परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या ‘संशयास्पद मृत्यू” चा शिरूर मध्ये तीव्र निषेध !
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूचा शिरूर मध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे. परभणी तील 'न्यायालयीन कोठडी' त सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला कसा? असा संतप्त सवाल सरकारला आंदोलकांनी केला आहे. शिरुर पोलीसांच्या उपस्थितीत तणावात हा मोर्चा पार पडला. शेवटी पोलिस निरीक्षक व तहसिलदार शिरुर यांना निवेदन देण्यात आले. दोषींवर लवकरात लवकर व कडक कारवाई केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या ‘संशयास्पद मृत्यू” चा शिरूर मध्ये तीव्र निषेध !
परभणी तील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला कसा? असा संतप्त सवाल !
शिरुर,दिनांक- 16 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
श्री.विनोद भालेराव, माजी नगरसेवक
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूचा शिरूर मध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे. परभणी तील ‘न्यायालयीन कोठडी’ त सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला कसा? असा संतप्त सवाल सरकारला आंदोलकांनी केला आहे. शिरुर पोलीसांच्या उपस्थितीत तणावात हा मोर्चा पार पडला. शेवटी पोलिस निरीक्षक व तहसिलदार शिरुर यांना निवेदन देण्यात आले. दोषींवर लवकरात लवकर व कडक कारवाई केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलन कर्ते कार्यकर्ते ; शिरुर पोलीस स्टेशन प्रांगणात !
परभणी शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची आणि स्मारकाची मोडतोड करण्यात आली होती. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणामध्ये दंगल उसळली होती . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अपमान करण्यात आल्याची ही घटना घडल्यानंतर परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमला होता. हा जमाव आंदोलन करत होता. त्यानंतर पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कस्टडीत मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक झाला.केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी “महाराष्ट्र बंद” ची घोषणा केली. त्यानंतर अनेक संघटना आणि पक्षांनी “महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली. त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने चाललेली होती.”परभणीतील‘
सौ.मायाताई गायकवाड, माजी नगरसेविका
शिरूर शहरांमध्ये या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शिरूर शहरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना मांनणाऱ्या समाजातील सर्व जाती, धर्मातील घटकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आहे.
अविनाश शिंदे, युवा कार्यकर्ते
दुपारच्या दरम्यान शिरुर शहरातील वेगवेगळ्या पक्ष आणि संघटना यांचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जमले. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित राहिले. त्यानंतर त्या ठिकाणी आंदोलकांची पोलिसांशी चर्चा झाली. आणि चर्चा नंतर त्या ठिकाणाहून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या बाजूने पोलिसांचा ताफा देखील या मोर्चामध्ये होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. संदेश केंजळे यांच्यासह, शिरूर पोलीस,महिला पोलीस या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी होते. या मोर्चामध्ये शिरूर शहरातील भीमछावा,बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इत्यादी सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लहुजी सेनेचे चेतन साठे
या मोर्चामध्ये महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या परभणी पोलिसांचा निषेध करण्यात आला. परभणीतील पोलीस या घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला. परभणी येथील पोलिसांची लवकर आणि कडक चौकशी होऊन त्यांना जबाबदार असणाऱ्या पोलिसांच्या विरुद्ध लवकरात लवकर आणि कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी वेगवेगळ्या वक्त्यांनी केली. त्याचबरोबर हे सरकार हे भारतीय संविधानाच्या विरोधी असल्याचे देखील काही वक्त्यांनी या ठिकाणी सांगितले. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. ते सहन केले जाणार नाहीत असाही इशारा या ठिकाणी देण्यात आला.
संपादकिय. …
Dr.Nitin Pawar, Editor -satyashodhaknews.com
“संविधानाचा प्रमुख वाहक व रक्षणकर्ता असलेला दलित विशेषता नवबौद्ध हा घटक विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर तो निराश झाला आहे की नाही? लढावु राहिला आहे की नाही? हे check करण्यासाठी संघाच्या छावणी नने हा ‘खडा’ टाकुन पाहिला आहे.
विशेषता नवी पिढी किती जागृत आणि ताकतवान आहे की नाही? हे देखील संघाने check केले आहे. मात्र नवी पिढी जुन्या पिढी पेक्षा ताकतवान,जागृत आणि संविधान व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जागृत आहे.हे संघाच्या लक्षात यायला हरकत नाही ! “
त्यानंतर ” एक जानेवारीच्या दरम्यान अशा प्रकारे दलित अत्याचाराच्या घटना वाढतात आणि दलितांवर एक प्रकारे अत्याचाराची एक साखळी सुरू होते. असे नेहमीच पाहायला मिळते.” असे देखील माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी सांगितले. माजी नगरसेविका मायाताई गायकवाड यांनी सांगितले की,” हे सगळे कुणामुळे होत आहे. हे सर्वांना माहीत आहे. कारण ते सर्व सत्ते मध्येच आहेत. त्यामुळे ते जबाबदार आहेत”.
या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र अशी संतप्त प्रतिक्रिया निर्माण होऊन मुंबई, पुणे, परभणी, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. शिरूर मधील या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी नगरसेविका मायाताई गायकवाड , ‘भिमछावा” चे प्रकाश डंबाळे, चेतन साठे, अरुण गायकवाड, अविनाश शिंदे,डॉ. वैशाली साखरे,लाला जगधने, इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिति होती.
यावेळी झालेल्या भाषणांमध्ये त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले.आणि या घटनेची संपूर्ण तपास निपक्षपातीपणे होऊन दोषींना दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
दरम्यान शिरुर शहरातील शांतता आणि समन्वय योग्य पद्धतीने ठेवण्यात येत असल्याचे दिसत आहे. एकूण शहरांमध्ये हे सर्व आंदोलन शांततेत पार पडलेले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com