
Contents
शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी !
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक 13 डिसेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी देण्याची घटना घडली आहे.त्याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की तारीख 08/09/2024 रोजी सकाळी 8:40 वाजण्याच्या सुमारास ते दिनांक 05/11/2024 रोजी रात्री 9: 30 वाजण्याच्या दरम्यान वडगाव रासाई, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे येथे फिर्यादी सौ. मिना संदीप थोरबोले,वय- 26 वर्ष, धंदा- घरकाम, राहणार- वडगाव रासाई,तालुका-शिरूर, जिल्हा – पुणे, मुळ राहणार- वाटोडा, तालुका-वरूड, जिल्हा – अमरावती हे
राहत्या घरी असताना त्यांचे पती संदिप किसन थोरबोले व सासु उषा किसन थोरबोले ,दोन्ही राहणार- वडगाव रासाई, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी त्यांना, ” तु तुझ्या आई वडीलांबरोबर व शेजारी पाजारी राहणारे लोकांबरोबर बोलायचे नाही.’शिरुर‘ त्यांच्याकडे जायचे यायचे नाही.” असे सांगितले. या कारणावरून त्या दोघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्याने मारहान केली.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
तसेच ,” आम्ही जसे म्हणलं , तसे तुलां वागावे लागेल ! जर तु आमचे ऐकले नाही, तर तुला घरातच मारून टाकील ! ” अशी धमकी दिली.” तु सारखी सारखी गावाला माहेरी का जाते? तुझे माहेरी काय काम असते ? ” असे बोलुन ,” तुला नांदायला यायचे असले तर तु तूझ्या वडीलाकडुन आम्हाला कार गाडी घेवुन ये”अशी मागणी केली. त्यांनी फिर्यादीस उपाशी पोटी ठेवुन शारिरीक व मानसिक छळ केला. जाचहाट केला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी त्या दोघांच्या विरूध्द शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
आरोपी नावे पुढीलप्रमाणे आहेत –
1) संदिप किसन थोरबोले
2) उषा किसन थोरबोले दोन्ही
राहणार,वडगाव रासाई, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये
भारतीय न्याय संहिता कायदा कलम – 85, 115, 352, 351(2) (3) ,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपासी अंमलदार पोलिस हवालदार खबाले हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस हवालदार उबाळे हे आहेत.
प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.