
Contents
- 1 एकनाथ शिंदे आता नाचविणार मोदी शहा यांना !
- 1.1 एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे अनेक रहस्यांची चावी ?
- 1.1.1 शिरूर ,दिनांक 1 डिसेंबर :
- 1.1.2 मागचे एपिसोड आठवा….
- 1.1.3 आता उलटा खेळ सुरू झाला. …
- 1.1.4 ओबीसींचे ध्रृवीकरण आणि युज अँड थ्रो प्रकृती….
- 1.1.5 गृहखाते एवढे जिव्हाळ्याचे का?…
- 1.1.6 जिती हुई बाजी को हारणा पड सकता है’ !
- 1.1.7 एवढ्या जागांचे ‘रहस्य’. …
- 1.1.8 विनोद तावडे यांची शहांशी भेट…..
- 1.1.9 दहा दिवसांतही मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. ..
- 1.1.10 शरद पवार यांचे राजकारण संपणारे राजकारण नाही…..
- 1.1.11 About The Author
- 1.1 एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे अनेक रहस्यांची चावी ?
एकनाथ शिंदे आता नाचविणार मोदी शहा यांना !
एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे अनेक रहस्यांची चावी ?
शिरूर ,दिनांक 1 डिसेंबर :
(संपादकीय)
एकनाथ शिंदे आता मोदी आणि शहा यांना आपल्या तालावर नाचवणार अशी चिन्हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात दिसायला सुरुवात झाली आहे . महाराष्ट्रातील निवडणुका अखेर झाल्या. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 132 जागा एकट्याला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांना आणि अजित दादा पवार यांना जागा मिळाल्या. त्यानंतर आता नियमाप्रमाणे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवड होणे हे क्रम पात्र होते. परंतु तसे होणार नाही.
मागचे एपिसोड आठवा….
मागचे एपिसोड आठवले तर पहा ! एक वेळेस शिंदे कमकुवत होते , अजित दादा पवार कमकुवत होते. त्यावेळेस दोघांना त्यांच्या आधीच्या ‘छावणी’ तून म्हणजेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये होते. भारतीय जनता पक्षाच्या छावणीत / आघाडीत या दोघांना खेचून आणले,घसेटुन आणले,मुसक्या बांधुन आणले. तेव्हा ते काही इतक्या आनंदाने आलेले/ गेले नव्हते. तर त्यांच्या काही बाजु कमकुवत पडलेल्या होत्या . त्यामुळे त्याच्या आधारावर त्यांना ‘धाक’ दाखवून भारतीय जनता पक्षाच्या छावणीत ओढुन नेले गेले . आणि पुढचा इतिहास , राजकारण आपण सर्वांनी पाहिले .
आता उलटा खेळ सुरू झाला. …
आता उलटा खेळ सुरू झाला आहे . भारतीय जनता पक्षाला बहुमताच्या जवळपास जागा मिळालेल्या असल्या तरी पूर्ण बहुमत होईल . इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि इंडिया गाडी मिळून 146 चा आकडा पार करू शकतात.’एकनाथ शिंदे’

ओबीसींचे ध्रृवीकरण आणि युज अँड थ्रो प्रकृती….
एक दुसरी महत्त्वाची बाब अशी की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी जाणे म्हणजे राज्यातील मराठा समाजाची प्रचंड नाराजी ओढवून घेणे हे आहे. असे विनोद तावडे यांनी मोदी शहा यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची चर्चा आहे.जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात म्हणजे ब्राम्हण विरोधात मराठा मतांचे ध्रुवीकरण केले होते. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने त्याविरोधात ओबीसींचे ध्रुवीकरण करून ओबीसींची मते मराठा विरोधामध्ये प्रतिक्रिया म्हणून एकत्र आणली. आणि त्यानंतर ओबीसीचा मुख्यमंत्री काही देण्याची भारतीय जनता पक्षाची मानसिकता नाही.
देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. म्हणजे ओबीसींची असा वापर केला गेला अशी भावना ओबीसींमध्ये निर्माण होईल याची भीती भारतीय जनता पक्षाला आहे. मुख्यमंत्री तर ओबीसी मधला कोणी करता येण्यासारखी शक्यता दिसत नाही. म्हणजेच ओबीसीचा नेहमीप्रमाणे युज अँड थ्रो असा वापर करण्यात आला. हे ओबीसींना आता समजणे अवघड नाही.
गृहखाते एवढे जिव्हाळ्याचे का?…
एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्याचे पदोन्नती किंवा त्याच पदावर राहण्याची अपेक्षा असणार .ते केंद्रात जाणे म्हणजे महाराष्ट्रात संपणे असा अर्थ आहे. उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे दिले तर गृहमंत्री पद त्यांना हवे आहे किंवा ते बाहेरून पाठिंबा देऊन गृहमंत्री पद मागत आहेत. आतापर्यंत सहसा गृहमंत्री पद कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या कोणाकडे दिल्याची फार कमी उदाहरणे आहेत. उत्तर प्रदेशांमध्ये गेली 25 वर्षे ग्रहखाते मुख्यमंत्र्याकडे असते आणि पोलिसांचे दांडके वापरून पहिजे त्या गोष्टी करून ,घडवून आणता येणे. त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्याला शक्य असते. कुणाला वाचवायचे कुणाला नाही वाचवायचे. याच्याबरोबरच मोठ्या प्रमाणात जमा होणारा सर्व प्रकारचा ‘ हप्ता’ कुणाकडे जाणार हा प्रश्न असतो.
त्यामुळे गृहखाते फार जिव्हाळ्याचे पद असते म्हणे ! एक वेळेस मुख्यमंत्री पद नाही मिळाले तरी चालते. पण गृह खाते आपल्याकडे असावे असे राज्यातल्या प्रमुख नेत्यांना वाटत असते .अशीच परिस्थिती महाराष्ट्र मध्ये निर्माण झालेली आहे.

जिती हुई बाजी को हारणा पड सकता है’ !
दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार एवढ एवढे सगळे एकत्र आले तर 146 चा आकडा पार होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाला ‘जिती हुई बाजी को हारणा पड सकता है’ ! ही ही बाब एक वेळ भाजप साठी जास्त अवघड नाही ! ते काहीतरी तोडगा काढतील ! परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत मिळालेल्या विजयाची बरीच ‘रहस्य’ आहेत,असणार ! अगदी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे देखील ! ते एकनाथ शिंदे आणि पवार आणि आणखीन बऱ्याच जणांना माहिती असावे. असे दिसते आणि जर त्यांनी तोंड उघडले तर आज पर्यंतचा सगळा खेळ भारतीय जनता पक्षाच्या उलटा पाडु शकतो. एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जोरदार बार्गेनिंग करण्याची हिम्मत एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. आणि अजित पवार देखील स्वगृही परतणे अवघड नाही. कारण त्यांनाही ‘आतली’ गोष्ट माहिती आहे. त्यांनाही आश्चर्य वाटले होते की आपण एवढ्या जागा आपण कशा जिंकलो? आणि एकनाथ शिंदे यांनाही असेच वाटले होते.
एवढ्या जागांचे ‘रहस्य’. …
एवढ्या जागांचे ‘रहस्य’ त्यांना माहीत असणारच. याच कारणामुळे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री केला तर महाराष्ट्रातील मराठा दुखावला गेलेला असेल.मराठा/कुणबी आरक्षण फडणवीसांनी हिरावले अशी मराठा समाजाची भावना आहे. आणि ओबीसी देखील आपला फक्त वापर केला गेला असल्याच्या भावनेने भारतीय जनता पक्षावर कायमचा नाराज होऊ शकतो . लाडकी बहीण योजना हे सगळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देणगी आहे हे सर्वांना दिसते आहे.पण देवेंद्र फडणवीस साधे चाणक्य नाहीत . ते देखील एकनाथ शिंदे यांचा डाव डाव पलटवण्याचा प्रयत्न करत असणारच.’मी पुन्हा येईन’ असे ते म्हणाले होतेच !
विनोद तावडे यांची शहांशी भेट…..
भारतीय जनता पक्षाचेच विनोद तावडे हे अमित शहा यांना भेटले आहेत आणि काय सांगायचं ते त्यांनी सांगितलेले आहे. मुरलीधर मोहोळ नावाचा एक नवा पर्यायही भारतीय जनता पक्ष विचार करत असल्याबद्दल चर्चा उडालेली आहे. आणि जर एकनाथ शिंदे सोडून जर तिसराच माणूस पुढे आला देवेंद्र फडणवीस सोडून आणि अजित पवार यांच्या देखील पत्नीने पवारांचा विचार आता मुख्यमंत्री पदाबाबत व्हायला हवा आहे. अशा अर्थाचे शब्द बोललेल्या आहेत.
दहा दिवसांतही मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. ..
अशा परिस्थितीमुळे गेले नऊ-दहा दिवस निवडणुका होऊन बहुमत मिळवून देखील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही ! यातच आत काय चालले आहे याची भनक सर्वांना लागलेली आहे. हे नक्की ! शरद पवार हे इंडिया आघाडीकडील 49 जागांबरोबर आहेत आणि त्यांच्या जोडीला अजित पवार ,एकनाथ शिंदे आले आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले तर लाडकी बहीण योजना देखील चालू ठेवू शकता येईल आणि भारतीय जनता पक्षाच्या युज अँड थ्रो प्रकृतीला जशास तसे उत्तर देता येतील असा विचार महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चाललेला आहे .बाबा आढाव यांनी उपोषण चालवलेली आहे. निवडणुकीचा निकाल ईव्हीएम मधुन हेराफेरी करून आणला गेला आहे. यासाठी याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर छोटी मोठी अनेक उदाहरणे, तक्रारी, माहिती रोज समोर पुढे येत आहे आणि एक प्रकारचे मोठे आंदोलन मशीनच्या विरोधात सुरू होत आहे.तशी तयारी चालू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा विजय खरा आहे की खोटा आहे याबद्दल महाराष्ट्रातील जनतेमध्ये आता नऊ दहा दिवसापूर्वी विचार होते, भावना होत्या, ते आता बदलून एक प्रकारची संशयाची भावना निर्माण झालेली आहे.
शरद पवार यांचे राजकारण संपणारे राजकारण नाही…..

आता शेवटी शरद पवार देखील हे राजकारणातून कधीच न संपणारे व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे नाही, स्वतःला पंतप्रधान व्हायचे नाही, त्यांच्या पक्षाचा देखील मुख्यमंत्री करायचा नाही. स्वतःच्या घरातील आपल्या मुलीला देखील मुख्यमंत्री बनवायचे नाही. त्यामुळे ते अगदी बिनधास्त आणि असंच त्यांनी या पराभवाला सहज घेतले. स्वीकारली नसली तरी देखील पुढच्या खेळीसाठी तयार असल्याचे आणि सहज असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधुन सर्वांना दिसले आहे .
त्यामुळे आता निवडणुकी पेक्षाही मोठा खेळ होऊ घातलेला आहे. हे मात्र स्पष्ट नक्की !