
Contents
शिरुर तालुक्यातील दु:खद घटनेत 16 वर्षीय मुलगा अपघातात मुत्युमुखी !
शिरुर तालुक्यातील मलठणजवळील शिंदे वाडी जवळील दुर्देवी घटना !
शिरुर, दिनांक- 16 डिसेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यातील दु:खद घटनेत 16 वर्षीय मुलगा अपघातात मुत्युमुखी पडला आहे. शिरुर तालुक्यातील मलठण जवळील शिंदे वाडी जवळील ही दुर्देवी घटना आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलीस स्टेशन येथे नोंद केल्याप्रमाणे
हकीकत अशी की दिनांक १३/१२/२०२४ रोजी ५:२० वाजता मलठणच्या शिंदेवाडी गावच्या हद्दीत मलठण- शिंदेवाडी रोडवर पावर हाउसच्या जवळ मुलगा दिगंबर रामदास शिंदे,वय-१६ वर्षे हा मलठण बाजुकडुन शिंदेवाडी बाजुकडे शाळेतुन घरी येत होता. शिंदेवाडी बाजुकडुन मलठण बाजुकडे जाणारा ४०७ टेम्पो नं. एम. एच. १४ जे.एल. ६८९६ यावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवुन विरूध्द बाजुला चालवले. त्यावेळी मुलगा दिगंबर यास धडक दिल्याने अपघात झाला आहे. सदरच्या अपघातामध्ये मुलगा दिगंबर याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा व इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा मार लागला. तो उपचारा दरम्यान मयत झाला आहे.’शिरुर‘
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog——
अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे
भारतीय न्याय संहिता कायदा कलम 106(1),281,125(अ)(ब),M.V.Act 184 प्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणुन फिर्यादी रामदास भिवा शिंदे, वय – 31 वर्ष, व्यवसाय- शेती, राहणार- मलठण ,शिंदेवाडी, तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे यांनी ४०७ टेम्पो नं. एम. एच. १४ जे.एल. ६८९६ यावरील चालकाच्या विरूध्द रितसर तकार शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.