाजी, शिनगरवाडी,तालुका- शिरुर,जिल्हा -पुणे यांनी राहुल सोनवणे यास सदरचा ,’ डंम्पर बाजुला घे’ असे म्हणाले. त्यावेळी त्याने त्यांना तसेच वाहक शांताराम मारूती रासकर यांना शिवीगाळ दमदाटी केली. हाताने मारहाण करून, ढकलुन दिले. फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात (बस चालक/बस वाहक) अडथळा निर्माण केला .
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल. ..
म्हणुन इसम राहुल सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही), राहणार -जांबुत, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे याच्या विरूध्द रितसर तक्रार शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.’शिरूर‘ शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुर नं 731/2024 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कलम 132,121(1),352,351(2) प्रमाणे आरोपी राहुल सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही), राहणार – जांबुत, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री.खेडकर हे करत आहेत. दाखल अमंलदार पोलिस नाईक गवळी हे आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. जोतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
—–

दुसर्या घटनेत. ..
शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानुसार
हकीकत अशी की दिनांक 27/08/2024 रोजी मध्यरात्री 1.00 वाजण्याच्या ते सकाळी 7.00 वाजण्याच्या दरम्यान कुंजबन अपार्टमेंट ,बाबुराव नगर, शिरूर ,तालुका- शिरूर ,जिल्हा-पुणे येथील राहत असलेल्या बिल्डीग पार्कीग येथे फिर्यादी श्री. महेश रामपाल जांगीड ,वय -33 वर्ष, धंदा- फर्नीचर काम, राहणार – कुंजबन अर्पा ,बाबुराव नगर ,शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे यांनी मोटार सायकल येथे लाँक करून पार्क केली होती.त्यानंतर या ठिकाणवरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीची खालील वर्णनाची मोटार सायकल त्यांच्या समंतीशिवाय मुददाम लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरीता चोरुन नेली आहे.
शिरुर मधील बाबुरावनगर येथुन हा गेलेला माल पुढील प्रमाणे आहे—-
1) 60,000 /- रूपये किंमतीची होंडा कंपनिची शाईन मोटार सायकल,काळ्या रंगाची गाडी नंबर- एम एच 12 टी.ई 2813 तिचा चेसीस नंबर me4jc856mld089653 इंजीन नं jc85ed0258947 असा आहे.
गुन्हा दाखल. ..
म्हणून त्या अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गु.र. नं. 730/2024 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार श्री.आगलावे हे करत आहे. तर दाखल पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री. ज्योतीराम गुंजवटे , पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.