
श्री.शरदचंद्र पवार : हेच ते करु शकतात!
Contents
- 1 गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार?
- 1.1 बारामतीचे पवार कुटुंब राजकारणात सुरक्षित राहणार?
गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार?
बारामतीचे पवार कुटुंब राजकारणात सुरक्षित राहणार?
शिरुर,दिनांक 21 नोव्हेंबर : (संपादकिय)

गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार? अशी माहिती प्राप्त होत आहे. याचे कारण बारामतीचे पवार कुटुंब राजकारणात सुरक्षित राहणार की नाही ? हा प्रश्न आणि त्याचे उत्तर सकारात्मक असल्याचे विविध माध्यमांतुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या व्यक्त होत आहे.
शिरुर हवेली विधानसभा निवडणूक देशभर लक्षवेधक. …
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील माध्यमांनी चर्चेचा आणि लक्ष वेधून घेणारा विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 महाराष्ट्र राज्य यासाठी चर्चीला होता. अशा स्थितीमध्ये महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न करण्यात आलेली होते. सर्व प्रकारचे पत्ते वापरले गेले. सर्व प्रकारची विधानसभेचा कार्ड खेळली गेली. मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला असल्याची चर्चा समाजामध्ये आहे.
शरदचंद्रजी पवार यांचे ऐतिहासिक महत्व. ….
त्याचबरोबर आणखीन महत्त्वाची चर्चा आता दिनांक 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या नंतर माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये, पत्रकारांमध्ये राजकीय तज्ञांमध्ये चाललेली आहे. ती अशी आहे की बारामतीचे श्री. शरदचंद्रजी पवार यांचे कुटुंब, नातलग, त्यांचे राजकारण, त्यांचे महाराष्ट्रातील असणारे महत्त्व, देशपातळीवर असणारे श्री.शरचंद्रजी पवार यांचे महत्त्व, देशपातळीवर महायुती आणि इंडिया आघाडी यांचे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस झालेले राजकारण. त्यानंतर आलेले निकाल, त्यानंतर देशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक आली.या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा घटक माननीय शरदचंद्रजी पवार हे होते. माननीय शरदचंद्रजी पवार यांनी मोठ्या कष्टाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वयाच्या 84 व्या वर्षी आणि एका आजाराने त्रस्त असताना देखील जे जी लढाई दिली ती अभूतपूर्व आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव अशी लढाई मानली जाणारी आहे. यात शंकाच नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. जर हरियाणा सारखे ‘वेगळे’ काही केले गेले तरच आणि तरच महायुतीचे सरकार राज्यात येऊ शकते.अन्यथा ते कदापि येण्याची शक्यता जानकारांना देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील एकेक विधानसभा मतदारसंघ माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ‘मायक्रो लेव्हल’ पर्यंत जाऊन त्यांच्या यंत्रणेद्वारे लढत होते. 23 तारखेला त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला,देशाला आणि जगाला दिसेल अशी शक्यता आहे.

अजित दादा पवार बारामतीसाठी?….
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा शरदचंद्रजी पवार यांचा बालेकिल्ला तर आहेच. पण पश्चिम महाराष्ट्र हा देखील श्री. शरदचंद्रजी पवार यांचा बालेकिल्ला आहे.यामध्ये बारामतीची निवडणूक आणि शिरूर हवेली ची निवडणूक लक्षवेधक होती. यात शंकाच नाही. अशा परिस्थितीमध्ये अजित दादा पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली. अर्थातच युगेंद्र पवार हे वयाने लहान असलेले आहेत आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमी विधानसभेसाठी अजितदादा पवार आणि लोकसभेसाठी सुप्रियाताई सुळे अशा पद्धतीने विचार करत असते. आणि अजित पवार हे हरणे बारामतीसाठी फायद्याचे नाही. हे या मतदारसंघातील लोकही बोलत होते.आणि युगेंद्र नवखे असल्याने ते हरले असे लोकांकडुन समजले जाे काही अवघड गोष्ट नाही.
बापु विसरु माऊली ! …..
उरला प्रश्न तो शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा. माहिती अशी मिळत आहे की अजित दादा पवार यांचा विजय सुकर व्हावा म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पडद्यामागील हालचाली तीव्र आणि फास्ट झाल्या. आणि बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये अजितदादा पवार यांचा विजय निश्चित झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. दुसऱ्या बाजूला शिरूर झालेली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके आणि महाआघाडीचे उमेदवार अशोक बापू पवार यांच्या बद्दल लढाई अत्यंत तुंबळ चालली होती. अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही या लढाईचे भाकीत करता येणे अवघड वाटत होते.

मतदारांना तरसवले?…..
मात्र निदर्शनास हे आले की महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शेवटच्या दिवशी ‘हात’ आखडते घेण्यात आले. हे जाणीवपूर्वक करण्यात आले असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे . कारण वरून तशा प्रकारचे सूचना आली होती, असे चर्चा आहे. म्हणजे माऊली आबा कटके यांची माणसे शेवटच्या दिवशी पूर्वनियोजित रित्या मतदारांनी दुर्लक्ष करत होती. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि ‘महत्त्वाची भूमिका'(?) ठरणारा ‘मनी गेम'(?) ची तीव्रता कमी करत होते .तर दुसऱ्या बाजूला महागडीचे उमेदवार त्यांची त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे ‘पोचवणारे’ यांनी आपले काम वाढवलेले दिसत होते. 25% मतदारांना ‘ते'(?) मिळाले व 75 टक्के मतदान ‘उपेक्षित’ राहिले.असे चित्र इथं दिसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक नाराज झाले आणि संताप व्यक्त करत असताना दिसले. त्याचा परिणाम मतदानावर झाला. उशीरा पर्यंत मतदार घरातून बाहेर पडलेले नव्हते. आणि शेवटच्या तासात एकदम मतदार घराबाहेर पडले .तेही थोड्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक नाराज होऊन किंवा चिडून जाऊन त्यांना ‘काय वाटले’ ते त्यांनी तेथे केलेले आहे. अशी मतदारांची चर्चा केल्यानंतर माहिती मिळाली आहे.अनेकांनी वैतागून इतर पक्षांना, पक्षाच्या उमेदवारांना मदत मते दिलेली आहेत.असे सांगितले तर अनेकांनी मतेच दिली नाहीत.अनेकांनी नोटावर बटन दाबलेले आहे.
बापुंचे पारडे शेवटच्या तासात खाली?…..
परिणामी महाआघाडीचे उमेदवार अशोक बापू पवार यांचे पारडे खाली झुकलेले असल्याचे चित्र आहे. तर महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांचे पारडे वर गेलेले दिसले असे. हे एक निरीक्षण आहे. मात्र 23 तारखेला मतदानाच्या मोजणीनंतर पूर्ण स्पष्ट होईल.
तरीदेखील ‘हरियाणा’ मध्ये जे करण्यात आले होते .ते करण्यात ते होईल , अशी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकांच्या सभांमध्ये सांगितले होते. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी 160 जागांपर्यंत पोचतील असे सांगण्यात आलेले होते. ‘हरियाणा पद्धत’ जर यशस्वी ठरली तरच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आश्चर्य वाटणार नाही.पणे इथे या पद्धतीच्या ‘आडवा’ देशातील खरा ,’ चाणक्य’ शरद पवार हे आहेत. मोदी शहांचे इथे ‘चालण्याची’ शक्यता जवळजवळ नाहीच !
मात्र शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीतरी ‘गेम झाला’ आहे अशी चर्चा मात्र आज दिवसभर चालू होती. आता आपण 23 तारखेलाच पाहू. त्यानंतर काय ते समजायचे ते सर्वण समजून जातील यात शंका नाही !