Contents
राष्ट्रीय समाज पक्ष शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढवणार : शिवाजीराव कुऱ्हाडे
राष्टीय समाज पक्ष : शिरुर हवेली तुन श्री.शिवाजीराव कुर्हाडे लढणार !
शिरुर,दि.28 आक्टोंबर : ( ‘सत्यशोधक न्युज’, रिपोर्ट )
राष्ट्रीय समाज पक्ष शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा श्री. शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी केली आहे.श्री.महादेव जानकार हे राष्टीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.ते जीवनदानी समाजसेवक, राजकीय नेते आहेत.आजन्म अविवाहित राहुन त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातुन बहुजन समाजाची राजकीय शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या तीन दशकांपासून करत आहेत.ते राज्य सरकारमधे मंत्रीपदीही राहिलेले आहेत. त्यांच्यावर मा.कांशीराम यांचा प्रभाव राहिला आहे.
राष्टीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर. ….
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार शिरूर हवेली विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे , सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय, प्रत्येक मतदाराला आपणच आमदार आहे अशी भावना प्रत्येक मतदाराला वाटेल असे परिवर्तन करणारे काम करु शकणारे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात हक्काचा माणूस शिवाजीराव कुऱ्हाडे, हे आहेत. ‘आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी निवडणूक लढवत आहे.आपला फक्त आशीर्वाद पाहिजे’ अशी प्रतिक्रिया श्री.शिवाजीराव कुर्हाडे यांनी ‘सत्यशोधक न्युज ‘ शी बोलताना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष
त्यांच्या प्रमुख मागण्या –
1) सर्व समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे .
2) आरक्षणामुळे बिघडलेला सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी, कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे 50% चे सिलिंग हटवले पाहिजे.
3) वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे.
4) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच शेतकऱ्याला शेतीपूरक उद्योग करण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे यासाठी अर्थ पुरवठा करणाऱ्या बँकांना बँक गॅरंटी सरकारने दिली पाहिजे.
5) महिलांवर /मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कठोर कायदे तयार केले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे.
6) ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
7) सर्वोच्च न्यायालयाने एस.टी.च्या आरक्षण संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत . त्यानुसार धनगर समाजाच्या एस. टी. च्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे.
8) सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.
9) सर्वांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत.
10) घरकुलांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग असा फरक न करता पाच लाख रुपये अनुदान दिले पाहिजे.’राष्ट्रीय समाज पक्ष’
हे काम प्राधान्याने रणार श्री.शिवाजीराव कुर्हाडे. …
• रांजणगाव एमआयडीस त स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार.
• चासकमान कालव्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार
चासकमान अस्थीकरण , डिंबांचा पाण्याचा प्रश्न असेल सर्व सामान्य शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचं काम करणार.
या मुद्द्यांना घेऊन शिरूर हवेली विधानसभा अधिकृत उमेदवार शिवाजीराव कुऱ्हाडे या विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहेत .
