आम आदमी पक्ष चे राष्ट्रीय संयोजक श्री अरविंद केजरीवालांचा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा देणार राजीनामा ? आणि आम आदमी पक्ष फैलणार देशभर!
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक श्री.अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दोन दिवसांत होणार आहे.असे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्याचा परिणाम आम आदमी पक्ष महाराष्टासह देशभर फैलावण्यात होणार आहे.तसेच आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार 'एन्ट्री' होणार अशी चर्चा निर्माण झाली आहे. कारण महाराष्टातील सर्व जागा लढणार असल्याचे आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे.
आम आदमी पक्ष चे राष्ट्रीय संयोजक श्री अरविंद केजरीवालांचा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा देणार राजीनामा ? आणि आम आदमी पक्ष फैलणार !
आम आदमी पक्ष ची महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार ‘एन्ट्री’ होणार !
शिरुर, दिनांक 16 सप्टेंबर :
लेख –
श्री.अनिल डांगे, आम आदमी पक्ष’, प्रवक्ते,पुणे जिल्हा,शिरुर.
(अनिल डांगे, आम आदमी पक्ष, पुणे जिल्हा प्रवक्ते, शिरुर तालुका अध्यक्ष )
आम आदमी पक्ष चे राष्ट्रीय संयोजक श्री.अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दोन दिवसांत होणार आहे.असे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्याचा परिणाम आम आदमी पक्ष महाराष्टासह देशभर फैलावण्यात होणार आहे.तसेच आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार ‘एन्ट्री’ होणार अशी चर्चा निर्माण झाली आहे. कारण महाराष्टातील सर्व जागा लढणार असल्याचे आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रिय संयोजक आणि दिल्ली चे “मुख्यमंत्री श्री.अरविंद केजरीवालांनी यांना सर्वोच्च न्यायालयांने कथित मद्य धोरण भ्रष्टाचारात प्रकरणात अखेर जामीन मंजुर केलेला आहे.केवळ जामीन मंजुर केलेला आहे एवढेच नाही तर’ जामीन मंजुर करताना श्रीमान करवंद केजरीवाले यांना काही अटी घेतल्या गेल्या आहेत.’आम आदमी पक्षात’
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. ..
हे चालूच असतानाच अरविंद केजरीवाल आणि त्यांच्याविरुद्ध उरलेल्या कारस्थान यांची चर्चा देश विदेशात चालू असतानाच अरविंद केजरीवालांनी यांनी दोन दिवसांत दिल्लीच्या “”मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्या चे जाहीर केले आहे. याची तीव्र आणि उलट सुलट राजकीय आणि प्रतिक्रिया उमटलेली आहे .विश्लेषकांनी अनेक प्रकारचे अर्थ त्यातून काढलेले आहेत.दोन दिवसांचा तरी अवधी का घेत आहात? असा प्रश्न अनेकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोण येणार ?याची चर्चा देश भर,माध्यमांमधे रंगली आहे.
डॉ.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
” केंदातील ‘हुकुमशाही’ प्रवृत्तीच्या सरकारशी अभुतपूर्व सामना करणारे व भारतीय लोकशाहीला वाचवणारे एक प्रमुख नेते म्हणुन भारताच्या इतिहासात आदरनीय श्री.अरविंद केजरीवाल यांचे नाव नोंदवले गेले आहे. तरी ही लढाई संविधान व लोकशाही वाचवण्याची आहे.ती अशीच पुढे आम्ही तन मन धनाने लढु !
या लढ्यात आता महाराष्टातील आम आदमी अर्थात सर्वसामान्य माणूस पुढे येवुन आम आदमी पक्षासोबत सामील होईल अशी आम्हाला खात्री आहे.सह्याद्रि हिमालयाच्या मदतीला धावतोच असा महाराष्टाचा इतिहास आहे.”
—-– डॉ.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
आम आदमी पक्ष कार्यकर्तांना आहे विश्वास. ..
परंतु आम आदमी’ पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते तसुभर देखील ढळलेले नाहीत. श्री.अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असताना देखीले आम आदमी पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या वरचा विश्वास ढळलेला नव्हता.उलट जास्त जोमाने वाढीस लागलेला होता. त्याचे करणे त्यांना विश्वास होता की श्री. अरविंद केजरीवाल यांचा न्याय मिळेल आणि झालेही तसेच ! सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला.सी.बी.आय.वर ताशेरे ओढले आहेत. अरविंद केजवाल यांना देशाला सांगितले की त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहे. त्यांच्यावर अदयाप कोनता आरोप सिद्ध होऊन ते तुरुंगात गेले आहेत असे नाही.
श्री.अरविंद केजरीवाल: एक ‘चाणक्य’ देखील !
श्री. अरविंद केजरीवाल ते एक मुत्सद्दीपणा नेते देखील आहेत.राजकारणात त्याची आवश्यकता नाही. भाजपच्या दहा ‘चाणक्यां’ ना एकटे लोळवण्याची ताकत श्री.अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आहे. भाजपच्या दहा ‘चाणक्यां’ना पुरून ते उरतील ! म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि इतरही अनेकांनी श्री.अरविंद केजरीवाल यांना जास्तीत जास्त रोखण्यासाठी सर्व मार्गांनी करूनही पाहिले. पण त्यांना रोखता आले नाही हे सर्वांनी पाहिले. भारतीय जनता पक्षाला ला आज पर्याय ठरू शकेल असा एकमेव जनता पर्याय ठरू शकेल असा एकमेव पर्याय हेच असू शतकात.त्यांचे वय 55 वर्षे आहे. राहुल गांधी यांचे 55 वर्षे वय आहे. नरेंद्र मोदीजींनी हे 75 वर्षांचे होत आहेत.
दिल्लीमध्ये पुढील वर्षी पुन्हा विधानसभा निवडणुका आहेत.भारतीय जनता पक्ष आणि कांग्रेस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार ‘दाखवायला’ देखील चेहरा नाही.हरियाणा मधे आम आदमी’ पक्षाचे घोडदौड सुरू आहे.
महाराष्ट विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार ..
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आलेली आहे. महाराष्ट्र मधील ‘आम आदमी पक्षाची कार्यकर्ते आणि नेते यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या यशामध्ये मोठा वाटायचं उचललेला होता.हे श्री. शरद पवार यांनी देखीले मान्य केले आहे.’आम आदमी’ पक्ष’ च्या महाराष्ट्रांतील कार्यकर्त्यांनी आम आदमी’ पक्षांचे संघटन आजच्या घडीला अल्पावधीत गाव- गावांमध्ये पोहोचवले आहे. हे चित्र स्पष्ट महाराष्ट्रामध्ये स्पष्ट दिसत आहे.मुंबई आणि पुणे शहरातील सर्व जागांवर उमेदवाराच निश्चित झालेले आहे आहेत. ग्रामीण भागात असलेल्या विधानसभा मतदार संघामध्ये महाराष्ट्रभर नवे कार्यकर्ते जमा होत आहेत. उच्चशिक्षित ,शेतकरी, मध्यमवर्गीय,दलित, अल्पसंख्यांक ,ओबीसींनी मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षात सामील होत आहेत. नवे चैतन्यपूर्ण चेहरे राजकीय कार्यकर्ते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार आहेत. नवी पिढी जी पुढची तीस वर्ष चांगले राजकारणात असणार आहे. ती दिसेल.
महाराष्टातील जनता नव्या पर्यायाच्या शोधात..
महाराष्टातील मतदारांची मानसिकता’ नवीन पर्याय ,नवीन चेहरे, नवीन प्रतिनिधी पाहीजेत,अशी आहे.अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाचा मोठ्या ‘ उंची’ चा नेता चुकीच्या आरोपाखाली राजकीय हेतुने व आरोपाखाली तुरुंगांत डांबला गेला होता. हे देशातील आणत देशाबाहेरही लोकांनी पाहिला. आता ही खात्री झाली आहे ही दडफशाही होती.पण आता एक नवे चैतन्य संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेले दिसून येत आहे.भारतीय जनता पक्ष त्याच्या करणीमुळे अधोगतीला लागला आहे. मोदींच्या नंतर पंतप्रधानपदासाठी देखील भाजपाला अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागेल. लोकसभेच्या निवडणुकींमध्ये भारतात जगता पक्षाचे केंद्रिय सरकार थोड्यक्यात वाचलेले असले तरीही त्याची गच्छंती येणाऱ्या काळातही चालु राहणार आहे.महाराष्ट्रात भारतीय जगता पक्षांचे देवेंद्र फडवणीस यांच्या बद्धल महाराष्ट्रातील लोकांचा अत्यंत चीड आहे. देवेंद्र फडणवीस यांना कालच्या पातळीवरचे राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षात केलेले आहे. महाराष्ट्रातील जनता ते विसरलेली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची हे लोक वाटच वाटत पाहत आहेत . उरली सुरली भाजपाची महाराष्ट्रातील सत्ताही शंभर टक्के जाणार आहे.
तरुण पिढी ‘आप’ मधे : सोशल मीडियाचा प्रभावी वापर !
तरीही महाराष्ट्रमधे आम आदमी पक्षांकडे एक समर्थ पर्याय म्हणून महाराष्ट्रातील जनतेने ठरवले तर काय होईल? याची धास्ती महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांना लागलेली आहे. अशातच केजरीवाल हे बाहेरुन पडलेले आहेत.ते दिल्ली ,पंजाब पुरते थांबणारे व्यक्तीमत्व नाही.पंतप्रधान पदासाठी आवश्यक सर्व गुण त्यांच्याकडे आहेत. साहजिकच महाराष्ट्रातील राजकारणात सध्या तरुण पिढी आहे. तरुण पिढीला राजकारण खालच्या पातळीवरील गेलेले सहन झालेले नाही .तरुण-तरुणींमध्ये आम आजही पक्ष याबद्दल आदर आहे. पक्षाचे महाराष्ट्रांतील आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये देखीले पोहोचण्यात कायजोरदारपणे सोशालिस्ट मीडिया मधुन पाहायला मिळत आहे. ‘आम आदमी पक्षाकडे पैसा नसला तरीही नैतिकतेला मोठा भाग आहे. प्रस्थापित राजकारणात जास्तीत जास्तीत खालच्या स्तरावर गेलेले आहे. अशा परिस्थितीतुन महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचे यावेळी जोरदारपणे काम सुरू असल्यामुळे महाराष्ट्रात एक पर्याय म्हणून आम आदमी पक्ष येणार्या काळा मध्येअसणार यात कोणतीच शंका नाही.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com