
नरेंद्र मोदी
Contents
- 1 ‘गोदी मीडिया’कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरू ! महायुतीचा विजय होईल ?
- 1.1 ‘गोदी मिडीया’ चे एक्झिट पोल कोणत्या दिशेने चाललेले आहेत? महाआघाडी बहुमतापर्यंत पोहोचेल का?
- 1.1.1 शिरूर, दिनांक 22 नोव्हेंबर : (संपादकीय)
- 1.1.2 मुख्य प्रवाहातील मिडीया गोदी मीडिया…..
- 1.1.3 महाआघाडी बरोबर ‘इतर’ मिडिया….
- 1.1.4 नवी पिढी आणि जुने मापदंड…..
- 1.1.5 अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपच्या कोंडीत !….
- 1.1.6 राहुल गांधी मोठ्या मनाचे….
- 1.1.7 तिसरी आघाडी ,बंडखोर, अपक्ष,वंचित आणि हरियाणा पॅटर्न….
- 1.1.8 मोदी व योगी यांची विधाने आणि गहरा अर्थ …..
- 1.1.9 पॅटर्नचा क्लायमॅक्स सुरु ?
- 1.1.10 पवारांची पावर….
- 1.1.11 वंचित बहुजन आघाडी व एम आय एम. ..
- 1.1.12 भाजपची 28℅ ची व्होटबंक….
- 1.1.13 About The Author
- 1.1 ‘गोदी मिडीया’ चे एक्झिट पोल कोणत्या दिशेने चाललेले आहेत? महाआघाडी बहुमतापर्यंत पोहोचेल का?
‘गोदी मीडिया’कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरू ! महायुतीचा विजय होईल ?
‘गोदी मिडीया’ चे एक्झिट पोल कोणत्या दिशेने चाललेले आहेत? महाआघाडी बहुमतापर्यंत पोहोचेल का?
शिरूर, दिनांक 22 नोव्हेंबर : (संपादकीय)
(साभार सर्व प्रतिमा विकिपीडिया )

‘गोदी मीडिया‘ कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरु झालेला दिसत आहे..त्यामुळे महायुतीचा विजय होईल !
एक्झिट पोल कोणत्या दिशेने चाललेले आहेत? महाआघाडी बहुमतापर्यंत पोहोचेल का? अशा दोन्ही प्रकारच्या शक्यता आजच्या घडीला दिसू लागलेल्या आहेत. की काही दिवसांत राष्ट्रपती राजवट लागेल का? अशा शक्यताही राजकीय तज्ञ सांगताना दिसत आहेत. मात्र आता फार वेळ राहिलेला नाही !काय आहे ते उद्या समजेल !
मुख्य प्रवाहातील मिडीया गोदी मीडिया…..
ज्याला ‘गोदी मीडिया’ असे म्हटले जाते . ती मुख्य प्रवाहातील माध्यमेही, चॅनल, इंग्लिश , हिंदी आणि मराठी वृत्तपत्रे,सोशल मीडिया इत्यादी सर्व यंत्रणा नेहमीप्रमाणे निकालाच्या अगोदर एक किंवा दोन दिवस महायुतीचे सरकार येणार ! महायुतीचे सरकार येणार ! बहुमताचा आकडा पार करणार ! बहुमताचा आकडा पार करणार ! यांच्यामुळे मते विभागली जातील, मुस्लिमांची मते इकडे जातील, तिकडे जातील ,दलितांची मते इकडे जातील ,तिकडे जातील ,ओबीसींची मते इकडे जातील, तिकडे जातील, मराठा समाजाची मते इकडे जातील’, तिकडे जातील अशा प्रकारची गणिते मांडून एक वातावरण निर्मिती निर्माण करून ठेवत असतात आणि मतमोजणीच्या वेळेस बाहेर निकाल सांगताना कधी हा पुढे, तर कधी तो मागे ,परत तो पहिला पुढे तर दुसरा मागे, अशा पद्धतीने मागेपुढे करत करत आपले ‘टार्गेट’ पूर्ण करतात. असे म्हटले जाते .अलीकडे याला ‘हरियाणा पॅटर्न’ असे सुद्धा म्हटले गेलेले आहे आणि मतदानाच्या मोजणी दरम्यान ‘वेगळे काहीतरी‘ केले गेले जाते आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे साथीदार यांना निवडून आणले जाते. अशा पद्धतीच्या चर्चा देशात झालेल्या आहेत.
महाआघाडी बरोबर ‘इतर’ मिडिया….
मुख्य माध्यमां व्यतिरिक्त दुसरा माध्यम प्रवाह जो आहे तो महाआघाडीच्या बाजूने झुकलेला असतो. महाआघाडी कशा पद्धतीने बहुमताचा आकडा पूर्ण करेल वगैरे सर्व बाबी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तोही प्रकार सुरू आहे. उद्या मतमोजणीच्या वेळेस महाराष्ट्रातील जनतेने नेमके काय केले आहे हे समजेल. महाराष्ट्राचा डिएनए निश्चित वेगळा आ हेतू (?) .अशा परिस्थितीमध्ये उत्तर भारतातील मतदारांच्या मानसिकतेची तुलना महाराष्ट्रातील मतदारांच्या मानसिकतेशी करणे योग्य ठरणार नाही.
महाराष्ट्रातील मतदार केवळ पैसा घेऊन त्याला मतदान करतोच. याची काही खात्री देता येत नाही. मुस्लिम मतदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच मतदान करतो हे काही अंशी खरे असले तरी पूर्णपणे असे म्हणता येत नाही. तेच दलित, मराठी, ओबीसी, आदिवासी या घटकांच्या बाबतीत म्हणता येईल .
नवी पिढी आणि जुने मापदंड…..
यामध्ये आलेली नवीन पिढी ; या पिढीची एक मानसिकता आहे . तिला पूर्वीचे ‘मापदंड’ लावता येण्यासारखे किंवा त्यांना ते जुळतात असे दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि नेहमीप्रमाणे माध्यमांचा टीआरपी वाढवण्याचा खेळ चालू होईल .आणि शेवटी सर्व निकाल हाती येतील आणि त्यानंतर 25 तारखेपर्यंत सरकार न बनवल्यास आणि अधांतरी लोककौल निर्माण झाला तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येतील अशी पण परिस्थिती आहे. जर अशी संधी मिळाली तर महाराष्ट्र आणि केंद्रात असलेले भाजप सरकार, राष्ट्रपती,राज्यपाल हे राष्ट्रपती राजवट लावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर पडणे अवघड जाईल. याची जाणीव आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपच्या कोंडीत !….
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विशिष्ट जागा देऊन त्यांना इतरत्र कुठे पळता येऊ नये याची खबरदारी भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे.अजित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर येथील किंवा एकनाथ शिंदेच्या बाबतीत असे काही वेगळे घडेल अशी काही शक्यता महाराष्ट्रात नाही.
राहुल गांधी मोठ्या मनाचे….
भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा लढवलेल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असेल .त्या तुलनेने काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा लढवल्या असल्या तरी त्यांचे किती उमेदवार निवडून येतील यावर काँग्रेसचे स्थान अवलंबून राहील. उद्धव ठाकरे यांच्याकडे राहुल गांधी यांनी झुकते माप दिलेले आहे. उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या सभा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आमने-सामने उभे करण्यात आलेले आहेत. याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल हे नक्कीच. याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचे उमेदवारही आमने सामने असल्याने त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार हे वरचढ ठरतील.
तिसरी आघाडी ,बंडखोर, अपक्ष,वंचित आणि हरियाणा पॅटर्न….
तिसरी आघाडी म्हणून निर्माण झालेली बच्चू कडू आणि राजू शेट्टी दोन-तीन जागांवर प्रभावी ठरतील. बच्चू कडू यांची स्वतःची जागा मिळवतील. ते काही विशेष नाही. वंचित बहुजन आघाडी एक जागा तरी जिंकेल असे वाटत नाही. बंडखोर आणि अपक्ष हे मात्र बरीच मते खातील आणि ती खाण्यासाठीच त्यांना उभे केलेले आहे. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रसद पुरविण्यात आलेले आहे. त्यांचे मतदान त्यामुळे वाढणार आहे.त्याचा परिणाम महायुती आणि महाआघाडीच्या कामगिरीवर होईल . किंवा तसा तो दाखवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. याला ‘हरियाणा पॅटर्न’ असे म्हणतात .
मोदी व योगी यांची विधाने आणि गहरा अर्थ …..
अशी चर्चा विशेषता हरियाणा मध्ये भारतीय जनता पक्षांनी निवडणूक जिंकल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये देशात झालेली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बऱ्याच जागा लढवत आहे. तीन चार ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची लढत देत आहेत. मात्र इतर ठिकाणी ते सुद्धा किती मते खातात यावर महायुती आणि महाआघाडी यांचे यश अवलंबून राहील. मनसेने जास्तीत जास्त उमेदवार उभे केलेले आहेत. त्याचाही उद्देश हा ‘ वेगळा’ असू शकतो . उमेदवारांची संख्या वाढवणे, अपक्षांच्या संख्या वाढवणे,बंडखोरांची संख्या वाढवणे आणि त्यातूनच ‘हरियाणा पॅटर्न’ प्रमाणे ‘गेम’ करणे आणि सत्ता स्थापन करणे .अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्ष सत्तेत येईल अशी विधाने केलेली आहेत. त्यात बराच ‘गहरा’ अर्थ आहे .
पॅटर्नचा क्लायमॅक्स सुरु ?
आता जर मुख्य प्रवाहातील माध्यमे प्रचाराला लागली आहेत आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि वातावरण निर्मिती करणे आणि त्यानंतर मतदानाच्या मोजणीच्या वेळेस ‘वेगळे घडणे’ हा एक भारतीय जनता पक्षाचा फॉर्म्युला राहिलेला आहे.तो महाराष्ट्रात चालेल की नाही यावर या नवीन येणाऱ्या विधानसभेतील सत्तेचा गणित अवलंबून राहणार आहे. कागदावर लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये मताधिक्य मिळवलेले होतें. पण त्यानंतर बराच काळ मध्ये गेला आहे. ‘लाडकी बहीण’ सारखी योजना; या योजनेचा फायदा थोडाफार हा होईलच असे मानले जाते .कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि मुस्लिमांचे मन आपल्याकडे वळवण्यामध्ये त्यांना मिळालेले यश ही उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासाठी फार मोठी जमिनीची बाजू मांनली जाते.
पवारांची पावर….

राहुल गांधींनी त्यांना जास्त जागा सोडलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री पदामधे रस नसल्याचे दाखविले आहे. त्याचा परिणाम देखील महाआघाडीच्या बाजूने दिसेल .शरद पवार यांनी भावनिकपणे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जागा लढवत जोरदार मुसंडी मारली तर आश्चर्य नाही .जरांगे फॅक्टर यांनी मराठवाडा भागामध्ये विशेषतः महाआघाडीला फायदा होईल. अशा पद्धतीचा भूमिका घेतलेली होती. त्याचा फायदा महाआघाडीला होईल.
वंचित बहुजन आघाडी व एम आय एम. ..
एम आय एम देखील 17 जागा लढवत असल्याचे दिसत आहे. त्या मुस्लिम बहुल भागातील जागा लढवत आहेत. परंतु त्यांच्याही लक्षात आलेले आहे की एम आय एम पेक्षाही उद्धव ठाकरे किंवा महाआघाडी यांच्याकडे मुस्लिम समाज चाललेला आहे. दलित समाज प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर बऱ्याच प्रमाणामध्ये राहील.त्यामुळे महाआघाडीची काही मते विभागली जातील.(तसे दाखवण्यासाठी उपयोग होईल. हेही शक्य आहे .जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना टार्गेट केल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान काही ठिकाणी निश्चित करेल. त्याचाही फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.
भाजपची 28℅ ची व्होटबंक….

भारतीय जनता पक्षाचा व्होट बँक असलेला 28 टक्के मतदार हा जागेवरच ठेवण्यासाठी चलाखीने उत्तर भारतातून महाराष्ट्रात येऊन योगिंनी ‘बटेंगे तो कटेंगे’असे विधान केले. ते त्या 28% वोट बँकेसाठी होते आणि ते स्थिर असते .मात्र नंतर ते जास्त महाराष्ट्रामध्ये फिरकले नाहीत. मोदी देखील ‘एक है तो सेफ है’असे विधान प्रचारात करून परत निघून गेले.
या व्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या स्थानिक घटक, स्थानिक समस्या ,बेरोजगारी ,मराठा आरक्षण, गरिबी, दुष्काळ ,विकास, गुन्हेगारी ,महिला अत्याचार ,मराठा ओबीसी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न इत्यादी अनेक प्रकारचे मुद्दे थोडे अधिक प्रमाणात मतदारांच्या मनावर परिणाम करतील. त्याचा देखील एक परिणाम महाआघाडी किंवा महायुतीच्या विजयावर किंवा पराजयावर थोडासा होणार आहे.
एकंदरीत उद्याचा दिवस हा फारच महत्त्वाचा असून महाराष्ट्राला स्थिर सरकार येईल की नाही ?अस्थिर सरकारी येईल का ? पुन्हा घोडा बाजार होईल का ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी केंद्राला मिळेल का ? नाराज असलेले अनेक घटक आतून स्वतःच्याच पक्षाचे नुकसान करण्याच्या बाबी उदाहरणार्थ फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचे पाय मागे ओढतील का? इत्यादी अनेक महत्त्वाचे घटक शेवटी महत्त्वाचे ठरणार आहेत.
मात्र जे होईल त्याला सामोरे जाण्याची जाण्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तयार असतें. महाराष्ट्रातील जनतेचा डीएनए वेगळा आहे . तो नक्की काय आहे ते तो उद्या दिसल्याशिवाय राहणार नाही !