
Shirur Crime: कौटूबिक हिंसा !
Contents
शिरुर मधे आम आदमी पक्षाच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर 5 लाख 41,000 रुपये किंमतीचा बेकायदा ‘गुटका ‘ जप्त!
शिरूर पोलिसांनी १७ कमानी पुला जवळ ५ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला ! तर दोघांना अटक केले !
शिरुर,दिनांक – 16 सप्टेंबर: ( श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
शिरुर मधे आम आदमी पक्षाच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर 5 लाख 41,000 रुपये किंमतीचा बेकायदा ‘गुटका ‘ शिरुर पोलिसांनी धाड टाकत पडला आहे.शिरूर पोलिसांनी शिरुर अहमदनगर रोडच्या शेवटच्या पाईंटला असलेल्या १७ कमानीच्या पुला जवळ ५ लाख रुपये किमतीचा हा गुटखा पकडला आहे. यात दोघांना अटक करण्यात आली आहे. तालुका किंवा जिल्हा सिमेचा नियम लक्षात घेऊन शिरुर पोलिसांना हुलकावणी देण्याचा हा प्रयत्न होता.पण काही मीटरच्या अंतराचे भान ठेवून शिरुर पोलिसांनी चपळाईने हा माल व आरोपी पकडले आहेत.
नेता नंबरी तो कार्यकर्ता दस नंबरी !
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल हे देशातील व्यवस्थेविरोधात सत्ताधार्यांची झोप उडवत असताना देशभर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ‘चित्याच्या वेगाने व चपळाईने समाजहितासाठी कार्यरत असतात.हे स्पष्ट दिसत आहे. शिरुर तालुका ‘आम आदमी पक्ष’ कार्यकर्तांनी समाजातील दारु,गुटका वगैरे अमली पदार्थ हे तरुणांचे जीवन संपवत असताना पहात बसत नाहीत.हे दाखवुन देत आहेत.’शिरुर‘
पुणे नगर जिल्ह्यांच्या सीमेवर कारवाई. ..
शिरुर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची हकीकत अशी की
शिरुर शहरात १७ कमानीचा पुल आहे.तो घोडनदीवर इंग्रजांच्या काळात बांधला गेला आहे. अर्थात विना भ्रष्टाचार कामे कशी स्ट्रांग करता येत होती.हे आजच्या सत्ताधार्यांना मान खाली घालायला लावणार्या आहेत.तर या पुलाजवळ गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पकडला आहे. त्यामध्ये ५ लाख ४१००० रुपये किंमतीचा बेकायदा गुटका / ऐवज जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.
दोन आरोप नगर जिल्ह्यांतील…
याबाबत रवी तात्याबा काळे पोलिसा अंमलदार , शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अक्षय भास्कर लाळगे,वय- २६ वर्ष ,राहणार – निघोज ,तालुका- पारनेर, जिल्हा- अहमदनगर) व हर्षद अनिल डोळसे, वय- २१ वर्ष, राहणार – राळेगण थेरपाळ, तालुका-पारनेर, जिल्हा- .अहमदनगर यांना अटक केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे.
गुटख्याची सर्व प्रकार जप्त. …
दि.१३ सप्टेंबर रोजी दु.१:०० वाजण्याच्या सुमारास शिरूर जवळील १७ कमानी पुलाजवळ टाटा कंपनीच्या टेम्पो MH.12. VF.32 86 या मधून गुटखा विक्रीसाठी शिरूरच्या दिशेला घेऊन जाताना पोलीस पथकाने पकडले असून यामध्ये विमल पान मसाला ४ पोती,व्ही-१ कंपनीचे सुगंधी तंबाखू २२८ पुडे, विमल पान मसाला ५ बॅग, सुगंधी व्ही.१ कंपनीचे ५ बॅग, रजनीगंधा पान मसाला ५ बॉक्स, तुलसी कंपनीचे सुगंधी तंबाखूचे १० बॉक्स, असा एकूण असा एकूण २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा गुटखा व ३ लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा छोटा टेम्पो असा एकूण ५ लाख ४१ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला केला आहे. तर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियमन २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी करत आहेत.
1 thought on “शिरुर मधे आम आदमी पक्षाच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर 5 लाख 41,000 रुपये किंमतीचा बेकायदा ‘गुटका ‘ जप्त!”