
Contents
- 1 धनगर समाजाचा जोरदार रास्ता रोको : शिवाजीराव कुर्हाडे यांची माहिती !
- 1.1 धनगर समाज शिरुर तालुका चा 23 सप्टेंबरचा कानिफनाथ मंदिर,न्हावरे फाटा येथे पुणे,पंढरपुर, नेवासा,लातुर येथील आरक्षण आंदोलकांच्या आमरण उपोषणास पाठिंबा !
धनगर समाजाचा जोरदार रास्ता रोको : शिवाजीराव कुर्हाडे यांची माहिती !
धनगर समाज शिरुर तालुका चा 23 सप्टेंबरचा कानिफनाथ मंदिर,न्हावरे फाटा येथे पुणे,पंढरपुर, नेवासा,लातुर येथील आरक्षण आंदोलकांच्या आमरण उपोषणास पाठिंबा !
शिरुर,दिनांक-22 सप्टेंबर: (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
धनगर समाजाचा जोरदार रास्ता रोको यशस्वी झाला आहे, अशी माहिती या आंदोलनाचे एक प्रमुख नेते शिवाजीराव कुर्हाडे यांनी सत्यशोधक न्यूज ला दिली आहे. आधी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पोलीस निरीक्षक, तहसिलदार शिरुर यांना देण्यात आले होते.या आंदोलनाला शिरुर तालुक्यातील धनगर समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला दिसुन आला. यात प्रमुख बाब ही पुणे,पंढरपुर, नेवासा,लातुर येथील आरक्षण आंदोलकांच्या आमरण उपोषणास बसलेल्या कार्यकर्यांना पाठिंबा देणे हा होता.
कानिफनाथ मंदिरासमोर रास्ता रोको. …
धनगर समाजाला विविध मागण्यांसाठी एकत्र येण्याचे शिवाजीराव कुर्हाडे यांनी शिरुर तालुक्यातील धनगर समाज बांधवांना केले होते . त्याला समस्त धनगर समाज शिरुर तालुका यांनी 23 सप्टेंबरला कानिफनाथ मंदिर,न्हावरे समोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री.शिवाजीराव कुर्हाडे यांनी दिला होता.’धनगर‘
आमरण उपोषण?
धनगर समाजाच्या महाराष्ट्र सरकारकडे विविध मागण्या बर्याच काळापासुन आहेत.त्याचा एक भाग म्हणून सकल धनगर समाज महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचे पंढरपुर येथे उपोषण चालु आहे.अन्य ठिकाणी देखील असे आमरण उपोषण चालु आहे. त्या कार्यकर्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज शिरुर तालुका रास्ता रोको आंदोलन कानिफनाथ मंदिर न्हावरे फाटा येथे हे आंदोलन करणार असल्याची माहिती श्री. शिवाजीराव कुर्हाडे यांनी सत्यशोधक न्यूज ला दिली होती.
‘अनुसूचीत जमाती’त समावेशाची मागणी !
त्या बातमीचा सत्यशोधक न्यूज ने पाठपुरावा केला आहे. या उपोषणकर्या व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी धनगर समाजाला S.C.(Scheduled Tribes) अर्थात अनुसुचित जमातीचा दर्जा द्यावा व अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे ही एक मागणी आहे. या आधी अनुसुचित जमातीचा प्रवर्ग व अनुसुचित जमातींची सुची अस्तित्वात आहे. या प्रवर्गासाठी महाराष्ट्रात 7℅आरक्षण लागु आहे. धनगर समाजाचा सुद्धा या प्रवर्गात समावेश करण्यात यावा,अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे.
या रास्ता रोको आंदोलनात आज श्री. शिवाजीराव कुर्हाडे ,
रामकृष्ण बिडगर, सतिश तागड,अविनाश पोकळे, प्रमोद तांदळकर इ.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे आंदोलन सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी साडेअकरा ,11:30 वाजता कानिफनाथ मंदिर न्हावरे फाटा येथे केले गेले आहे.
धनगर समाजाच्या मागण्या काय आहेत,हे वाचकांच्या माहितीसाठी पुन्हा देत आहे.
त्या पुढील प्रमाणे आहेत —
1.धनगर समाजाचे धनगर दाखले तत्काळ रद्द करण्यात यावेत.
2.धनगर एस टी आरक्षणाची मागणी तत्काळ मान्य करण्यात यावी.
3.त्यासंबंधीचा जी आर सरकारने तत्काळ काढावा.