‘ गुटखाबंदी ‘साठी प्रशासनाने शिरुर तालुक्यातील बेकायदा ‘गुटका विक्री’ बाबत आज होणार मोठा ‘धमाका’ ? प्रशासनाचे मोठे स्टिंग ‘आपरेशन ?
' गुटखाबंदी 'साठी नागरिकांकडुन शिरुर तालुक्यातील बेकायदा 'गुटका विक्री' बंद व्हावी म्हणुन होती मागणी होती.याबाब होणार मोठा 'धमाका' होणार आहे अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. प्रशासनाने मोठे स्टिंग 'आपरेशन केले असुन 'नावां' ची लिस्टच तयार केली आहे. 'लिस्ट मधील बेकायदा गुटका वितरकांवर कारवाई लवकरच होणार अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.
‘ गुटखाबंदी ‘साठी शिरुर तालुक्यातील सजग नागरिकांनी प्रशासन व ‘आप ‘कडे गुटका विक्री’ बाबत तक्रारी आल्या होत्या. वरिष्ठाच्या सुचनेवरुन ‘आप’ ने काही दिवसापूर्वी निवेदन दिले होते !
‘ नावां’ ची लिस्ट ही तयार ?’
शिरूर, दिनांक 13 सप्टेंबर : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज,शिरुर.
” गुटखाबंदी ‘साठी नागरिकांकडुन कडुन संबंधित विभागाकडे अनेक दिवसांपासून तक्रारी दिल्या जात होत्या.पण कारवाई होत नव्हती.
‘आप’ कडे तक्रारी आल्या नंतर वरिष्ठांच्या सुचनेवरुनआम आदमी पार्टी शिरुर ने बेकायदा ‘गुटका विक्री’ बाबत निवेदन दिले होते. त
त्यावर कारवाई होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.’नावां’ ची लिस्टच तयार तयार केली आहे. ‘लिस्ट मधील बेकायदा गुटका वितरकांवर मोठी कारवाई होणार आहे’ ‘असे रात्री उशीरा वृत हाती आले आहे.
आरोग्याच्या दृष्टिने गुटका हा जिवीतास घातक निश्चित आहे.कायद्याने त्यावर बंदी आहे. हे ही बरोबर आहे.मात्र फार मोठ्या संख्येने पुरुष,महिला,मुले,मुली हे गुटका खातात. हे सर्वत्र दिसते. वितरक,विक्रेते,प्रशासन,पोलिस असे शेकडोंनी लोक यात ‘ सक्रिय'(!) आहेत. हे ही खरे आहे. लाभार्थीही आहेत.जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने समाजातील लोकांच्या “जिव्हाळ्या’ चा हा विषय असतो.तेव्हा मोठा गुंतागुंतीचा हा ‘फिनामिना’ बनतो.व्यक्तिगत एक,दुसर्यावर राग काढणे,हे ही योग्य नसते.जेव्हा व्यवस्थाच सडली जाते. तेव्हा ‘अवतारा’चीच प्रतिक्षा करायची की अन्य काही? आमच्यापुढे ‘धर्म संकट’ उभे राहिले तर मात्र आम्ही धर्माचीच कास धरणार !”-
संपादक
शिरुर तालुका ‘आम आदमी पक्ष’ आक्रमक !
शिरुर तालुका ‘आम आदमी पार्टी’ ने काही दिवसापूर्वी गुटखा वितरक व विक्रेते यांच्यावर कारवाई करा अन्यथा लोकहितासाठी लोकशाही मार्गाने आपल्या दारात आंदोलन करावे लागेल असा निवेदनातून नम्रपणे संबंधित प्रशासनाला इशारा दिला होता.
आम आदमी पार्टी शिरूर यांनी आजतागायत शिरूर शहरासह तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना लोकहितासाठी वाचा फोडण्याचा प्रयत्न करून शिरूर तालुक्यामध्ये आम आदमी पार्टी शिरुर कार्यकर्ते आणि पदाधिकारीनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वासहारता ही निर्माण केली आहे. त्यामुळेच या आंदोलनाच्या इशारा नंतर प्रशासन काय कार्यवाही करते,याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाचे मुद्दे —-
■शिरूर तालुक्यात होते गुटखा विक्रीतून करोडोची उलाढाल !
■ कारेगाव एम.आय.डी.सी.परिसर बनलाय गुटखा विक्रीचा हॉटस्पॉट !
■ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वितरक ,व्यापाऱ्यांची गुटखा विक्रीतून होतेय चांदी !
■अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षाने गुटखा माफिया मस्तावले !
■ अधिकारी दबंग कारवाई करणार की मॅनेज होणार?
■शिरूर,रांजणगाव,शिक्रापूर ,डी.वाय.एस.पी., एस.पी कार्यालयात नवीन कारभारी कारवाई करणार की पहिले पाढे ५५चे होणार ?
¶ सर्वात मोठा ,’मासा’ शिरुरचाच आहे का? प्रतिष्ठित व सत्ताधारी आहे का?¶
राज्यात गुटखा बंदी. …
राज्यात पुर्वीच गुटखाबंदी!
महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी असताना, महाराष्ट्र राज्याच्या सीमा सील असताना काही गुटखा माफिया शिरूर तालुक्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या गुटखा पुड्या आणून शिरूर सह कारेगाव, एम.आय.डी.सी,रांजणगाव शिक्रापूर व डी. वाय. एस. पी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये व शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुटखा पुरवठा केला जातो.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख काय करणार?
गुटखा माफियावर सध्या कोणाचाही धाक राहिला नसल्यामुळे गुटखा विक्री तेजीत चालू आहे.पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची काही दिवसापूर्वी बदली झाल्यानंतर अवैध धंदेवाल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता; मात्र अवैध धंद्यावाल्यांचा कर्दनकाळ असणारे दबंग पोलिस अधीक्षक पंकज देशमुख साहेब पुन्हा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रुजू झाल्यानंतर अवैध धंदेवाले धास्तावलेले दिसत आहे.
त्यांच्या अधिकारांतर्गत येणारे सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी सुद्धा कायद्याचे कडक नियमांचे पालन करताना दिसत आहे किंवा दाखवत आहे. असेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पुणे जिल्ह्याला मिळावे अशी अनेक दिवसापासून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील नागरिकांची इच्छा होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मधील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
नेमकं पाणी मुरतंय कुठं?
शिरूर,रांजणगाव,शिक्रापूर पोलीस स्टेशनला ही अनेक नवीन कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी मिळाले असतानाही गुटखा विक्रीच्या बाबतीत पाणी नेमके कुठे मुरतंय? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.संबंधित पोलीस स्टेशनला व जिल्ह्याला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावे सर्वसामान्यांची इच्छा होती. ती आज अखेर पूर्ण होतानाही दिसत आहे .असे हे कायद्याची कडक अंमलबजावणी करणारे,कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणारे पोलीस अधीक्षक पुणे जिल्ह्याला मिळाल्यानंतर काही काळ अवैध धंद्यावाले व गुटखा विक्रेते काही काळ धास्तावले होते.मात्र गुटखा उत्पादक विक्रेत्यांनी स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटका विक्रीचे व अवैध धंद्याचे जाळे निर्माण केले आहे.परराज्यातील गुटका शिरूर ,शिरुर तालुका व परिसरात विक्रीसाठी पाठविला जातो.
रांजणगाव एम आय डी सी, ‘हाट स्पाट’…
रांजणगाव,एमआयडीसी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरातून हा गुटखा वितरित करण्यात येतो. या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून शिरूर, कारेगाव, रांजणगाव या परिसरात स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. एकट्या कारेगाव परिसरातील एक मोठ्या परप्रांतीय व्यापाऱ्याकडून मोठी रक्कम प्रशासनाला पुरवली जात असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. मुख्यतः कारेगावातून प्रत्येक गावात,शहरातील प्रत्येक वार्डात आणि नगरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा वितरित करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये त्या परिसरामध्ये चालू आहे.
‘गुटखाबंदी’ अनेक वर्षांपुर्वी ! पण झिरो अंमलबजावणी. .
काय आहे पोलिसांचा रोल?
काही वर्षांपूर्वी सरकारने गुटखाबंदी लागू करण्यासाठी प्रयत्न केले . अनेक गुटखा उत्पादकांनी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.मात्र न्यायालयाने गुटखा बंदी लागू करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने गुटकाविक्रीतून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयाचा महसूल वर पाणी सोडले. राज्यात गुटखा बंदीचा निर्णयाला अनेक वर्ष झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे.गुटखाबंदी फक्त नावापुरती आहे.खेड्यापाड्यापासून ते बड्या शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होतो. गुटखा उत्पादक,बेकायदा वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. पोलीस आणि अण्ण व औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केल्याचे एका गुटखा वितरकाने सांगितले..?
हवालामार्फत व्यवहार ; गुटखा विक्री मध्ये बाहेर राज्यातील व्यापारी सामील !
शिरूर शहर व कारेगाव रांजणगाव शिक्रापूर गुटखा विक्रीसाठी बाहेर राज्यातून कंटेनर मधून सहजपणे लाखो रुपयांचा माल विक्रीसाठी पाठविला जातो. तो मध्यरात्री उतरवला जातो ,शिरूर शहर व तालुक्यातील कारेगाव व इतर बाजारपेठेच्या गावात दिवसा-ढवळ्या प्रशासनाच्या देखत टपऱ्यामधून,स्कुटीवर कारमधून अनेक ठिकाणी वितरित केला जातो. हे सर्व प्रशासनाच्या आशीर्वादा शिवाय शक्य आहे का ..? निव्वळ कारेगाव वितरित होणाऱ्या गुटखा विक्रीचा हिशोब केल्यास दरमहा लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे माहिती आहे.
गुटखाबंदीचा आदेश नावापुरता आहे . जुजबी कारवाई करून गुटखा विक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि त्या बदल्यात गुटखा उत्पादकाकडून हप्ते घ्यायचे अन्न -औषध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने पुणे व शिरूर तालुक्यामध्ये गुटखा विक्रीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. हप्ते खोरीमुळे संपूर्ण यंत्रणा पोखरली असून कार्यवाही कागदावरच दिसत आहे . येणाऱ्या काळामध्ये वितरक व विक्रेत्यावर कारवाई न केल्यास प्रशासनाच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टी देत आहे. संबंधित विषयावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे व सजग नागरिक लक्ष लागून राहिले आहे.
लवकरच ‘धाड’ पडणार?
सूत्राच्या माहितीनुसार लवकरच प्रशासन कारवाई करणार असल्याचे समजते आहे.लिस्ट उपलब्ध झाली आहे. मोठ्या संख्येने होलसेलर गुटका वितरकांची यादी प्रशासनाकडे आली आहे. या यादीमधे छोटे,मोठे ,’मासे’ आहेत.हे संपुर्ण तालुक्यातील आहेत.’योग्य वेळी ही यादी लोकांसमोर ठेवू’ असे काही प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे .एकुण एक घटकांचा उलगडा केला जाईल.असेही समजते.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com