
महिला असुरक्षीत !
Contents
- 1 शिरुर बायपास जवळ 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला ! तर रांजणगाव एम आई डी सी जवळ ‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले !
- 1.1 राजणगाव एम आई डी सी मधे ‘खंडणी ‘ वसुल करण्याचा प्रकार ?
- 1.1.1 शिरुर मधील 19 वर्षीय तरुणी घर सोडुन गेली. ..
- 1.1.2 शिरुर, दिनांक 31 आगस्ट : ( श्री.प्रकाश करडे यांच्याकडुन )
- 1.1.3 तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला. …
- 1.1.4 चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे –
- 1.1.5 ————- शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत. …
- 1.1.6 रांजणगाव एम आई डी सी जवळ ‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले !
- 1.1.7 तिसर्या घटनेत. …
- 1.1.8 19 वर्षीय तरुणी घर सोडुन गेली !
- 1.1.9 तरुणीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे —-
- 1.1.10 About The Author
- 1.1 राजणगाव एम आई डी सी मधे ‘खंडणी ‘ वसुल करण्याचा प्रकार ?
शिरुर बायपास जवळ 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला ! तर रांजणगाव एम आई डी सी जवळ ‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले !
राजणगाव एम आई डी सी मधे ‘खंडणी ‘ वसुल करण्याचा प्रकार ?
शिरुर मधील 19 वर्षीय तरुणी घर सोडुन गेली. ..
शिरुर, दिनांक 31 आगस्ट : ( श्री.प्रकाश करडे यांच्याकडुन )

शिरुर बायपास जवळ 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. तर रांजणगाव एम आई डी सी जवळ ‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले गेले आहेत. हा राजणगाव एम आई डी सी मधे ‘खंडणी ‘ वसुल करण्याचा प्रकार आहे का?असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच शिरुर मधील 19 वर्षीय तरुणी घर सोडुन गेली असल्याची घटना घडली आहे.
तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला. …

शिरुर पोलिस स्टेशन मधील नोंद केल्यानुसार हकिगत अशी की दिनांक 29/08/2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या ते 13:00 वाजण्याच्या दरम्यान एस. टी. बसच्या तुळापुर फाटा ते शिरूर बायपास रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ प्रवासादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी नानासाहेब उर्फ भाउसाहेब शिवराम ज-हाड, वय- 60 वर्षे ,धंदा -शेती, राहणार – दसरेनगर, रूम नं. 11 ,वसंत टेकड़ी ,पाईपलाईन रोड, अहमदनगर यांच्या
पत्नीचे खालील वर्णनाचे ३,००,०००/- रूपये किंमतीचे पर्समध्ये ठेवलेले दागीने हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.म्हणुन त्या अज्ञात चोरटयाविरूध्द शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’शिरुर‘
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे –
1) 1,50,000/-रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याच्या दागीण्यातील मोहनमाळ गोल मन्यात गुंफलेली जु.वा.कि.अं.
2) 1,50,000/- रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याच्या दागीण्यातील गंठन चैनमध्ये त्यास पेंडल असलेले जु. वा. किं.असा
3,00,000/- रुपये एकुण किंमत.
अज्ञात चोरटयाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन गु. २.नं अ 734/2824 असा आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार जी एस चव्हाण हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी जोतिराम गुजवटे,पोलिस निरिक्षक,शिरूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
————-
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत. …
रांजणगाव एम आई डी सी जवळ
‘माथाडीची पावती’ म्हणुन पैसे वसुल केले !
राजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये नोंद केल्यानुसार
हकिगत अशी की 29/8/2024 रोजी संध्याकाळी 18:49 वाजता रांजणगाव एम आई डी सी, टाटा स्टील कंपनी जवळ ,तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे या ठिकाणी यातील फिर्यादी फिर्यादी जितेंद्र श्रीराम कुशवाह, वय -34 वर्ष ,व्यवसाय – ड्रायव्हर, राहणार- पंखडकोला थाना, तरकुआ, जी.देवरिया, राज्य- उत्तर प्रदेश हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर नंबर एम एच 14 ए क्यू 31 99 हा रांजणगाव एमआयडीसी मधील टाटा स्टील कंपनीत कॉइल खाली करण्यासाठी मेन गेट जवळ येऊन थांबले असताना दोन अनोळखी ईसम तेथे आले. त्यांनी फिर्यादीस ‘ माथाडीची पावती फाडायला लागेल, टाटा स्टील कंपनीच्या गेटमध्ये तुझी गाडी जाऊ देणार नाही. जर तू आठशे रुपयांची पावती फाडली नाहीस तर तुझ्या गाडीच्या काचा, टायर आम्ही फोडू’ अशी धमकी देऊन फिर्यादी कडून 600 रुपये तसेच इतर दोन ट्रेलर यांच्याकडून प्रत्येकी आठशे रुपये असे एकूण 2200 रुपये घेऊन माथाडीची बोगस पावती देऊन फसवणूक केली.
तसेच सदरच्या दोन्ही इसमा कडुन दि. 28/8/2024 रोजी पुन्हा फिर्यादीस ८०० रुपयाची पावती फाडण्याबाबत धमकी देऊन रात्री बारा वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या ट्रेलरची हवा सोडून नुकसान केले.
या इसमांवर रांजणगाव एम आई डी सी पोलिस स्टेशनला गु.र.न.अ 508/2024 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता . कलम 318(4).352(3).324(4).3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार सहायक सब इन्स्पेक्टर श्री. कर्डीले हे आहेत. पुढील तपास अंमलदार सहायक सब इन्स्पेक्टर श्री.शिंदे हे करत आहेत.
तिसर्या घटनेत. …
19 वर्षीय तरुणी घर सोडुन गेली !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 29/8/2024 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गौरी प्रीतम जाधव, वय- 19 वर्ष ,राहणार, ओम रुद्र रेसिडेन्सी ,रामलिंग रोड ,शिरूर, जिल्हा- पुणे ही घरातून कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेलेली आहे.
ही माहिती प्रीतम दिलीप जाधव, वय- 26 वर्ष ,व्यवसाय- नोकरी, राहणार – ओम रुद्रा रेसिडेन्सी, रामलिंग रोडवर, शिरूर,तालुका – शिरुर, जिल्हा – पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.
तरुणीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे —-
उंची 5 फूट, रंग काळा सावळा, नाक सरळ, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, केस काळे व लांब, हातात हिरव्या रंगाचे काचेच्या बांगड्या, पायात जांभळ्या रंगाची चप्पल, सोबत सॅमसंग कंपनीचा नोट -7 मोबाईल, त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम त्याचा नंबर- 84 21 97 99 10 असा आहे. तर गळ्यात मनी मंगळसूत्र आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला मिसींग म्हणुन नोंद
मां. मि.र. न.101/2024 अशी करण्यात आली आहे.
दाखल अंमलदार सहायक सब इन्स्पेक्टर श्री. चव्हाण हे आहेत.
पुढील तपास अंमलदार पी.एन. शिंदे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री.जोतीराम गुंजवटे,पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहेत.