Contents 1. ” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी ? 1.1. शिरुर तालुक्यातील एका घटनेत 5 जणांची मिळुन एकास मारहाण ! वाचा सविस्तर. …1.1.1. शिरुर, दिनांक – 13 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन) 1.1.2. आरोपींची नावे व पत्ता पुढील प्रमाणे — 1.1.3. About The Author1.1.3.1. Dr.Nitin Pawar” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी ? शिरुर तालुक्यातील एका घटनेत 5 जणांची मिळुन एकास मारहाण ! वाचा सविस्तर. …शिरुर, दिनांक – 13 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन) ” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी देण्याची घटना घडली आहे. शिरुर तालुक्यातील या एका घटनेत 5 जणांनी मिळुन एकास मारहाण केली आहे.सविस्तर हकिकत वाचा पुढे !शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दि. 09/12/2024 रोजी दुपारी 3.40 वाजण्याच्या सुमारास प्रदीप धोडींबा कोळपे, शोभा प्रदीप कोळपे, वैशाली बिरा शिंदे, घोडींबा सत्तु कोळपे, बिरा सुरेश शिंदे सर्व रा. शिंदेवाडी तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी बेकायदा माणसे जमवुनफिर्यादी किरण सुखदेव कोळपे, वय -32 वर्ष, व्यवसाय- शेती, राहणार- खंडोबा मंदीराजवळ, शिंदेवाडी,मलठण, तालुका -शिरुर, जिल्हा – पुणे यांना ,” तुझ्या विहीरीत आमचा हिस्सा आहे. ती विहीर आम्हाला पाहीजे.” अशी मागणी केली. तेव्हा,” विहीर आमची आहे. आम्ही काय देवु शकत नाही ” असे फिर्यादी यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी वरील उल्लेखित लोकांनी त्यांचे वडील सुखदेव सत्तु कोळपे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहान केली. शोभा प्रदीप कोळपे हिने फिर्यादीच्या पायावर दगड फेकुन मारून मुक्कामार दिला.आई राधाबाई सुखदेव कोळपे हिला,” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु ” अशी धमकी दिली. म्हणुन फिर्यादी यांनी वरील लोकांविरूदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.आरोपींची नावे व पत्ता पुढील प्रमाणे — 1.प्रदीप धोडींबा कोळपे,2. शोभा प्रदीप कोळपे,3. 3.वैशाली बिरा शिंदे,4. धोडींबा सत्तु कोळपे,5. बिरा सुरेश शिंदेवरील सर्व राहणार-शिंदेवाडी, तालुका -शिरूर, जिल्हा – पुणेआरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2),191(2),352,351(2) (3),125 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपासी अंमलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे करत आहेत. तर दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.उबाळे हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर तालुक्यात अपघातात 32 वर्षीय तरुण मृत्युमुखी ? शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी !