शिरुर तालुक्यातील न्हावर्याजवळील गावातुन ,’ काॅलेजला जाते ‘ म्हणुन गेली. पण…….पुढे काय झाले ? ते वाचा..
शिरुर तालुक्यातील न्हावर्याजवळील एका गावातुन ,' काॅलेजला जाते ' म्हणुन एक तरुणी घरातुन निघुन गेली आहे. परंतु ती घरी न आल्याने तिच्या पालकांनी शिरुर पोलिस स्टेशनमधे ती माहिती दिली आहे. तर शिरुर तालुक्यातच दुसर्या घटनेत रांजणगाव सांडस येथे , 'जिवंत न सोडण्या'ची धमकी एकास देवुन मारहाण करण्यात आली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मात्र वारंवार तरुण मुली 'मिसींग' होण्याच्या घटना घडत असल्याने पालकांमधे आपल्या शाळा काॅलेजला व कामासाठी बाहेर पडणार्या मुलींबाबत चिंता वाढीस लागलेली आहे. तरुण मुलींकडूनही स्वतःची काळजी घेणे आणि बेजबाबदारपणे घर सोडुन जाणे ही बाब चांगली नाही.असे नागरिकांचे मत आहे.
शिरुर तालुक्यातील न्हावर्याजवळील गावातुन ,’ काॅलेजला जाते ‘ म्हणुन गेली. पण…….पुढे काय झाले ? ते वाचा..
शिरुर तालुक्यातच दुसर्या घटनेत रांजणगाव सांडस येथे ,’जिवंत न सोडण्या’ची धमकी देवुन मारहाण !
शिरुर,दिनांक 24 सप्टेंबर : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
शिरुर तालुक्यातील न्हावर्याजवळील एका गावातुन ,’ काॅलेजला जाते ‘ म्हणुन एक तरुणी घरातुन निघुन गेली आहे. परंतु ती घरी न आल्याने तिच्या पालकांनी शिरुर पोलिस स्टेशनमधे ती माहिती दिली आहे. तर शिरुर तालुक्यातच दुसर्या घटनेत रांजणगाव सांडस येथे , ‘जिवंत न सोडण्या’ची धमकी एकास देवुन मारहाण करण्यात आली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वारंवार मिसींग च्या घटना पालकांसाठी चिंताजनक !
मात्र वारंवार तरुण मुली ‘मिसींग’ होण्याच्या घटना घडत असल्याने पालकांमधे आपल्या शाळा काॅलेजला व कामासाठी बाहेर पडणार्या मुलींबाबत चिंता वाढीस लागलेली आहे. तरुण मुलींकडूनही स्वतःची काळजी घेणे आणि बेजबाबदारपणे घर सोडुन जाणे ही बाब चांगली नाही.असे नागरिकांचे मत आहे.
कालेज सी टी बोरा ला जाते असे म्हणाली !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्यानुसार
हकीकत अशी की खबर देणार मुलीचे पालक यांनी काल दिनांक 23/09/2024 रोजी सकाळी 6: 30 वाजण्याच्या सुमारास कोकडेवाडी, न्हावरा तालुका शिरूर येथुन ‘कॉलेजला जाते’ असे सांगुन घरातुन 20 वर्षीय मुलगी निघुन गेली आहे. ती परत आली नाही. तिचा शोध घेवुनही ती सापडली नाही. म्हणून शिरुर पोलिस स्टेशनमध्ये’मिसिंग’ अशी नोंद दाखल करण्यात आली आहे.’शिरुर‘
मिसींग व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे
—-
नाव (गुप्त) वय -20 वर्षे, राहणार- कोकडेवाडी, न्हावरा, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा
गोल, उंची 5.3 फुट, अंगाने मध्यम, वजन 52 किलो,
शिक्षण एस. वाय. बी. ए., ओठावर तीळ आहे. अंगात नेसणीस सीटी बोरा कॉलेजचा निळ्या रंगाचा शर्ट, व राखाडी रंगाची पॅन्ट, घातलेली आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत.पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.जाधव हे करत आहेत.प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षकश्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
डॉ.नितीन पवार, संपादक,अभ्यासक, शिरूर
” मिसिंग’ च्या नोंदी होतात.पण बर्याच ‘मिसींग’ व्यक्ती स्वतः हुन आपल्या बायफ्रेंडसोबत गेलेल्या आढळतात.हे सामाजिक वास्तव आहे. समाजाने कधी तारुण्याची दखल ‘शास्रिय’ पद्धतीने घेतली नाही. वैज्ञानिक पद्धतीने या तरुण तरुणींकडे पाहिले नाही. स्वतः त्या अवस्थेतुन जावुनही ! तरुण तरुणींना एकमेकांच्या जवळ येवु दिले नाही. जे नैसर्गीक होते. आवश्यक होते. आजही हेच चालु आहे. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे तरुण तरुणींना घरातच समजत असते ते आधुनिक माध्यमांच्या जगताकडुन ! मात्र आपल्याला स्वातंत्र नाही.अशी भावना व त्यातुन निर्माण होणारा विद्रोह ,कुटुंबाला नेमके काय करावे हे माहिती नसणे,शेवटी पोलिस स्टेशन गाठणे या घटना वाढत आहे.
एक म्हणजे तरुण तरुणींना अनावश्यक बंधने घालु नयेत.त्यांचे स्वातंत्र्य मान्य करावे लागेल.बरेच पालक व कुटुंबे आमच्यासारख्या बातमीदारांना बातमी देवु नका,अशी विनवणी करत असतात.त्यांचा रोख ‘इज्जत’जाईल,असा असतो.पण तुम्ही आम्ही कुठवर रोखणार?आणि का?यात बेइज्जत काही नाही. पण तसे सामाजिक स्ट्रक्चर का बनवायचे? व इतर भ्रामक प्रतिष्ठेच्या कल्पना सोडुन खुला संवाद पाल्यांशी ,तरुण तरुणींशी सतत ठेवला पाहीजे.वय,प्रेम,आकर्षण, लग्न,संसार, कायदा,धोके इ.बाबींवर संवाद केला पाहीजे.जात व थर्मासारख्या परंपरांची गुलामी करण्याची मानसिकता आता सोडावी लागेल.ग्रामीण भागात याचा प्रभाव आहे.
तरुण तरुणींनी सोशल मीडिया आणि चित्रपटातातील कथा या काल्पनिक असतात.याचे भान ठेवले पाहिजे.बेजबाबदारपणे लैंगिकता दाखवण्याचा धंदा सर्रास जगभर चालु आहे. त्याला पाहुन स्वताच्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेताना विचार करावा .भरपुर केसेस मधे आत्मघातकी निर्णय घेतले गेले आहेत. हे खरे आहे. चांगली समज आल्यावर महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत.
—–
डॉ.नितीन पवार,संपादक,सत्यशोधक न्युज,शिरुर.
—— शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत ,’जिवंत न सोडण्याची धमकी देवुन मारहाण !
मारहाणीचा गुन्हा दाखल !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 23/09/2024 रोजी सकाळी 9: 30 वाजण्याच्या सुमारास सुमारास रांजणगाव सांडस,तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत जमीन गट 105 मधील रस्त्यावरून फिर्यादी फिर्यादी संभाजी दशरथ शितोळे, वय- 30 वर्षे, व्यवसाय- शेती, राहणार- रांजणगाव सांडस (लोखंडे वस्ती), तालुका-शिरूर , जिल्हा- पुणे व त्यांचे चुलते बाळासाहेब, व चुलत भाउ तानाजी असे जात असताना 1) प्रशांत सुरेश रणदिवे, 2) सुरेश चंदर रणदिवे, 3) अनिल उर्फ बाबु सुरेश रणदिवे.
सर्व राहणार- रांजणगाव सांडस, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी ,’ या रस्त्याने जायचे नाही. हा रस्ता आमच्या खाजगी मालकीचा आहे’ असे म्हणून उसाने फिर्यादी व त्यांचा चुलतभाउ तानाजी यांना मारहाण केली आहे. तसेच तानाजी यास प्रशांत रणदिवे याने दगड फेकुण मारून ,’ तुम्ही आमचेविरूद्ध केलेली केसे माघारी घे ! नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देवुन निघुन गेले आहेत.
आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ..
म्हणुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन गुरनं 790/2624 असा आहे.तर भारतीय न्याय संहिते कलम 118(1), 115(2)125,352, 351(2) (3),3(5) प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.गवळी हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. जाधव हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com