चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर येथे आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन !
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर येथे आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन शिरुर येथील विख्यात चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात यशस्वीरित्या पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांनी संयुक्तपणे हे आयोजन केले होते.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर येथे आंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन शिरुर येथील विख्यात चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात यशस्वीरित्या पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांनी संयुक्तपणे हे आयोजन केले होते.
उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते उद्घाटन. ..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा (मुले-मुली) दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाशजी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक, आणि अहमदनगर जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झालेले आहेत. या उद्घाटन प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.नंदकुमार निकम, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव मा.शिवाजी उत्तेकर, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समीतीनचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, ऍड.सुभाष पवार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ.डि.एच.बोबडे इत्यादी उपस्थित होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.अनिलजी बोरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.’चां.ता.बोरा.महाविद्यालय, शिरुर’
Dr.Nitin Pawar,Shirur.
” शिरुर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथील बुद्धिजीवी प्राध्यापक, प्राध्यापिका,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना आवाहन आहे की आम आदमी पक्ष व अरविंद केजरीवाल यांनी देशभर राजकीय, सामाजिक व विशेषत: आम आदमी पक्षाचे दिल्लीचे जगातील सर्वात उत्कृष्ट माजी शिक्षणमंत्री श्री.मनिष शिसोदिया यांनी दिल्ली राज्यात शिक्षण क्षेत्रात जे क्रांतीकारी परिवर्तन केले आहे, त्याचा अभ्यास व विश्लेषण करुन महाराष्ट्रात सर्वाना सर्व शिक्षण मोफत व उच्च दर्जाचे मिळवुन देण्यासाठी आम आदमी पक्ष ,महाराष्ट्रातही करत असलेल्या प्रयत्नांना उर्जितावस्था आणण्यासाठी सहकार्य करावे.”
———
डॉ.नितीन पवार,संपादक व उमेदवार, आम आदमी पार्टी, शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ.
खेळाने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती – प्राचार्य डॉ. के.सी.मोहीते..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी.मोहीते यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती दिली. खेळाने शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक बळकटीकरण होते असं त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले तसेच खेळाडूंनी हार न मानता खंबीरपणे आपले खेळाचे कौशल्य पणाला लावावे असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ .महेंद्र अवघडे यांचीही उपस्थिती. .
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समीतीचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ .महेंद्र अवघडे यांनी आपल्या भाषणात पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर, आणि नाशिक विभागातून आठ संघ सहभागी झाल्याचे सांगितले व यातून एक मुलींचा व एक मुलांचा संघ आंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल असे सांगितले. सदरची आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच पुणे शहराच्या बाहेर ग्रामीण भागातील सी.टी.बोरा महाविद्यालयात होत आहे तसेच या पुढील स्पर्धाही शहराच्या बाहेरील महाविद्यालयांमध्ये होतील असे त्यांनी सांगितले. क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव मा.शिवाजी उत्तेकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सचिन तेंडुलकरचा आदर्श घ्यावा- अनिल बोरा..
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाशजी धारिवाल यांनी महाविद्यालयात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याबद्दल त्यांनी प्राचार्य , क्रीडा संचालक व सर्व सहकारी प्राध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष मा.अनिलजी बोरा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात तेंडुलकर सारख्या खेळाडूंचे आदर्श खेळाडूंनी ठेवायला पाहीजे असे सांगितले व सर्व खेळाडूंनी खिलाडू वॄत्तीने खेळ खेळावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
नाशिक विभाग (मुले) तसेच पुणे शहर विभाग (मुली) आंतर विद्यापीठय स्पर्धेसाठी पात्र झाले…..
आज या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतून नाशिक विभाग (मुले) तसेच पुणे शहर विभाग (मुली) आंतर विद्यापीठय स्पर्धेसाठी पात्र झाले त्यानिमित्ताने महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रकाशजी धारिवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अनिलजी बोरा, सचिव मा.नंदकुमारजी निकम, महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ मोहीते सर यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले व आंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी मा.नंदकुमार निकम, सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ व प्राचार्य डॉ.के.सी. मोहीते यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मंजुषा पाटील यांनी केले तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ अप्पासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com