
Contents
- 1 शिरुर पोलिसांनी आणखीन 62 वाहन चालकांवर कारवाई : 70 हजार दंड वसुल (व्हिडिओसह पहा)
- 1.1 शिरूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई !
- 1.1.1 शिरुर, दिनांक -10 सप्टेंबर :
- 1.1.2 शिरुर पोलिसांनी आणखीन 62 वाहन चालकांवर कारवाई : 70 हजार दंड वसुल (व्हिडिओसह पहा)
- 1.1.3 शिरुर जिओबायोलाजीकल स्थिती आणि चीनचे उदाहरण!
- 1.1.4 भारतात नियम,कायदे अंमलबजावणी, ‘ढिल्ली’ !
- 1.1.5 शिरुर च नवनियुक्त पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे ….
- 1.1.6 शिरुर पोलिसांचे पथक कारवाईत….
- 1.1.7 पालकांना पोलिस निरिक्षकांचे आवाहन….
- 1.1.8 अल्पवयीन मुले मुली बेभान आणि पालकांचा,’लाड’…..
- 1.1.9 About The Author
- 1.1 शिरूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई !
शिरुर पोलिसांनी आणखीन 62 वाहन चालकांवर कारवाई : 70 हजार दंड वसुल (व्हिडिओसह पहा)
शिरूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई !
शिरुर, दिनांक -10 सप्टेंबर :
(डॉ.नितीन पवार संपादक यांच्याकडून )
शिरुर पोलिसांचे ,’आपरेशन रोड रोमियो’ ‘संपन्न’ झाले असुन 44 बेकायदा वाहन चालकांकडून शिरुरमधे 40,500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करत जोरदार ‘एन्ट्री’ झाली आहे. श्री.संदेश केंजळे यांनी शहरातील पालकांना चांगलीच तंबी देत आपल्या ‘लाडक्या’ पण 18 वर्षे वयाखालील अल्पवयीन मुला मुलींना मोटर सायकल किंवा इतर वाहने चालविण्यास देउ नयेत असे आवाहन केले आहे. आणि तसे झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे. एकावेळेस 44 च्या संख्येने व 44500 रुपये दंड वसुल करण्यात आल्याने हे ‘लाडके’ कन्या व पुत्र यांची आज आज बी जे कार्नर वर एकच धांदल उडाली !
शिरुर पोलिसांनी आणखीन 62 वाहन चालकांवर कारवाई : 70 हजार दंड वसुल (व्हिडिओसह पहा)
शिरूर पोलीस स्टेशन कडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर *कारवाई अधिक तीव्र*
आज रोजी शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओ यांच्यावर अधिक तीव्र कारवाई करण्यात आली असून *एकूण 62 वाहन चालकांवर कारवाई करत 70,000 /- रुपये दंड* आकारण्यात आला आहे.तसेच मा. प्रशांत ढोले सो उप विभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर व मा. संदेश केंजळे सो पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांनी अल्पवयीन वाहन चालकांना भरधाव वेगात वाहन चालवल्याने कशाप्रकारे अपघात होतात व त्या अपघाताचे परिणाम आपल्या कुटुंबावर कसे होतात, वाहन चालवताना लायसन असणे का गरजेचे आहे. इतर आवश्यक बाबी बाबत मार्गदर्शन करत.
विना लायसन वाहन चालवताना मिळून आल्यास पालकांवर कारवाई केली जाईल या बाबत समज देण्यात आली आहे.
शिरुर जिओबायोलाजीकल स्थिती आणि चीनचे उदाहरण!

शिरुर शहर फुगत चालले आहे. म्हणजे वाढत चालले आहे. आकारमानाबरोबरच लोकसंखेची घनता विलक्षण वाढत असल्याचे स्पष्ट जाणवत असते.त्यात सध्या ‘तरुण’ आहे.म्हणजे 30 च्या आत भारतातील 70 टक्के जनता आहे.ही म्हातारी झाल्यावर भारतही म्हातारा होईल.कारण एवढीच टक्केवारी म्हातार्यांची होईल.आता चीनची अवस्था झाली आहे तशी.शिवाय तिथे 1950 नंतर हम दो हमारा एक ‘च’ कठोरपणे राबवले गेले.लोकसंखा नियंत्रणात आली.पण अशी स्थिती निर्माण झाली.त्या एका मुलाला पत्नी,एक मुल,आई,वडिल,आजी,आजोबा अशी 7 माणसे सांभाळावी लागतात.आणि बायको देखील तिच्या कुटुंबात एकुलती असते.ती नोकरीवाली नसेल तर तिच्याकडची एकुण 5 अशी 12 माणसे सांभाळावी लागतात.म्हणुन गलवान घाटीत क्षि जिन पियांग यांनी भारतीय सैनिकांवर attach करण्याची order दिली.तेव्हा तेथील कमांडरने ,’बेवकुफ हो क्या ! 12 लोग पिछे हे घरमें’ असे थेट सांगुन नकार दिला होता म्हणे ! शिवाय एकुलती एक म्हणुन सगळीच पोरं भयंकर लाडकी ! आता बोला !खरचं चीनचे सैनिक लढाई करतील का?असो तो आपला विषय नाही चीनचा आहे.चीन पाहुन घेइल !’शिरुर‘
भारतात नियम,कायदे अंमलबजावणी, ‘ढिल्ली’ !

इथे भारतात लिंगपरिक्षण करुन बहुतेकांनी एक मुलगा एक मुलगी ठेवलेली आहेत.नवे आर्थिक धोरण स्विकारल्यानंतर भारतात एक मोठा मध्यम वर्ग निर्माण झाला. चीनचा कायदा कडक असतो.भारतात कायदे,नियम जणु मोडण्यासाठी केलेले असतात.असे भारतीय लोक समजतात.कारण ‘विषय’ पैशाने बाप मिटविल अशी पोरांना खात्री वाटते. त्यामुळे देशासह शिरुर मधे बेफान पोरं पोरी वाहन चालवण्याचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असतत. रस्ता ओलांडताना इतक्या वेळा दोन्ही बाजुंना आलटुन पालटून पहावे लागते की त्याच चक्कर येउन माणुस पडेल ! निर्माण प्लाझा चौकात वाटल्यास अनुभव घेउन पहावा.वाहतुक पोलीस तरी एका वेळेस कुठे कुठे दक्ष देतील?अशी एकंदरीत अवस्था झाली आहे.
शिरुर च नवनियुक्त पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे ….

म्हणुन आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी शिरूर शहराअंतर्गत वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, BJ कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त/अल्पवयीन वाहन चालक यांच्या 44 वाहनांवर कारवाई करत 40,500/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. यात शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल चालवणे, बुलेट मोटरसायकलचे फटाके वाजवणे, काचा असणाऱ्या फोर व्हीलर अशा वाहन चालकावर आज कारवाई करण्यात आली.
शिरुर पोलिसांचे पथक कारवाईत….

यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याकरता माननिय पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांनी ‘रोड रोमियो पथक’ सक्रिय केले असुन सदरची कारवाई पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंबे, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गोरे, पोलीस अमलदार विक्की यादव, पोलीस अमलदार विनोद काळे यानी पाल पाडली आहे.
पालकांना पोलिस निरिक्षकांचे आवाहन….
तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यानी नागरिकांना आवाहन केले आहे की,’ आपल्या 18 वर्षा खालील लायसन नसलेल्या पाल्यांना मोटर सायकल चालवण्यास देऊ नये. अन्यथा वाहन मालक (पालक ) यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.’
अल्पवयीन मुले मुली बेभान आणि पालकांचा,’लाड’…..
तरी या प्रकारावर सातत्याने दक्ष ठेवावे लागेल. यात आणखीन भर म्हणजे मुलींसमोर ‘भाव’ खाण्यासाठी वाहने त्यांच्यासमोरुन मुद्द्दाम वेगाने चालवत नेणे,यावेळी विचित्र आवाज काढणे यात पराक्रम वाटणे.मुलींनाही याचे कौतुक व हे हवेहवेशे वाटणे हे ही निदर्शनास येते.वयाचा दोष आहे! हे बरोबर पण शिक्षण कशासाठी ठेवले आहे. योग्य अयोग्य वय,वेळ समजावे म्हणुनच ना !की मोबाईलवरती पाहुन ते करण्यासाठी उतावळेपणा करण्यासाठी तरी नाही ना ! यामुळे अनेक अल्पवयीन येरवडा सुधारग्रहात सुधारणा शिकत आहेत की नाही.
पालक,मुले,मुली,शिक्षक,पोलीसांसह सर्वांचीच जबाबदारी शिरुर व तत्सम शहरांमधे वाढत आहे. म्हणुन सातत्याने या घटकांनी फक्त शिस्तीची काळजी घेतली तरी बरेच काही साध्य होईल !