
महिला असुरक्षीत !
Contents
शिरुरमधील भाजी बाजार परिसरात किरकोळ कारणावरुन धारदार हत्याराने डोक्यात मारून जखमी केले तर करडे येथुन 16 वर्षीय तरुणीस पळवुन नेले!
शिरुर पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळ्या घटनांत गुन्ह्यांची नोंद !
शिरुर,दिनांक – 19 नोव्हेंबर : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
शिरुर मधील भाजी बाजार परिसरात किरकोळ कारणावरुन धारदार हत्याराने डोक्यात मारून एकास जखमी केले तर करडे येथुन 16 वर्षीय तरुणीस अज्ञात कारणाने अज्ञात व्यक्तीने पळवुन नेले आहे. शिरुर पोलिस स्टेशनला या दोन वेगवेगळ्या घटनांत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिरुर मधे हत्याराने एकाला मारहाणीची घटना…
शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 17/09/2624 रोजी 21: 00 ते 21: 30 वाजण्याच्या दरम्यान शिरूर, तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत भाजीमार्केट येथील गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा फिर्यादी रमजान उर्फ टिपु आजम पटेल, वय -31 वर्ष ,धंदा- प्लंबींग व्यवसाय, राहणार – भाजीबाजार, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे मो नं 9209777761 याचा धक्का लागल्याने टिपु पटेल त्याला ‘निट चाल’ म्हणाल्याचा राग आल्याने त्याने टिपु यास शिवीगाळ केली. त्यानंतर टिपु व गणेश गावडे यांची भांडणे तेथे जमलेल्या लोकानी सोडवली. त्यानंतर भाजीमार्केट गल्लीमध्ये टिपु पटेल बसलेले असताना गणेश गावडे हा त्या ठिकाणी आला. म्हणाला ,’तुला लय माज आला आहे काय’, असे म्हणुन त्याने त्याच्या जवळील कोणत्यातरी धारदार हत्याराने टिपु याच्या डोक्यात मारून जखमी केले. शिवीगाळ ,दमदाटी केली.’शिरुर‘
शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. …
म्हणून रमजान उर्फ टिपु आजम पटेल, वय -31 वर्ष ,धंदा- प्लंबींग व्यवसाय, राहणार -भाजीबाजार, शिरूर, तालुका – शिरूर,जिल्हा- पुणे, मो नं 9209777761 यांनी गणेश गावडे, राहणार- पाचर्णे मळा ,तडोंबाची वाडी, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे याच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यामुळे गणेश गावडेवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गणेश गावडे याच्यावर शिरूर पोलीस स्टेशनला
गु.र.नं -,775/2024 तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118 (1), 351 (2) (3), 352 सह म.पो.का. कलम 37 (1) (3)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू. ..
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. गिरी हे करत आहेत.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे आहेत.तर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंदळे, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
——-
16 वर्षीय तरुणीस पळवुन नेले. ..
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत नोंद केली गेल्यानुसार
हकिगत अशी की दिनांक- 18/09/2024 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी (नाव गुप्त)
यांची अल्पवयीन मुलगी ,वय -16 वर्ष 2 महीने, हिला (नाव गुप्त) कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी कशाचीतरी फुस लावुन पळवुन नेले आहे.
ही घटना करडे, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हृदिदतील राहत्या घरासमोर ही घटना घडली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुदध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री.शेळके हे करत आहेत तर दाखल पोलिस हवालदार श्री.भगत हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
1 thought on “शिरुरमधील भाजी बाजार परिसरात किरकोळ कारणावरुन धारदार हत्याराने डोक्यात मारून जखमी केले तर करडे येथुन 16 वर्षीय तरुणीस पळवुन नेले!”