Contents 1. शिरुर तालुक्यातील निमोणे येथे दोन वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यु !1.1. शिरुर पोलिसांनी 7 म्हशींसह 4 जणांना बेड्या ठोकल्या!1.1.1. शिरुर जवळील न्हावरा येथे कारवाई ! म्हशींची किंमत 5 लाख 70 हजार रुपये !1.1.2. शिरुर,दिनांक 30ऑगस्ट: (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)1.1.3. शिरुर जवळील न्हावरा येथे जनावराची बेकायदा वाहतुक !1.1.4. यावेळी सापडलेला माल पुढील प्रमाणे —1.1.5. शिरुर तालुक्यातील निमोणे येथे दोन वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यु!1.1.6. About The Author1.1.6.1. Dr.Nitin Pawarशिरुर तालुक्यातील निमोणे येथे दोन वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यु !शिरुर पोलिसांनी 7 म्हशींसह 4 जणांना बेड्या ठोकल्या!शिरुर जवळील न्हावरा येथे कारवाई ! म्हशींची किंमत 5 लाख 70 हजार रुपये !शिरुर,दिनांक 30ऑगस्ट: (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)शिरुर पोलिसांनी 7 म्हशींसह 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर जवळील न्हावरा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. म्हशींची किंमत 5 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. या म्हशींची बेकायदा वाहतुक करण्यात येत असल्याचा गुन्हा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.तर शिरुर तालुक्यातील निमोणे येथे दोन वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली आहे.शिरुर जवळील न्हावरा येथे जनावराची बेकायदा वाहतुक !शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 29/08/2024 रोजी रात्री 2:45 वाजता न्हावरा, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत न्हावरा चौकात टेम्पो क एम.एच 04 जी.सी. 1506 यामधुन इसम1) सलीम आजीज पठाण, राहणार – राहु, तालुका- दौंड ,जिल्हा – पुणे यांच्या सांगण्यावरून 2) संजय विश्वनाथ कोथबिरे, वय- 48 वर्षे, 3) सलिम मुस्ताक शेख, वय- 26 वर्षे, दोघे राहणार – जेउर बायजाबाई, तालुका-जिल्हा अहमदनगर 4) तालीम कासीम शेख, राहणार – जेउर बायजाबाई, (कुरेशी मोहल्ला) तालुका-जिल्हा- अहमदनगर यांनी सदर टेम्पोमधुन 7 काळ्या रंगाच्या म्हशी क्रुरपणे कोबल्या होत्या. त्यांना कोणत्याही प्रकाचा चारापाणी व्यवस्था न करता वाहतुक करण्यात येत होती. तसेच जनावरांच्या वाहतुकी पुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी केली नव्हती. तसेच वाहतुकी करीता घेवुन चालले होते. म्हणुन फिर्यादी राजाराम शेटीबा गायकवाड, पोलीस शिपाई, नेमणुक- शिरूर पोलीस स्टेशन यांनी वरील 4 इसमानविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे.’शिरुर‘यावेळी सापडलेला माल पुढील प्रमाणे —1.70,000/- रूपये किंमतीच्या काळ्या रंगाच्या म्हशी प्रत्येकी किंमत 10,000 प्रमाणे किमतीच्या 7 म्हशी. 2) 5,00000/- रूपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो त्याचा आर.टी.ओ. क एम. एच 04 जी.सी. 1506 असा नंबर आहे.किंमत अंदाजे – 5,70,000 रुपये इतकी आहे.शिरूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपींवर गु.र. नं. 729/2024 आहे.तसेच प्राण्याना कुरतेने वागणुक 1960क, 11(1) ग, ड, ज प्रमाणे प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार ,श्री.जाधव हे करत आहेत. तर दाखल करणारे अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी आहेत. प्रभारी अधिकारी श्री. जोतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत. ————– शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत. …शिरुर तालुक्यातील निमोणे येथे दोन वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यु!शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्या नुसार हकीकत अशी की दिनांक 29/08/2024 रोजी 6.30 वाजण्याच्या सुमारास खबर देणारे विमलकुमार बहादुर राम, वय- 27 वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार – काळेवस्ती रोड, निमोणे ,तालुका-शिरूर ,जिल्हा – पुणे ,मुळ गाव- राहणार -दिघली हसनपुर, वार्ड -33 ,किसनगंज, बिहार हे व त्यांची पत्नी, मुलगी असे घरी असताना मुलगी जान्हवी कुमारी ही घराच्या बाहेरील वंराडयामध्ये मांजरा सेाबत खेळत होती.अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आला. ते व पत्नी मुलीस पहायला गेले.त्यावेळी तेथे सापाने मुलीला डाव्या पायाला चावा करताना पाहिले. खबर देणार यांनी मुलीला जवळ घेतले असता साप हा जवळ असलेल्या बिळामध्ये जाताना दिसला. त्यानंतर त्यांनी मालक संभाजी ढगे यांना फोन करून सांगितले. नंतर त्यांचे मालक आले व त्यांनी त्याच्या गाडी मधुन मुलीस उपचार कामी ग्रामीण हास्पीटल शिरूर येथे आणले. तेथील डॉक्टरांनी मुलगी जान्हवी कुमारी विमलकुमार राम ,वय-2 वर्षे, राहणार – दिघली हसनपुर, वार्ड -33 ,किसनगंज, बिहार ही उपचारापुर्वी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मृत्यु पावली होती.असे डॉक्टरांनी सांगितले. वगेरे मजकुरावरून मयत म्हणुन नोंद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.शिरूर पोलीस स्टेशनला अ.म.रजि नं 114/2024 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास अंमलदार पोलीस नाईक विनोद मोरे हे प्रभारी अधिकारी श्री.जोतीराम गुंजवटे , पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर बसच्या चालक व वाहकास टाकळी हाजी येथे मारहाण तर शिरुर मधील बाबुरावनगर येथुन होंडा मोटार सायकल चोरीला ! शिरुर बायपास जवळ 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला ! तर रांजणगाव एम आई डी सी जवळ ‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले ! राजणगाव एम आई डी सी मधे ‘खंडणी ‘ वसुल करण्याचा प्रकार ?