शिरुर मधील तरुणावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला ! 4 लाख रुपयांची ‘सुपारी’ दिली होती ? (पहा सी सी टी व्ही फुटेजसह)
शिरुर मधील तरुणावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला गेला आहे ?,अशी माहिती मिळाली आहे. (पहा सी सी टी व्ही फुटेजसह) ही शिरुर शहरात पुन्हा थरकाप उडवणारी घटना दिनांक 30/09/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता घडली आहे. यात कोयता व पिस्तोल यांचा वापर करण्यात आला आहे.
शिरुर मधील तरुणावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला गेला आहे.त्यासाठी 4 लाख रुपयांची ‘सुपारी’ दिली होती ?,अशी माहिती मिळाली आहे. (पहा सी सी टी व्ही फुटेजसह) ही शिरुर शहरात पुन्हा थरकाप उडवणारी घटना दिनांक 30/09/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता घडली आहे. यात कोयता व पिस्तोल यांचा वापर करण्यात आला आहे.
शिरुर मधील प्रितम प्रकाश नगर मधे वरातीत झाला होता वाद !
शिरुर शहरात जानेवारी महिन्यामधे फिर्यादी शुभम दत्तात्रय दळवी ,वय -29 वर्षे, राहणार- स्वामी समर्थ मंदिराजवळ,प्रितम प्रकाश नगर,शिरुर,तालुका- शिरुर, जिल्हा- पुणे हा त्याच्या ओळखीचा शुभम मुत्याल हा प्रितम प्रकाश नगर मधे वराती करता आला होता.यावेळी फिर्यादीची आई अलका हिला पाहुन मुत्याल म्हणाला की,’तुझ्या पोराला लय माज आला आहे.त्याला बघतो.गुन्ह्यातच अडकवतो ‘.त्यावेळी आई त्याला म्हणाली की,’तु दारु पिला आहेस.आपण सकाळी बोलु.आता तु निघुन जा’.त्यावेळी शुभम मुत्याल याने आईचा हात धरुन धक्का दिला.त्यानंतर फिर्यादीने त्याचा मित्र अभिषेक मिसाळ यास फोन केला व ‘आईस काय झाले आहे का ते पहा’ असे सांगितले. त्यानंतर मिसाळ हा तेथे गेला.तेथे त्याची व शुभम मुत्याल याची बाचाबाची झाली.शुभम मुत्याल तिथुन निघुन गेला.
” सत्यशोधक न्युज’ च्या टिम ला अधिक माहिती मिळाली आहे की ही बातमी एका यु ट्यूब चेनलवर प्रसारित झाली आहे. व व्हायरल होत आहे. याचे कारण त्या बातमीत आरोपी हे ‘जिहादी’ असल्याचे व ‘हिंदु’ तरुणावर हा हल्ला केला गेला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर काही हिंदुत्ववादी पक्ष व संघटना याविरुद्ध आंदोलन करणार आहेत. तसेच शुभम मुत्याल हा पोलिस आहे. तो कारेगावातून पोलिस स्टेशनमध्ये काम करत आहे. तो व त्याची आई हे फरार झाले आहेत. तर एक आरोपी मुंढवा येथील ‘पेशावर’ सुपारी किलर आहे.त्याला ‘खास’ बोलावण्यात आले होते. म्हणुन शिरूर पोलिसांनी हे प्रकरण काळजीपुर्वक हाताळावे.याला काही धार्मिक कांगोरे आहेत का? याचा तपास करावा.अशी ‘अपेक्षा आहे.सध्या या दोन्ही हल्लेखोरांना शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
शिरुर शहरातील नागरिक जागरुक व संयमी आहेत.शहरात जातीय,धार्मिक सलोख्याची परंपरा आहे. पण असामाजिक तत्वाबाबत सावध राहावे.’
एक बाब चांगली अधोरेखीत होत आहे की शिरुरमधील तमाम प्रशासन,कायदा सुव्यवस्था यंत्रणा,आमदार,नगरसेवक, नगराध्यक्ष,राजकीय पक्ष,तथाकथीत ‘कार्य’कर्ते हे सत्ता,पैसा,भ्रष्टाचार इ.’कार्या’मधे इतके मशगुल झाले आहेत की त्यांना अशा घटनांचे काहीच वाटत नाहीत. आणि गुन्हेगारी मानसिकतेला हे Soft Target वाटु लागले आहे. बाहेरुन येवुन शिरुरमधे आपल्या target ला अंजाम देवु लागले आहेत.पण या लोकांना शरम नावाची चीज राहिलेली नाही. “
— संपादक सत्यशोधक न्युज व टिम.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. .
त्यानंतर रात्री शुभम मुत्याल याची आई रंजना मुत्याल हीने फिर्यादी शुभम दळवी याला व्हाटस अपवर फोन करून म्हणाली की ,’ तु माझ्या मुलाबरोबर भांडण का करतोस?तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत?मी तुला मारुन टाकीन जर तु माझ्या मुलाची तक्रार केलीस तर !’.त्यानंतर त्या फोनवरुन पूरुषाचा आवाज आला.’काजी बोलतोय.जर तु तक्रार केली तर मी तुझा मर्डर करीन ! ‘ असे म्हणून त्याने फोन कट केला.त्यानंतर शुभम दळवी याच्या आईने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये जावुन शुभम मुत्याल व त्याची आई रंजना मुत्याल यांच्या विरोधात तक्रार केली होती.’शिरुर‘
30 तारखेला प्रत्यक्षात ‘सुपारी'(?) पुर्ण केली !….
त्यानंतर दिनांक 30 सप्टेंबर रोजी 9: 15 वाजण्याच्या सुमारास शुभम मुत्याल हा त्याच्या पान टपरीवर काम करत असताना जफर शेख,राहणार- कामाठीपुरा,शिरुर व फैजल काझी हे दोघे तेथे आले.त्यांनी सिगारेट मागितली. काउंटरच्या बाजुने जफर पान टपरी मधे आला.काझी हा काउंटर समोर होता.त्यावेळी जफर हा शुभमला म्हणाला,’ तुझा आज शेवटचा दिवस आहे. मी फैजल काझी आहे.मी सराईत गुन्हेगार आहे.मी आत्ताच मोक्का कायद्यातुन सुटुन आलो आहे. मी तुझी सुपारी शुभम मुत्याल व त्याची आई रंजना मुत्याल यांच्या कडुन चार लाख रुपये इतकी घेतली आहे. आज तुला मी संपवणार आहे.’असे म्हणत त्याने त्याच्या कमरेला असलेली काळ्या रंगाची लोखंडी पिस्तोल शुभम दळवी याच्यावर ताणली.
झटापटीत पिस्तोल खाली पडली तर कोयत्याने वार….
कोयत्याने वार केले गेले?
शुभम आपल्या हाताने प्रतिकार करत असताना जफर शेख याने कोयता काढुन शुभम दळवी याच्या डोक्यात मारला.या झटापटीत पिस्तोल खाली पडले.यात कोयता शुभम च्या डाव्या हातावर मारला गेला.डोक्यावर वार केले गेले.शुभम दळवी याने काउंटर समोर जोरदारपणे ढकलला.काझी मागे झाल्यावर शुभम आपल्या जवळील मित्र सागर पवार यांच्या मनी ट्रान्स्फरच्या दुकानात जावून दुकानाचे शटर खाली करुन लाक केले.
ससुन हास्पिटलला उपचार सुरू …
नंतर लोक जमा व्हायला लागल्यानंतर ते दोघे तेथुन पळुन गेले.
त्यानंतर शुभम दळवीचा मित्र राहुल गिरे हा तेथे आला.त्याने शुभम दळवी याला सरकारी रुग्णालयात नेले. तेथे शुभमवर प्राथमिक उपचार केले गेले.नंतर त्यास ससुन हास्पिटल ,पुणे येथे पाठवले गेले.दरम्याण श्री गणेशा हास्पिटल,शिरुर येथे शुभम दळवी याला डोक्यात टाके घालण्यात आले.नंतर आता तो ससुनला आहे.
वरील प्रमाणे जबाब फिर्यादी शुभम दळवी याने ससुनच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना दिला आहे.
शिरुर पोलिस करत आहेत तपास. ..
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
शिरुर पोलिस स्टेशन गुरनं 811/2024 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कलम 109,3(4),आर्म अक्ट 4(25),महा.पो का क 135 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शुभम मुत्याल, रंजना मुत्याल, जफर शेख, फैजल काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गीरी हे करत आहेत. पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com