
डॉ.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
Contents
- 1 शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचीकडे ‘घोड गंगा’ सोडुन दुसरे काहीच मुद्दे नाहीतरी ! तर अशोक पवार हे स्वार्थीचेच राजकारण करतात ?
- 1.1 —- डॉ.नितीन पवार,आम आदमी पार्टी
- 1.1.1 शिरुर हवेली मधे आम आदमी पक्षाची ‘एन्ट्री’ होत आहे. ..
- 1.1.2 कारखाण्याबाबत बोंब ठोकणारे आधी होते एकत्र….
- 1.1.3 शिरुर हवेली: एक पार्श्वभूमी…..
- 1.1.4 मतदारांना मते देण्यासाठी अमिष ही कांग्रेसची उत्पती. ..
- 1.1.5 घोडगंगा सहकारी साखर कारखाना. ..जबादारी पवारांचीच !
- 1.1.6 मुख्य समस्या कडुन ल क्ष दुसरीकडेच. ..
- 1.1.7 इतर प्रश्नांवर पदयात्रा का नाही?
- 1.1.8 About The Author
- 1.1 —- डॉ.नितीन पवार,आम आदमी पार्टी
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचीकडे ‘घोड गंगा’ सोडुन दुसरे काहीच मुद्दे नाहीतरी ! तर अशोक पवार हे स्वार्थीचेच राजकारण करतात ?
—- डॉ.नितीन पवार,आम आदमी पार्टी
शिरुर हवेली मधे आम आदमी पक्षाची ‘एन्ट्री’ होत आहे. ..
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात सध्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना बद पडला ( की पाडला) हाच एक मुद्दा घेउन राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांची ओरड चालली आहे.
कारखाण्याबाबत बोंब ठोकणारे आधी होते एकत्र….
हे सर्व आधी एकत्रच होते.आता यांना नैतिकतेचा पान्हा फुटला आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडण्याची बरीच कारणे आहेत असे दिसते.महाराष्ट्रात सहकार चळवळ नावाची एक चळवळ पाच सहा दशकांपासून चालु आहे.सोव्हियत युनियनच्या प्रभावाचा तो काळ होता.महाराष्ट्रात सरकार तसे अपवाद सोडले तर कांग्रेसचेच असायचे.
शिरुर हवेली: एक पार्श्वभूमी…..
आता या किंवा त्या पक्षातील जुने नवे कार्यकर्ते पुर्वी कांग्रेसमधेच होते.पण एक पक्ष कुणाकुणाला उमेदवारी देणार?म्हणुन निवडणुक जिंकुन येण्याचे स्वप्न पाहणारे अनेक गाव,तालुका व जिल्हा पातळीवर असायचे.शिरुर हवेली
नंतर निर्माण झालेल्या व इतर समाजवादी विचारांच्या पक्षांची एक मर्यादा असे.त्यांच्या विचारांचा पायाच भांडवलशाही, सरंजामशाही व धर्मशाही यांच्या विरोधात होता.ते योग्यही होते.कारण हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक शोषणावर उभे राहिलेले सत्ताधारी होते. पण विचार करण्याची सवय नसणे व फक्त अनुकरण करण्याची सवय असलेल्या महाराष्ट्रातील समाजापर्यंत तो विचार गेलाच नाही.किंबहुना तो पोचवण्यात सत्ताधारी कांग्रेस पक्षाने अतोनात प्रयत्न केले.खरा खलनायक त्याकाळी कांग्रेस पक्षच होता.तरी तो निवडणुका जिंकत राहिला.
मतदारांना मते देण्यासाठी अमिष ही कांग्रेसची उत्पती. ..
कांग्रेस जनांनी मतदारांना मते पैसा,दारु,पार्ट्या,जातींमधे भांडणे लावणे इ.गोष्टी वापरुर निवडणुका जिकण्याचा एक फार्म्युला निर्माण केला.तो यशस्वी होत गेला.त्याला लालसी व संकुचित वृत्तीच्या येथील मनोवृत्तीमुळे भरपुर हातभार लागला. आजही कांग्रेस, भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्टवादी कांग्रेस अशा ज्यांचे उमेदवार जिंकतात,त्या सर्वांचा हाच फार्युला कायम आहे. हे कांग्रेसचेच अनुकरण आहे.वेगळे काही नाही. म्हणुन ईडी च्या भयाने याच पक्षांची माणसे लोंढ्या लोंढ्याने एका बाजुने दुसरीकडे व दुसर्या बाजुने पहिलीकडे चाललेले चित्र आपण पाहिले.यांना कोनत्याच नैतिकतेची चाड नव्हती.यथा राजा तथा प्रजा असते.पण लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा असेही होत असते.कारण राजाला प्रजा निवडुन देत असते.म्हणुन स्थानिक तसेच राज्यपातळीवर असणारे विरोधक Multiplayer विरोधात बोंबा मारताना दिसतात. पण हे त्याठिकाणी असते तर यांनीही तेच केले असते.यात काहीच शंका नाही.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना. ..जबादारी पवारांचीच !
घोडगंगा सहकारी साखर कारखाना असो की कोनतीही सहकारी तत्वावर चालणारी संस्था असो.ती त्यात भागीदार अनेक असतात सत्ता एकाच सरंजामी चारित्र्य असलेल्या ग्रामीण सरंजामदार कुटुंबांकडे ती गेली.तिथे त्यांनी सरंजामी वृत्तीच जोपासली.स्वत: संपत्ती जमवली.त्याच संपत्तीच्या जोरावर सुमार दर्जाच्या बुद्धीच्या सर्व जातीय व धर्मिय गुंडाना हाताशी धरुन सत्ता स्वताकडेच ठेवली.स्वतंत्रपणे आपल्या स्वताच्या ,कुटुंबाच्या सहकारी संस्था काढल्या.किरकोळ दानधर्म, उत्सव,खेळ,इ.माध्यमातुन बेरकी वृत्तीच्या लबाड लोकांना कार्यकर्ते ही संज्ञा देउन त्यांच्या मार्फत घराघरापर्यंत आपला ,’प्रभाव’ (दबाव?)निर्माण केला. ‘सगळेच सारखे’ आहेत अशी सबब देउन या प्रजेने सत्ताधारी वर्गासमोर नांगी टाकली !
शिरुरचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चा असला तरी राज्यात याच पवार विरोधकांचे सरकार आहे.त्या सरकारकडुन शिरुर हवेलीच्या साठी फंड,योजना या स्थानिक विरोधकांनी का आणल्या नाहीत.सार्वजनिक सुविधांसाठी मागण्या,पदयात्रा का गेल्या नाहीत.
मुख्य समस्या कडुन ल क्ष दुसरीकडेच. ..
यांना शिरुर हवेलीच्या लोकांच्या मुख्य समस्या असणार्या बेरोजगारी,पाणी,विज,शाळा,खर्चिक आरोग्य सुविधा,मतदार संघातील रस्त्यांची अवस्था, अपघातांचे वाढलेले प्रमाण,चोर्या, गुन्हेगारी,औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगाराच्या संधी,बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना,बेकायदेशीर दारु,वेश्याव्यवसाय, नशिले पदार्थ,अतिक्रमणे,मुली,विद्यार्थिनी ,रोड-रोमियो, बेकायदेशीरपणे वाहने चालवणे,सरकारी कार्यालयात चाललेली लाचखोरी,इ.सर्व समस्या या पदयात्रेकरुंना का दिसत नाहीत?राज्यात त्यांचेच सरकार आहे.शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील दैणावस्था कशी दिसत नाही? की फक्त एकाच ‘व्यक्तीकडे’ बोट दाखवुन सत्तेचे राजकारण करायचे आहे.
इतर प्रश्नांवर पदयात्रा का नाही?
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात आता परप्रांतीय, बाहेरुन आलेले लोक यांचा कारखान्यांच्या प्रश्नाशी काडीचा संबंध नाही. किती टक्के लोक कारखाण्याशी संबंधीत आहेत?मग बाकीच्या तमाम नागरिकांसाठी हे ग्रामीण सरंजामदार कधी काहीच ‘वाचा’ केल्याचे दिसून आले नाही.परिवर्तने आवश्यक असतेच.आमदार आता बदलला पाहिजे, हे ही खरेच आहे !आमदार अशोक पवार हे ,’आर्थिक ‘ बाबतीत संवेदनशील दिसतात.त्यांनी राज्य पातळीवर ‘चमकुन’ शिरुर हवेलीच्या लोकांच्या “जिव्हाळ्या’चे प्रश्न दुर्लक्षित का केले आहेत.लोकांमधे दिसण्यापेक्षा ते उद्योगपती बरोबर च जास्त दिसतात.मग शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील समस्या व विकास कसा होणार?विकासही न्याय्य व्हायला पाहिजे.सर्वसमावेशक ह्वाव्यला पाहिजे.तसा का होत नाही.ना ग्रामीण भागात ना शहरी भागात न्याय्य विकास दिसत नाही. सर्व कामांच्या दर्जाकडे लक्ष का देत नाहीत.प्रत्येक कामे दर्जाहिन ! त्यामुळे कामांचा पैसा संबंधीतांकडुन लुटला जातो आहे.
स्वताचा कारखाना काढणे गैर नाही, पण शिरुर तालुक्यातील शेतकर्यांनी आणि दिवंगत नेत्यांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना बंद पडणे,ही बाब निश्चितच वेदनादायी प्रश्न चिन्हे उपस्थित करणारी आहेत.