
Contents
शिरुर च्या नदीकाठी आरामात गांजा ओढत होते ; पण नियतीला हे मंजुर नव्हते ! कसे ते वाचा…
शिरुर पोलिसांनी 5 गंजाडींना पकडले !
शिरुर,दिनांक 12 सप्टेंबर:

(डा.नितीन पवार,संपादक )
शिरुर च्या घोडनदीकाठी आरामात गांजा ओढत होते.पण नियतीला हे मंजुर नव्हते ! असेच या प्रकरणाबाबत म्हटले तर वावगे ठरणार नाही. अचानक शिरुर पोलिसांनी धाड टाकली.आणि 5 गंजाडींची ‘ट्रेजिडी’ झाली आणि ते पकडले गेले आहेत.
शिरुर मधील नदीकाठ ‘रमणीय’ ठिकाण. ….
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार
हकीकत अशी की दिनांक 11/09/2024 रोजी 17: 30 वागण्याच्या सुमारास शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत फिर्यादी रघुनाथ भिमराव हाळनोर ,वय -35 वर्षे, व्यवसाय- नोकरी, पोलीस काॅन्सटेबल, नेमणुक -शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांना कुंभार आळी , दशक्रिया घाट, घोडनदीच्या कडेला, शिरूर, तालुका-शिरूर , जिल्हा -पुणे येथे आडोशला सार्वजनिक ठिकाणी खालील आरोपी हे त्याच्या ताब्यात असलेल्या अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे वरील साहीत्य बाळगुन गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत होते.
त्यावरुन त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले.त्यांनी त्यावरुन फिर्याद वगैरे मजकुरानुसर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुदध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
शिरुर पोलिसांच्या या कारवाईतील आरोपी पुढीलप्रमाणे –
1) आसीफ रफिक शेख, वय- 27 वर्ष, राहणार- हल्दी मोहल्ला,शिरूर ,तालुका- शिरूर , जिल्हा – पुणे
2) वशीम इक्बाल शेख ,वय- 32 वर्ष, राहणार- हुडको काॅलनी, शिरूर ,तालुका- शिरूर , जिल्हा -पुणे
3) उमेष संभाजी गडकर, वय- 32 वर्ष, राहणार-गुजरमळा, शिरूर, तालुका- शिरुर, जिल्हा – पुणे
4) दत्तात्रय काशीनाथ गुळादे, वय- 43 वर्ष, राहणार- साईनगर ,शिरूर , तालुका- शिरूर , जिल्हा – पुणे
5) दिनेश राम लोखंडे, वय – 28 वर्ष, राहणार-सिद्धार्थ नगर, शिरूर, तालुका-शिरूर,जि-पुणे
शिरुर पोलिसांना यावेळी आरोपींकडून मिळालेला माल पुढीलप्रमाणे वर्णनाचा आहे –
1) एक गांजा सारखा अर्धवट जळालेला अंमली पदार्थ जु.वा.किं.अं
2) एक माचीस बाक्स जु.वा.किं.अं
3) एक मातीची चिलीम त्यामध्ये मळकट कापडी चिंधी जु.वा.किं.अ
4) अर्धवट जळालेल्या माचीसच्या काडया जु.वा.किं.अं.
‘अमली पदार्थ…’ कायदा लागु झाला….
आरोपीविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुरनं 757/2024 हा आहे. तरNDPS 1985 चे कलम 8(c) सह 27 प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार हवालदार श्री. वाडेकर हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे करत आहेत.