
Contents
- 1 शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….
- 1.1 शिरूर मध्ये गैरप्रकारांचा होतोय कळस ?
- 1.1.1 शिरूर,दिनांक 8 डिसेंबर : ( खास रिपोर्ट,सत्यशोधक न्यूज टिम)
- 1.1.2 रात्री दीड वाजता रिक्षा,बाईक व कार?
- 1.1.3 बेकायदेशीर ‘माल’ व ‘चोर्या’?
- 1.1.4 रात्रभर हैदोस ?
- 1.1.5 अशी ठिकाणे कोणती?
- 1.1.6 शाळा,काॅलेजेस चे तरुण,तरुणी,अल्पवयीन माध्यमिक शाळेतील मुलं देखील !
- 1.1.7 सुरक्षा रक्षक व सी सी टी व्ही ची गरज !
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरूर मध्ये गैरप्रकारांचा होतोय कळस ?
शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….
शिरूर मध्ये गैरप्रकारांचा होतोय कळस ?
शिरूर,दिनांक 8 डिसेंबर : ( खास रिपोर्ट,सत्यशोधक न्यूज टिम)
शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’ असा प्रकार रासरोज घडत असल्याची माहिती “सत्यशोधक न्यूज ‘ कडे आली आहे. आलेल्या माहिती प्रमाणे शिरूर शहरातील शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री ‘शराब और शबाब’ की अन्य काही बेकायदेशीर ‘कर्म’ चालतात. असे निदर्शनास येत आहे. हा आता
शिरूर मध्ये गैरप्रकारांचा कळस होत आहे !
रात्री दीड वाजता रिक्षा,बाईक व कार?
रात्री एक ते दीड वाजण्याची वेळ ! एक रिक्षा तिच्या दोन्ही बाजू पडद्याने झाकलेल्या ! रिक्षा बरोबर तीन बाईक असलेले तिघेजण ! त्या मागून एक पांढरी कार जाते. आणखीन तासाभराने ही कार याच पद्धतीने पुन्हा उलट्या दिशेने जाते. असा हा एक प्रसंग दोन तीन दिवसांपुर्वीचा ! ही माहिती मिळाली सत्यशोधक न्यूज ला मिळाली आहे. हा आहे एक प्रकार ! शिरूर शहरातील कुकडी कॉलनी वसाहत ; त्याच्याजवळ असलेले, आयटीआय प्रशिक्षण केंद्र आणि त्याचा आवार, हा कोर्टाच्या आवाराच्या जवळ आहे. या भागामध्ये माहिती मिळाल्याप्रमाणे अक्षरशः हैदोस घालण्यात येत आहे.’शिरुर‘
बेकायदेशीर ‘माल’ व ‘चोर्या’?
या ठिकाणी ‘रंगेल’ आणि ‘दारूबाज’ अंधाराचा फायदा घेऊन अशा पद्धतीने रिक्षांमधून संभाव्य मुलींना किंवा महिलांना आणत असतात हे हे कोण आहेत? आणि शासकीय आवारामध्ये अशा पद्धतीने यांचा वावर कशासाठी होतो?अपरात्री का? त्याचबरोबर आणखीन काही बेकायदेशीर असणाऱ्या ‘मालाची’ वाहतूक तर केली जात नाही ना ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.शहरात चोर्या घडत असतात.त्यांच्याशी या लोकांचा काही संबंध आहे का?
रात्रभर हैदोस ?
एवढेच नाही तर अशी माहिती मिळाली आहे की पूर्ण रात्रभर एक वाजता, दोन वाजता ,तीन वाजता, साडेतीन वाजता सुद्धा आयटीआय प्रशिक्षण केंद्राच्या आवारामध्ये काही ‘असमाजिक घटक’ आपली ‘असामाजिक कर्मे'(? ) करत असतात. त्या ठिकाणी दारू पीत बसतात. त्या ठिकाणी सिगारेट वगैरे ओढतात एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी काही महिला, मुली देखील आणल्या जातात .किंवा येतात.अशी माहिती पुढे आलेली आहे. हा प्रकार गंभीर आहे. या भागामध्ये शिरूर पोलिसांची गस्त ही होते. परंतु गस्त असताना या लोकांचे टाइमिंग आणि पोलिसांच्या राऊंड चे टाइमिंग मॅच कसे होत नाही ? आणि हे असे अव्याहतपणे चालू आहे.
अशी ठिकाणे कोणती?

आता अशा पद्धतीने ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही आणि अंधार असतो अशी शिरूर मधली इतर ठिकाणी म्हणजे बस स्थानकामागील नगरपालिकेची शाळा, तिच्या मागे असलेले पटांगण , इंदिरा गांधी पुतळ्याजवळ असलेला पशुवैद्यकीय दवाखाना, त्याचा परिसर,नदीकाठी वीट भट्ट्यांजवळची ठिकाणे,नदीकाठचाच स्मशानभूमीचा परिसर,कुरूंद कडे जाणारा नदीकाठ चा भाग, नवीन शिरूर पोलीस स्टेशनचे काम जेथे चालू आहे त्या ठिकाणी असणारा अंधार आणि अशा लोकांना सूटेबल असणारा सध्याचा हा भाग ! आता सध्या त्या ठिकाणी बांधकाम चालू असले तरी हा भाग अशा घटना ंसाठी प्रसिद्ध होता अशी माहिती मिळते. त्यातूनच एखादी पडीक मंदिर किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी जर काही घटना घडली तर काय होते हे आपण शिरूर मधील एका मंदिरात मांसाचे तुकडे सापडल्यानंतर जो तणाव निर्माण झाला होता. त्याच्या बाबतीत पाहिले आहे. त्यामुळे शिरूर शहरातील असा हा चाललेला ‘हैदोस'(?) आहे. कुठेतरी याला आडकली आणली पाहिजे किंवा तो थांबवला गेला पाहिजे अशी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची चर्चा आहे. पण कोणी यावर काही बोलत नाही. घाबरताना दिसतात.
शाळा,काॅलेजेस चे तरुण,तरुणी,अल्पवयीन माध्यमिक शाळेतील मुलं देखील !
याशिवाय कॉलेजचे तरुण-तरुणी देखील या भागांमध्ये बसलेले असतात.शाळेतल्या अल्पकालीन मुला मुलींची ही या ठिकाणी ‘जागा’ आहे. काही अल्पवयीन मुले मुलीही सिगारेट ओढत असतात. तर काहीजण दारूही पीत असतात. काहींच्या मैत्रिणी ही त्या ठिकाणी येतात आणि विशेषता सुट्टीच्या दिवशी यांची संख्या जास्त असते.

सुरक्षा रक्षक व सी सी टी व्ही ची गरज !
आणखीन माहिती काढल्यानंतर आयटीआय प्रशिक्षण आवारामध्ये रात्री उशीर पर्यंत अशा प्रकारचे उद्योग चाललेले असतात. त्या अनुषंगाने शिरूर शहरातील संबंधित सरकारी कार्यालयांनी आपापल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्री सिक्युरिटी नेमणे आवश्यक आहे. यातून कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू शकते आणि या ठिकाणी जर महिला किंवा मुलींच्या गरिबीचा किंवा अल्पवयीन असल्यामुळे कायद्याची आणि इतर माहिती नसल्यामुळे जर गैर फायदा कोणाकडुन घेतला जात असेल आणि त्यांचे लैंगिक शोषण केले जात असेल तर ती फार गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणल्या जाणाऱ्या स्त्रियांना कोण पाठवते? कोणत्या दबाव खाली येतात का ? आनंदाने अशा अवघड आणि प्रसंगी धोकादायक ठरतील अशा ठिकाणी कोणतीही स्री स्वतः जाणे पसंत करणार नाही ! परंतु हे घडत आहे. याच्या मागची कारणे काय आहेत? हे संबंधित यंत्रणांनी, पोलिसांनी शोध घेऊन तपासले पाहिजे,अशी मागणी शिरूर मधील नागरिक, कार्यकर्ते,महिला, पुरुष करत आहेत. त्याबाबत काही अर्ज देखील प्रशासनाला केले गेलेले आहेत.असे समजले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अशी ही माहिती मिळालेली आहे. त्यामुळे याची चर्चा शिरुर शहरामध्ये असून शहर हे ‘बेकायदेशीर हैदोस’ घालणाऱ्यांचे शहर बनत चालले आहे. असे दिसते. याला वेळीच आळा घातला नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊन कुणाचा बळीही जाऊ शकतो.कुणाचे शोषणही होऊ शकते. कोणाची बळजबरीही होऊ शकते. कोणी बळजबरीने हे गैरकृत्ये करण्यास भाग पाडू शकते !
अशा पद्धतीने रिक्षा ,ती दोन्ही बाजूंनी झाकलेली असणे , तिच्याबरोबर बाईक वरून इतर तिघेजण जाणे, पांढरी कारही मागुन जाणे याचा अर्थ शहरातील आणखी कोणी ‘मोठे पैसे वाले’ किंवा ‘भाई’ यांच्या कडून अशा प्रकारे काही कृती केली जात आहेत का? हे शोधून काढणे ही पोलिसांची जबाबदारी आहे !