
Dr.Nitin Pawar,Editor,satyashodhaknews.com
Contents
- 1 स्वाभिमानी आंबेडकरवादी दलितांना ‘चमचे दलित’ पुढे आणुन आंबेडकरांची चळवळ आमदारांनीच (क्वचित अपवाद !) कशी संपवली ?
- 1.1 दलित आंबेडकरवादी तरुणांनी ‘बहुजन ‘चा नाद सोडुन ‘मार्याच्या आणि मोक्याच्या’ जागांचा बाबासाहेबांचा संदेश अवलंबावा – डा.नितीन पवार,आम आदमी पार्टी उमेदवार, शिरुर.
स्वाभिमानी आंबेडकरवादी दलितांना ‘चमचे दलित’ पुढे आणुन आंबेडकरांची चळवळ आमदारांनीच (क्वचित अपवाद !) कशी संपवली ?
दलित आंबेडकरवादी तरुणांनी ‘बहुजन ‘चा नाद सोडुन ‘मार्याच्या आणि मोक्याच्या’ जागांचा बाबासाहेबांचा संदेश अवलंबावा – डा.नितीन पवार,आम आदमी पार्टी उमेदवार, शिरुर.
शिरुर,दिनांक 11 आक्टोंबर:
स्वाभिमानी आंबेडकरवादी दलितांना ‘चमचे दलित’ पुढे आणुन आंबेडकरांची चळवळ आमदारांनीच (क्वचित अपवाद !) कशी संपवली ? ते इथे मी थोडक्यात सांगतो. तसेच
दलित आंबेडकरवादी तरुणांनी ‘बहुजन ‘चा नाद सोडुन ‘मार्याच्या आणि मोक्याच्या जागांचा’ बाबासाहेबांचा संदेश अवलंबावा असे मत डा.नितीन पवार,आम आदमी पार्टी उमेदवार, शिरुर यांनी व्यक्त केले आहे.
डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य संदेश…
1. भारत बुद्धमय करा.
2. शासनकर्ती जमात बना.
3. ‘मार्याच्या आणि मोक्याच्या’ जागा हस्तगत करा.
हे प्रामुख्याने होते.ते पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना होत्या.कारण सामाजिक न्यायाच्या धोरणानंतर एक जागृत ,लढाउ व महात्वाकांक्षी वर्गाचा उदय याच लोकांमधुन होईल.याची कल्पना बाबासाहेबांना होती.त्याची ‘मुळे’ त्यांना त्यांच्या हयातीतच दिसली होती.पण या लोकांसमोर एक संभ्रम निर्माण होईल तो म्हणजे नव्या सत्ताकारणात बहुमताला महत्व असेल आणि आंबेडकरांचे अनुयायी बहुमत मिळवु शकतात का ? सत्ता ही सर्व प्रकारच्या परिवर्तनांची ‘मास्टर चावी’ आहे. हे कांशीराम यांनी ऐंशीच्या दशकात अधोरेखीत करुन प्रस्थापित राजकीय सत्तांना धक्का दिला.त्यानंतर प्रस्थापित सावध झाले.कांशीराम यांचे राजकारण स्वाभिमानाचे राजकारण होते. यात शंका नाही. पुढे मायावती यांच्याबाबत इथे लिहिणे हा विषय नाही. तर आजची दुरवस्था सत्ताधारी सर्व पक्षांनी नियोजनपुर्वक केली. त्यात तमाम आमदारांनी फार मोठी भुमिका पार पाडली. आता विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रात आहे. त्यानुषंगाने इथे मी लिहित आहे.
तर ‘आमदार’ या घटकाने (याला क्वचित एखादा अपवाद असेल)….
1.खर्या स्वाभिमानी आंबेडकरवादी तरुणांवर खास ‘पाळत‘ ठेवुनच त्यांची मुख्य कमजोरी आर्थिक साधन नसणे ही हेरुन त्यांची आर्थिक नाकेबंदी केली. त्यांची कोनतीच आर्थिक कामे कशी होणार नाहीत,याची काळजी घेतली.जाणिवपुर्वक त्याचे खच्चीकरण करणे, नोकरी न मिळु देणे, कर्ज न मिळुन देणे, अनुल्लेखाने त्याचा अपमान करणे,त्याला दारु,मटका,बाई यांचा आग्रह करुन,साहेब म्हणुन, ज्ञानी म्हणुन, होतकरु म्हणुन मागे मात्र त्याच्यावर काटाच धरुन त्याची बदलत्या काळात आर्थिक उन्नती होवु न देणे. अगदी व्याजाने पैसे सुद्धा मुददाम न देणे इ.स्वरुपात त्याची अडवणुक करुन निराश करण्याचे काम प्रत्येक तालुक्याच्या आमदाराने गावपातळीवरील त्याचे हस्तक, गुंड, सरपंच, तलाठी आणि शिक्षकांकडुन देखील लिलया पार पाडले गेले. ते ही गोड बोलून. मी हे खोटं लिहीत नाही. गाव,तालुका पातळीवर कोनताही सुज्ञ व तटस्त व्यक्ती हे पाहु शकतो. यावर पाच दहा पी.एचडी.चे प्रबंध लिहिले जावु शकतात.
गाव, विधानसभा, लोकसभा पातळीवर चमचे निर्माण केले….
2. राखीव जागांचे भक्कम “बुच” आंबेडकरांनी असे मारले होते की हे लोक, यांचे चारित्र्य सरंजामी असणारे देखील यापुढे हतबल झाले.राखीव जागांवर अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती चे उमेदवार उभे करावे लागणार होते. मग काय करायचे ? तर अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती यांच्यामधे अनेक जाती समाविष्ठ असल्याने त्या जातींमधुन उमेदवार उभा राहु शकत होता. मग त्यातील एखादा ‘गरीबडा‘ शोधुन , ‘तु घाबरु नकोस.मी आहे ना ! असा ‘भक्कम’ पणे मग मनी,मिडिया आणि माफिया उभा करुन त्याला निवडुन आणायला सुरुवात केली.त्याची गावात दोन तीन घरे,पंधरा वीस मतदान असते.उरलेले सर्व गाव वाड्या वस्त्यांवरची मते त्याच्यामागे उभी करुन त्याला निवडुन आणायला सुरुवात केली. त्याला ‘चमचा’ बनवुन टाकले. असे गावपातळीवर, विधानसभापातळीवर, लोकसभापातळीवर हे महाराष्टातील सर्व आमदारांनी केले. लोकसभेचा खासदार बराच लांब राहतो. पण आमदार सुटेबल अंतरावर असतो. त्यामुळे तो या प्रक्रियेची सुत्रे हालवतो. नवबौद्ध उमेदवार हमखास हारतो.पाडला जातो. त्यात निवडणुकीत उभे असणारे दोन तीन तरी अनुसुचित जातीतील उमेदवार असतात. असेच विधानसभा, लोकसभेला असते.त्यात एखादा खरा आंबेडकरवादी असतो. त्याला गाव ‘अती शहाणा’ , वगैरे लेबल लावुन मुददाम मते देत नाहीत. उरलेल्यांना मतामागे पैसे ,दारुची सोय, बिर्यानी इ.साठी खर्च आमदाराचेच गावपातळीवरील कार्यकर्ते करतात. ‘आपण निवडणुक जिंकु शकत नाही. मग काय करणार ?अशी मानसिकता असलेले दलित मग बनतात.एक जो ‘खरा’ असतो तो ‘लोकशाही नुसार मी सर्वात जास्त योग्य आहे.पण का निवडुन येत नाही’ याचे कारण समजणारा असतो. विधानसभा, लोकसभेतीलही चित्र असते.
‘बहुजन की मार्याच्या आणि मोक्याच्या जागा…
तो विचार करू लागतो. त्यातुन ‘बहुजन वाद’ हा एक पर्याय त्याला समजतो. दुसरा पर्याय ब्राह्मण किंवा यहुदी जे संख्येने अतिशय कमी असुन देखील जगावर राज्य कसे करतात हे तो वाचत असतो.
याच संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘मार्याच्या व मोक्याच्या जागा’ हस्तगत करण्याचा संदेश आहे. त्यासाठी ब्राम्हण,यहुदींनी किती कष्ट घेतले , हाल सोसले, जिनोसाईड सोसले याला पारावार नाही. त्या नंतर हे लोक शासनकर्ती जमात बनले. हे सखोल अभ्यास गल्याशिवाय समजणे शक्य नाही. बाबासाहेबांनी तो केला. कष्ट सोसले.जेव्हा अधिकार मिळाला तेव्हा आपल्या लेखणीने म्हणजे ज्ञानाने तडाखा दिला.हे आपण पाहतो. ज्ञान हे धनानेक्षा जास्त ताकतीचे असते. हे लक्षात ठेवले पाहिजे. धनवान व्यक्तिला त्याच्या धनाचे मोजमाप करण्यासाठी गणित येत असलेला माणुस लागतोच .
हा प्रचंड मोठा विषय आहे. AI ,Deta Science यावर उद्याचे जग चालवले जाणार आहे. त्यात पारंगता जो हस्तगत करील तो शासनकर्ता असेल. हाही मोठा विषय आहे. पण आज महाराष्ट्रातील या घटकांसमोर विधानसभा निवडणूक आल्याच्या पार्श्वभूमीवर हे मी लिहीत आहे. नंतर सविस्तर लिहीन.
‘आमदार’ आणि आंबेडकरवादी चळवळ. ..
इथे ‘आमदार’ आणि आंबेडकरवादी चळवळ ,कार्यकर्ते ,जनता ही आमदारांमुळे कसे पिडीत असतात. हे मला जाणवले. तो मुख्य सुत्रधार असतो. गावापासुन लोकसभा पातळीपर्यंत तो आणि त्याचे गाव, तालुका, बुथ,वार्ड, शहर,पातळीवरचे चमचे हे काम पार पाडुन देत असतात.ते ही या जाती समुहातीलच बहुसंख्येने असतात. एकदम अडाणी मतदार अशा कार्यकर्यांच्या ‘बोल बच्चन’ ला फसुन करत असतात.
म्हणुन ‘मेजोरिटी पॉलिटिक्स ‘ करायचे की ‘गणीमी काव्याचे’ ब्राह्मण,यहुदीं प्रमाणे करायचे हा प्रश्न आंबेडकरवादी थिंक प्रोसेससमोर आहे.