शिरुर पोलिसांनी प्रतिबंधित 292 किलो वजनाचे गोमांस जप्त केले आहे. मात्र शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त केलेले गोमांस दुर्गंधीयुक्त स्थितीत टेंम्पोत पडलेले असल्याने एक हिडीस असे दृष्य शिरुर पोलीस स्टेशन आवारात दिसुन येत आहे. ही गोष्ट कदापि शोभनीय नाही,अशी प्रतिक्रिया आसपास उपस्थित लोकांनी दिली आहे. सत्यशोधक न्यूज ने याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन हा विषय लोकांपर्यत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
शिरुर पोलिसांनी प्रतिबंधित 292 किलो वजनाचे गोमांस जप्त केले आहे. मात्र शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त केलेले गोमांस दुर्गंधीयुक्त स्थितीत टेंम्पोत पडलेले असल्याने एक हिडीस असे दृष्य शिरुर पोलीस स्टेशन आवारात दिसुन येत आहे. ही गोष्ट कदापि शोभनीय नाही,अशी प्रतिक्रिया आसपास उपस्थित लोकांनी दिली आहे. सत्यशोधक न्यूज ने याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन हा विषय लोकांपर्यत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.नितीन पवार, संपादक,सत्यशोधक न्युज, शिरुर.
” माणसाचा पुर्वज जवळपास 10 ते 20 लाख वर्षांपूर्वी पासुन मांस खात आला आहे. एकही प्राणी त्याने सोडलेला नाही.ही पद्धत चीन मधे अजुनही आहे.जगाच्या पाठीवर सर्वत्र हे घडले आहे.त्यामुळे आपली ‘खानदान’ वगैरेंचा अभिमान बाळगणारे भरपुर लोक मिळतात.ते एखाद्या सोईच्या ऐतिहासिक घटनेपासुन सुरुवात करतात.पण त्याच्या मागे जात नाहीत.अगदी आपले पुर्वज निर्वस्र आणि स्वैर कामजीवन असणारे होते.नाती देखील त्यावेळी नव्हती ! मग बोला ! काय काय होत असेल? पण हे सत्य आहे.वेदांमध्ये त्याचे वर्णन आहे.
पण माणुस उत्कांत झाला.त्याचे विचारही उत्क्रांत झाले .आणि त्याच्यात विवेकही उत्कांत झाला. साधारण दोन हजार वर्षांपुर्वी काही लोकांनी मांस खाणे योग्य नाही असे वाटल्याने शाकाहारी अन्न खायला सुरुवात केली. मग माणसालाच खायला (शोषण करायला) सुरुवात केली. हा भाग वेगळा ! पण 20 लाख वर्षे माणसाच्या शरीराला,आतड्याला ,एकुणच पचनसंस्थेतला सवय मांसाहाराचीच आहे.तो कमी किंवा बंद केल्यामुळे उलट त्याच्या शरीरावर नकारात्मक परिणाम झाला आहे.असे ताजे संशोधन आहे.भारतीय उपखंडात तर मांस खाल्लेच पाहीजे.असा दावा हे संशोधक करत आहेत.माणसाचा पुर्वज आफ्रिकेतुन (आजच्या) भारतीय उपखंडात (आजच्या) स्थलांतरीत झाला.तेव्हा इथे घनदाट जंगल होते.प्राणी होते.
ते स्वतः शाकाहारी परंपरेतील आहेत.पण मांस भारतीयांनी खाणे कमी केल्यामुळे आजारांचे प्रमाण भारतीय उपखंडात जास्त आहे.असे या संशोधकांचे संशोधन आहे.
अर्थात याच काळात माणसामधे विवेक,योग्य, अयोग्य, हिंसा,अहिंसा,भुतदया,निर्दयपणा अशा अधिक उन्नत संकल्पना निर्माण झाल्या.म्हणुन बुद्धीला पटत नाही म्हणुन , आतला आवाज,तत्वज्ञान या गोष्टी आल्या.स्थळकाळाप्रमाणे गरजेप्रमाणे समाजाने निर्णय घेतले.पुढेही घेईल.बदलही करील.
आमच्या वाचकांना आमच्या विचारांनुसार जाग्रत करणे,हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून अशा इतर विषयांवर लिहावे,असे आमची अंत:प्रेरणा सांगत असते.’जीवो जीवस्य जिवनम्’ असा युक्तीवाद प्राण्यांना ठार मारुन जिभेचे चोचले पुरवण्यासाठी करतील.पण आता विवेकही आहे.जर आपल्या प्रिय व्यक्तीला बिबट्याने खाल्ले तर आपण ,’जीवो जिवस्य जिवनम्’ म्हणु का? म्हणुन माझे वैयक्तीक मत आहे की आपण ज्या प्राण्याला कापुन मसालेदार अन्न चवीने मटकावित असतो.तो प्राणी कापला जात असताना पहावा.काहीतरी दयामाया आली तर तो खावु नये.दयामाया नाही आली तर खावा.
सर्वात महत्वाचे मुद्दा हा आहे की आधुनिक लोकशाहीच्या काळात बहुमताने केलेले कायदे आपण पाळलेच पाहिजेत.म्हातारी मेल्याचे दुख: नसते.पण काळ सोकावला जावु नये.म्हणुन कायदा पाळलाच पाहिजे. कुणाची मनधरणी किंवा वोटबन्केच्या राजकारणासाठी कायद्यातुन सुट देवु नये.कायद्याप्रमाणे कारवाई करावी. फालतु पुरोगामीपणा वगैरे बाजुला ठेवावा.किंवा तसा कायदा करुन बदल करावेत.पण सोईप्रमाणे वागणे बंद केले पाहिजे. तसा कापणारा,खाणारा जर कायद्याने चुकीचा आहे. तसा विकणार्यालाही ते माहिती असते.पण धंदा, पैसा यासाठी तो लालसी आहेच.म्हणुन पक्षपात नसावा.यात भ्रष्टाचार तर फारच घृणास्पद ठरेल !असे लोक मनुष्यत्वालाही पारखे झालेले असतात.प्रोटीन,कॅलरिज च्या बाता करणार्यांनी इतर सोर्सेस पहावेत.आणि प्राणी मारुन प्रोटिन,कॅलरिज मिळवुन जर हे अमर होणार असतील तर जरुर खावे.
पोलिसांनी ज्या पद्धतीने उघडे करुन हे मांस ठेवले आहे. ते पाहणे क्लेशदायक आहे.त्याची व्यवस्था लावली पाहिजे. अशी अपेक्षा का करु नये?”
कोणाच्या भावना दुखावणे किंवा कुणाच्या गोंजारणे,हा माझा उद्देश नाही.पण भावना दुखावण्याचे सोंगही आता पुरे !”
–—- संपादक,डॉ.नितीन पवार,शिरुर.
प्रतिबंधित केलेले गोमांस? ….
शिरुर पोलीस स्टेशनला नोंद केली गेल्यानुसार हकीगत अशी की दिनांक 22/09/2024 रोजी 12: 30 वाजण्याच्या ते 14: 30 वाजण्याच्या दरम्यान शिरूर ,तालुका-शिरूर ,जिल्हा-पुणे गावच्या हद्दीतील इस्लामपुरा येथील हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ फिर्यादी निखील भिमाजी रावडे, पोलीस कॉन्स्टेबल, नेमणुक-शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी आरोपी
1) शौकत इस्माईल कुरेशी,वय- 42 वर्ष, 2) हनिफ युसुफ शेख, वय -65 वर्ष, 3) इसराल इक्बाल कुरेशी, वय- 39 वर्ष, राहणार- ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ,शिरूर,तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे हे त्यांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गोमांस एकुण 292 किलो ग्रॅम वजनाने असलेले 35040 /- रुपये किंमतीचे विक्री करीत असताना सापडले आहेत. व आरोपी 4) मुजीफ जलील कुरेशी हा सदर ठिकाणहुन पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला आहे.
शिरुर पोलीसांना यावेळी मिळालेला माल (?) पुढील प्रमाणे –
1) 6720/-रूपये किंमतीचे 56 किलो गोमांस 120 रूपये प्रती किलो प्रमाणे शौकत इस्माईल कुरेशी याच्या दुकानामधुन जप्त केलेले आहे.’शिरुर‘
2) 5760/- रूपये किंमतीचे 48 किलो गोमांस 120 रूपये प्रती किलो प्रमाणे हनिफ युसुफ शेख याच्या दुकानामधुन जप्त केलेले आहे. 3) 7560/- रूपये किंमतीचे 63 किलो गोमांस 120 रूपये प्रती किलो प्रमाणे इसराल इक्बाल कुरेशी याच्या दुकानामधुन जप्त केलेले आहे. 4) 15000 /- रूपये किंमतीचे 125 किलो गोमांस 120 रूपये प्रती किलो प्रमाणे मुजीफ जलील कुरेशी याच्या दुकानामधुन जप्त केलेले आहे. असे एकुण 35,040 /- रुपये किंमतीचे मांस जप्त केले गेले आहे.
पशु संवर्धन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल. ..
म्हणुन त्यांच्या विरूद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(क), 9(अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.दाखल अंमलदार पोलीस हवालदार खबाले हे आहेत.तर पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गिरी हे करत आहेत.प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com