
काय आहे पोलिसांचा रोल?
Contents
शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार ! तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक !
शिरुर तालुक्यातील दोन घटनांमधे गुन्हे दाखल!
शिरुर,दिनांक 2 नोव्हेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार केला गेला आहे तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक बसली आहे. दोन्ही शिरुर तालुक्यातील या घटनांमधे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
घटना :1
शिरुर पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल केल्यानुसार हकीगत अशी की दिनांक 30/11/2024 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास शिरूर, तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे गावच्या हद्दित शिरूर बस आगार मधील चौकषी कक्षात इसम शिवधर सहानी याने कोणतेही कारण नसताना त्याच्या हातातील लोखंडी टामीने चौकषी कक्षात झोपलेले चालक संभाजी देवराव बर्गे ,वय- 44 वर्षे, राहणार-शहागड ,तालुका- आंबड, जिल्हा- जालना यांच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली आहे.’शिरूर‘
म्हणुन माझी शिवधर सहानी, राहणार- गोरखपुर, राज्य- उत्तर प्रदेष यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल करण्यात आली आहे.
आरोपी शिवधर सहानीवर फिर्यादी दिलावर अकबर तांबोळी, वय- 56 वर्षे, व्यवसाय- नोकरी ,राहणार- शिक्रापुर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे मो.नं. 9822526138 यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिली आहे.
आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशनला सी. आर. नं. 970/2024 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118(2) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.
तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.खेडकर हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
घटना : 2
शिरुर पोलिस स्टेशनला नोंद केल्याप्रमाणे हकीगत अशी की तारिख 25/10/2024 रोजी संध्याकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे गावच्या हददीत रहात्या धरासमोर मारूती रामनाथ भंडारी, वय -35 वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार -वडगाव रासाई, तालुका- शिरूर जिल्हा – पुणे, मो नं. 9766994482 यांची
मुलगी शरयू ही त्यांचा चुलत भाउ दिगबर धोंडीराम भंडारी याच्या घरी रस्त्याच्या कडेने जात असताना समोरून येणारी एम. एच 12 एस. एक्स 1077 कॅरी पांढर्या रंगाची गाडी वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात वेडी वाकडी चालवीत बेलावाडी बाजूकडून वडगाव रासाई गावात येत असताना एम. एच 12 एस. एक्स 1077 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात चालवुन शरयू हिला समोरून जोराची धडक देवुन डाव्या पायाला किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला आहे.
म्हणून मारूती रामनाथ भंडारी यांनी एम. एच 12 एस. एक्स 1077 कॅरी पांढर्या रंगाच्या गाडी वरील अज्ञात चालका विरुध्द शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात चालका विरुध्द शिरूर पोलीस स्टेशन सी आर नं 969/2024 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281,125 (A) 125 (B) मोवा का क 184 प्रमाने गुन्हा दाखल केला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत. तर
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
1 thought on “शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार ! तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक !”