
Contents
दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !
दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत यांचे ,’ द बेस्ट सलोन’ आता पुण्यातील वाकड येथे !
शिरुर,दिनांक 19 नोव्हेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन)

दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत यांचे व्यावहारिक,कौटुंबीक जीवनातही प्रगतीशिल पाऊल नेहमी पडत असते.दिग्दर्शक, अभिनेते असलेले श्री.रामदास राऊत यांचे ,’ द बेस्ट सलोन’ आता पुण्यातील वाकड येथे सुरू करण्यात आले आहे.
नवे ‘द बेस्ट सलोन’….
दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत यांच्या नविन सलोन शाखेचे दिनांक 18/20/2024 रोजी पुणे येथील वाकड येथे ‘द बेस्ट सलोन’या नावाने उद्घाटन संपन्न झाले आहे.दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत
आईवडिलांना प्रथम मान. …..
या समारंभप्रसंगी त्यांचा मुलगा रजनीकांत रामदास राऊत यांनी आई-वडिलांच्या हस्ते मान देऊन अर्थात श्री.रामदास बबन व आई रंजना रामदास राऊत यांना मान देऊन उपस्थितीतांच्या उपस्थितीत या नवीन दुकानाचे उद्घाटन केले.आईवडिलांना प्रथम मान देणारे रजनीकांत रामदास राऊत हे एक सुपुत्र ठरले आहेत. श्री.रामदास राऊत हे सामाजीक कार्यात सदैव तत्पर असतात.
या ‘द बेस्ट सलोन’ शॉप चे संचालक रजनीकांत रामदास राऊत यांचे वडील रामदास बबन राऊत व आई रंजना रामदास राऊत यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन करून रजनीकांत यांनी आलेले पाहुणे व इतर मान्यवरांनाही सन्मानित केले.
पुण्यात शाखा…..
पुणे, वाकडे येथे हे भव्य दिव्य अशा आधुनिक पद्धतीच्या ‘ द बेस्ट सलोन’ या शॉप चे उद्घाटन केले गेले आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना राऊत परिवाराचे वतीने सन्मानिते करण्यात आले. सर्व पाहुण्यांनी राऊत परिवाराच्या वतीने’ द बेस्ट सलोन’ या समूह उद्योगाला सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस फिल्म इंडस्ट्री मधील फिल्म डिरेक्टरी श्री.विक्रमजी थोरात सर ,अमोल काळे ही उपस्थित होते.असंख्य चाहते,मित्र परिवार व फिल्म कलावंत यावेळी उपस्थित होते.
शिरुरमधे ‘राऊत मेन्स पार्लर….
श्री. रामदास राऊत सर यांचे शिरूर मध्ये ‘साई बिजनेस कोर्ट’ येथे ‘राऊत मेन्स पार्लर’ या नावाने पहिली शाखा २०१२ साली सुरू झाली. त्यानंतर आता पुणे शहरामध्ये वाकड येथे ही दुसरी शाखा सुरू केली आहे.
बारा वर्षाच्या तपानंतर ही दुसरी 2024 ला शाखा सुरू होत आहे.याचे सर्वांनी कौतुक केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णकांत रामदास राऊत व पायल कृष्णकांत राउत यांनी केले .