
अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान शिरूर पोलिसांसमोर!
Contents
शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले !
शिरुर मधे हे काय चालले आहे?
शिरुर,दिनांक- 29नोव्हेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले गेले आहे. शिरुर मधे हे काय चालले आहे? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. याचा अर्थ चोरटयांना आता पोलिस स्टेशन एवढे जवळ आहे याचे काही भय वाटत नाही. नागरिकांना मात्र आता भय तर वाटतेच ! पण आश्चर्यही वाटले आहे हे नक्की !
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकीकत अशी की दि. 29/11/2024 रोजी दुपारी 2: 00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हददीत सुजरनगर येथील हॉटेल श्रेयश शेजारील पुलावर जुने पुणे शिरूर हायवे रोडवर, हॉटेल जोगेश्वरी समोर अशा अंतरात शिरूर, तालुका-शिरूर ,जिल्हा- पुणे या ठिकाणी छबुबाई नारायण बनसोडे, वय -55 वर्षे, व्यवसाय -खाजगी नोकरी राहणार – मु.पो. पाचर्णेमळा, शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे या ठिकाणी त्यांना दोन अनोळखी इसमांनी ‘ आजी’ म्हणुन बोलावुन घेवुन बोलण्यामध्ये गुंतवुन दिशाभुल करून त्यांची फसवणुक केली.’शिरुर‘
त्यांचे खालील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिणे घेवुन निघुन गेले आहेत.
म्हणुन त्यांनी त्या दोन अनोळखी इसमांवर, वय 25 वर्षे (अंदाजे) यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
चोरीस गेलेला माल पुढीलप्रमाणे आहे —
1) 18,000/- रुपयाचांचे एक सोन्याच्या धातुचे मनी मंगळसुत्र तीन ग्राम वजणाचे जु.वा. किं.अं.
२) 60,000/- रुपये ; दोन सोन्याच्या धातुचे कानातील फुल वेलसह दहा ग्राम वजणाचे जु.वा.किं.अं.
——————————–
असे 78,000/- रुपये एकूण !
अज्ञात चोरटयाविरुद्ध गु.र.न.965/2024 असा नोदवला आहे.तर भारतीय न्याय संहिता कलम 318, 3(5) गुन्हा दाखल केला आहे.
दाखल पोलीस अंमलदार पोलिस हवालदार श्री. वाघमोडे हे आहेत. तर तपासी पोलीस अधिकारी पोलिस हवालदार श्री. जगताप हे आहेत.
प्रभारी पोलीस अधिकारी श्री. संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.