
Contents
- 1 शिरुर मधे नाताळ निमित्त येशुची प्रार्थना संपन्न !
- 1.1 शिरुर मधील सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 29 डिसेंबर: (डॉ.नितीन पवार यांच्याकडुन)
- 1.1.2 ‘येशु’ आजवरचे सर्वात प्रभावी धर्मवेत्ते !
- 1.1.3 प्रेम हा येशुचा संदेश. …
- 1.1.4 माता ‘व्हर्जिन मेरी’. ..पिता योसेफ…
- 1.1.5 बायबल : जगातील सर्वात महत्वपुर्ण पुस्तक !
- 1.1.6 प्रभु येशु यांच्या टेन कमांडमेंटस…..
- 1.1.7 मदर तेरेसा यांना ‘सेंट’ ही पदवी…
- 1.1.8 शिरुर मधे स्तुत्य उपक्रम. ….
- 1.1.9 About The Author
- 1.1 शिरुर मधील सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न !
शिरुर मधे नाताळ निमित्त येशुची प्रार्थना संपन्न !
शिरुर मधील सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न !
शिरुर,दिनांक 29 डिसेंबर: (डॉ.नितीन पवार यांच्याकडुन)

शिरुर मधे नाताळ निमित्त येशुची प्रार्थना नुकतीच संपन्न झाली.यावेळी शिरुर मधील सिंधुताई सपकाळ आश्रमातील मुलांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी शिरुर मधे विविध ख्रिस्त अनुयायी व इतर संस्था,संघटना व मान्यवर लोकांकडुन नाताळचा सण उत्साहाने साजरा केला जातो.’शिरुर‘

‘येशु’ आजवरचे सर्वात प्रभावी धर्मवेत्ते !
जगाला सर्वात जास्त काळ आणि सर्वात जास्त लोकांना प्रभावित प्रभु येशु ख्रिस्त यांनी केले आहे.येशु यांचे अनुयायी आज जगात सर्वात जास्त संख्येने आहेत.युरोप,अमेरिका खंड,आस्ट्रेलिया, न्युझीलंड यांच्यासह आशिया,आफ्रिका खंडात येशु ख्रिस्त यांचे अनुयायी पसरलेले आहेत. सर्व प्रगत देशांमधे बहुसंख्य ख्रिस्त अनुयायी पसरलेले आहेत. येशु ख्रिस्त यांनी जगाला एक धर्म,संस्कृती,कला,स्थापत्यशैली दिली आहे.

प्रेम हा येशुचा संदेश. …
येशु ख्रिस्त यांच्या जन्मापासुन आधुनिक कालगणना जगभर प्रचलित आहे.प्रभु येशु ख्रिस्त यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे पर्वतावरील उपदेश प्रामुख्याने त्यांचा संदेश मानले जातात.बायबल हा ख्रिस्ती धर्माचा प्रमुख पवित्र ग्रंथ मानला जातो.
Read more >>
शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी !
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या ‘संशयास्पद मृत्यू” चा शिरूर मध्ये तीव्र निषेध !
माता ‘व्हर्जिन मेरी’. ..पिता योसेफ…
प्रभु येशु यांचा जन्म नासरेथ येथे झाला.माता मेरी यांना ,’व्हर्जिन मेरी’ असे म्हटले जाते. कुमारी अवस्थेत देवाच्या इच्छेने मेरी यांना पुत्ररत्न झाले.असे मानले जाते.ईश्वराने आपला एकुलता एक पुत्र पृथ्वीवर माता मेरी यांच्या द्वारे मानवाला संदेश देण्यासाठी पाठवला.आपल्या सर्वांच्या पापाची शिक्षा प्रभु येशु यांनी क्रुसावर बलिदान देऊन स्वत: भोगली आहे.जेणेकरुन आपण जीवन जगताना पापे करु नयेत.असा तो संदेश आहे.

बायबल : जगातील सर्वात महत्वपुर्ण पुस्तक !
बायबल मधे ‘जुना करार’ व ‘नवा करार’ असे दोन भाग आहेत. येशुच्या पुर्वीचा इतिहास हा ‘जुना करार’ व ‘येशु’ च्या नंतरचा इतिहास हा ‘नवा करार’ आहे.अर्थात अब्राहमीक परंपरेतील यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम हे जगातील प्रमुख धर्म आहेत.अब्राहम हे या सर्व धर्मियांचे एक थोर पुर्वज आहेत.इस्लाम मधे देखील प्रभु येशु ख्रिस्त यांना एक पैगंबर मानले गेले आहे. या तीनही धर्मियांना सर्वात जास्त प्रिय ‘जेरुसलेम’हे आहे.
Read more >>
बालरंगभूमी परिषद ,पुणे तर्फे नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन !
चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात !
त्यावर ताबा मिळवण्यासाठी गेली दोन हजार वर्ष या तिन्ही धर्मियांनी आपसात संघर्ष केलेला दिसुन येतो.परंतु ‘जेरुसलेम’ हे आजही त्याच्या इतिहासाची साक्ष देत राहीले आहे.
प्रभु येशु यांच्या टेन कमांडमेंटस…..
‘येशु’ ख्रिस्त यांच्या टेन कमांडमेंटस अर्थात दहा आज्ञा या ख्रिश्चन धर्मामधे महत्वपुर्ण मानल्या जातात.क्षमा करा आणि अपराधांची कबुली द्या यांचा प्रामुख्याने यात समावेश आहे. त्यामुळे ख्रिश्चन चर्चमधे व्यकती आपल्या पापाची कबुली चेहरा न दाखवता चर्चच्या फादर वगैरे प्रमुखांसमोर देतो.फादर त्याला क्षमा करण्याची विनंती ईश्वराला करत असतात.यामधे व्यक्तीची गुप्तता बाळगली जाते.कारण ईश्वर सर्व जाणतो.असा विचार यामधे असतो.
मदर तेरेसा यांना ‘सेंट’ ही पदवी…
मात्र प्रभु येशु ख्रिस्ताच्या प्रेरणेने जगभर सेवाभावी कार्य चालतात.मदर तेरेसा यांना अशा कार्यामुळे ,’सेंट’ हे ख्रिस्ती धर्मातील सर्वात मोठे पद अगदी अलीकडच्या काळात प्राप्त झाले.’सेंट’ ही पदवी मिळवण्यासाठी मोठे सेवाकार्य करावे लागते.शिवाय चमत्कारी वाटावे असे काम करावे लागते. मदर तेरेसा यांनी विश्वास बसणार नाही एवढे सेवाकार्य जगभर उभे केले.
शिरुर मधे स्तुत्य उपक्रम. ….
” जगात आज सर्वाधिक भीषण परिस्थीती निर्माण झालेली आहे. युद्ध,हिंसा,अन्याय,भ्रष्टाचार,दारिद्रय, विषमता,उपासमारी टोकाला पोचली आहे.अशा परिस्थीतीत जगाला प्रभु येशु यांनी दिलेल्या संदेशांची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे”असे कोमल जोसेफ यांनी सत्यशोधक न्युज शी बोलताना सांगितले आहे.
याचाच आदर्श घेउन शिरुर मधे ‘दयासागर फेलोशिप ट्रस्ट’ च्या वतीने कोमल जोसेफ, भगवे दयासागर फेलोशिप ट्रस्ट च्या अध्यक्षा , बीजेपी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ,भिमछावा शहर अध्यक्ष, दयासागर टीम, विठ्ठल दादा घावटे (सरपंच), बीजेपी महिला मोर्चा टीम,प्रिया बिरादार (अध्यक्ष),सना शेख, सुजाता पाटील ,सुशिला गोसावी, मिरा परदेशी ,सुरेखा ससाणे ,सुश्मा फंड,शुभांगी पाचरणे ,विनय सपकाळ,सुरेखा पाटील(ऐडवोकेट)विक्रम पाटिल (ऐडवोकेट ) आशा ताई शेवाळे ,सिंधूताई सपकाळ माई आश्रम स्टाफ , रामलिंग , शिरुर हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सिंधुताई सपकाळ आश्रम शिरुर शहरात चालतो.शेकडो अनाथांची आई बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य शिरुर येथील त्यांची संस्था पुढे चालवत आहे.त्या ठिकाणी अनेक मुले मुली यांचा सांभाळ संस्थेकडून केला जातो. तेथील मुलांसाठी या निमित्ताने भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोमल जोसेफ यांनी सर्व उपस्थित अबालवृद्ध व मान्यवरांचे स्वागत केले. आभार मानले. सर्वांच्या भल्यासाठी प्रभु येशु यांच्याकडे प्रार्थना केली.