चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दिनांक - २७-२८ डिसेंबर २०२४ ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयकडुन नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्याची शिरुरकरांना संधी मिळणार आहे.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्याची शिरुरकरांना मिळणार संधी !
शिरुर,दिनांक – 26 डिसेंबर २०२४ : (प्रा.डॉ.सुरज सावंत यांच्याकडुन )
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दिनांक – २७-२८ डिसेंबर २०२४ ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयकडुन नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्याची शिरुरकरांना संधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), पुणे, पंचायत समिती (शिक्षण विभाग) शिरुर, व शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिरूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ शुक्रवार दि. २७ डिसेंबर व शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात आयोजित करण्यात येत आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा. ——- अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा. —– आपला, डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज, satyashodhak.blog
——
Dr.Nitin Pawar, Editor -satyashodhaknews.com
” विज्ञान प्रदर्शनाची गरज निश्चित आहे .आपल्याला विज्ञानाचे फायदे पाहिजे असतात .परंतु विज्ञानाची समज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन नको असतो .मुळात विज्ञान विषयासंबंधी फार मोठे गैरसमज भारतीय समाजामध्ये पसरलेले आहेत . ‘ ‘जिथे विज्ञान संपते.तेथे अध्यात्म सुरु होते’.असे एक ‘गोलमाल’ उत्तर दिले जाते.पण विज्ञान नेमके कोठे संपते? हे ही मंडळी सांगु शकत नाहीत. विज्ञान कुठेच संपत नाही.फक्त आपल्याला अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.पण ती शोधानंतर मिळतात.तेव्हा वैज्ञानिक क्रियाकारणभावानुसारच ती असतात.चमत्कारीक असे त्यात काहीच नसते.उत्तर सापडेपर्यंत तो चमत्कार समजतो, वाटतो .पण आपण शोध घेण्याचे कष्ट टाळतो.
आपल्याया परंपरेने तसे शिकवले आहे.भारतीय समाज हा रुढी परंपरेने चालण्याला महत्त्व देतो.आणि विज्ञान निखळ सत्य शोधण्याला महत्त्व देते. पुष्कळ वेळा विज्ञानातून सापडलेले निखळ सत्य पचवायची ताकद आपल्यामध्ये नसते. समाजामध्ये नसते.काही वेळेस समाजाला ते नेमकेपणाने समजतही नाही. किंवा रुढी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की भारताच्या एखाद्या वैज्ञानिक प्रकल्पाची सुरुवात देखील अंधश्रद्धा मूलक अशा कर्मकांडाने केली जाते.
भारतातील बुद्धिजीवी लोक धाडसामध्ये कमी पडतात. समाजाला खरे सांगण्याचे धाडस भारतातल्या बुद्धिजीवी लोकांमध्ये फार क्वचित आढळते. आपली नोकरी, आपले कुटुंब आणि आपली सुरक्षितता यालाच तो प्राधान्य देतो. त्या पलीकडे समाज बदलण्यासाठी म्हणून आपले योगदान देताना दिसत नाही.कित्येक विज्ञानातील पी.एचडी.प्राप्त लोक ,डॉक्टर,इंजिनीयर,वकील,प्राध्यापक,शिक्षक हेच अंधश्रद्ध दिसुन येतात.सर्व प्रश्नांचे एकच उत्तर,’ईश्वर’ असे देणे सर्वात सोपे ! कारण त्याचा पुरावा देता येत नाही.आणि एक शक्यता म्हणुनही नाकारता येत नाही.विज्ञान देखील अशी शक्यता पाडताळुन पाहण्यास नाकारत नाही. पण अद्याप तसा पुरावा सापडलेला नाही.मात्र ब्रह्माण्ड भौतिकीच्या नियमांनुसार चालते.हे हजार वेळा स्पष्ट झालेले आहे.
स्टिफन हॉकिंग
या नियमांनाच फारतर ईश्वर म्हणता येईल.असे विख्यात शास्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी म्हटले आहे. हे नियम कोणी बनवले?असा प्रश्न पडला तर ज्याने बनवले त्याला कोणी बनवले? तो आपोआप कसा बनला?असे प्रश्न निर्माण होतात.’बीग बॅन्ग’ का झाला?तर त्याचे उत्तर नाही ! एकच ”बीग बॅन्ग’ घडावा असे काही जरुरी नाही.म्हणुन मल्टी युनिव्हर्स ची संकल्पना आली.म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड !
पुन्हा क्वांटम फिजीक्स मधे अडले.क्वांटम लेवलला पार्टिकल्स चे वागणे आताच्या भौतिकीच्या विपरित आढळले.त्यातुन अनेक नवे प्रश्न निर्माण झाले.
पण मानवी जिज्ञासेला सिमा नाही.मानव त्याचाही शोध घेत राहतो.पुष्कळदा अज्ञानातच आनंद आहे.सत्य शोधण्याच्या भानगडीत पडु नये’,असे मानणारा एक समुदायही आहे.असो.”
— संपादक,डॉ. नितीन पवार.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम पहाण्याची संधी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मिळणार आहे. या दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मा. डॉ. पंडित विद्यासागर, मा. कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री माऊलीआबा कटके, आमदार, शिरूर विधानसभा उपस्थित राहणार आहेत. तसेच मा.डॉ भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद, पुणे, मा.श्री महेश डोके, गट विकास अधिकारी पंचायत समिती, शिरूर इत्यादी मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
तरी आपण आपल्या विद्यार्थ्यांसह प्रदर्शनास भेट द्यावी व सहभाग नोंदवावा असे आवाहन शि.शि.प्र.मंडळाचे सचिव मा. एन.एस.निकम, महाविद्यालये प्राचार्य डॉ. के.सी.मोहीते, डॉ.डि.एच.बोबडे, श्री तुकाराम बेनके, अध्यक्ष शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, श्री मारुती कदम, सचिव शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, श्री संभाजी ठुबे, अध्यक्ष शिरूर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com