
Contents
शिरुर मधे 46 वर्षीय इसमाचा इलेक्ट्रिक शॉक लागुन दुर्देवी मृत्यु!
शिरुर मधील ओम रुद्रा काॅलनी येथील राधेश्याम चौरासिया यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु!
शिरुर,दिनांक 1 आक्टोंबर: (श्री.कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर मधे 46 वर्षीय इसमाचा इलेक्ट्रिक शॉक लागुन दुर्देवी मृत्यु झाला आहे. शिरुर मधील ओम रुद्रा काॅलनी येथील राधेश्याम चौरासिया असे विजेच्या धक्क्याने मृत्यु झालेल्या इसमा चे नाव असून वय 46वर्षे इतके आहे. त्यांच्या मृत्युने शिरुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरुर मधील ओम रुद्रा काॅलनी येथील रहिवाशी…
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद केल्याप्रमाणे हकीकत अशी की दिनांक 30/09/2024 रोजी सकाळी 9: 00 वाजण्याच्या सुमारास राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया, वय- 46 वर्षे, राहणार- ओमरूद्रा कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर, तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे हे सेंट्रींगच्या कामावर गेले होते.शिरुर दुपारी 4:15 वा सुमारास सुधीर राधेश्याम, वय- 24 वर्षे,धंदा-शिक्षण राहणार- ओमरूद्रा कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे हा त्यांचा मुलगाशिरूर मधील जेनेरिक मेडीकल येथे असताना त्याच्या ओळखीचे अनिल घावटे यांचा त्याला फोन आला. त्यांनी सांगितले की, तुझे वडील राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया,वय -46 वर्षे यांना बंधकामाच्या साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे’.
ग्रामीण रूग्णालयातुन मृत घोषित. ..
तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी मूलगा गेला असता त्याचे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले होते.त्यांना तेथे जमलेल्या लोकांचे मदतीने उपचारकामी ग्रामीण रुमालय शिरूर येथे आणले.त्यावेळी असता तेथील डॉक्टरांनी वडील राधेश्याम चौरसिया यांना तपासुन ते सायंकाळी 5: 30 वाजण्याच्या सुमारास औषधोपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद. …
शिरूर पोलीस स्टेशनमधे रजि.नं 128/2024 असा आहे. तर बी एन एस एस कलम 194 प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक हे करीत आहेत. दाखल अंमलदार हवालदार टेंगले हे आहेत. तर
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे , पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.