
Contents
- 1 पाकिस्तान ‘तबाही’ च्या मार्गावर का आहे ?
- 1.1 पाकिस्तान चे चार तुकडे होउ घातले आहेत का ?
- 1.1.1 शिरुर, दिनांक 12 जानेवारी : (संपादकीय)
- 1.1.2 पाकिस्तान ची निर्मिती धर्माच्या आधारावर. …
- 1.1.3 पाकिस्तानी नेत्यांचे भारत द्वेशाचे ‘राजकारण’..
- 1.1.4 पाकिस्तान चार बाजूने घेरला गेलेला आहे. …
- 1.1.5 तेहरिक ए तालिबान चा पाकिस्तान वर हल्ला बोल !
- 1.1.6 ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ चा ही पाकिस्तान वर हल्ला बोल !
- 1.1.7 पाक व्याप्त काश्मीर मधे पाकिस्तान विरुद्ध ‘विद्रोह’…
- 1.1.8 भारत सरकारची भूमिका. ..
- 1.1.9 About The Author
- 1.1 पाकिस्तान चे चार तुकडे होउ घातले आहेत का ?
पाकिस्तान ‘तबाही’ च्या मार्गावर का आहे ?
पाकिस्तान चे चार तुकडे होउ घातले आहेत का ?
शिरुर, दिनांक 12 जानेवारी : (संपादकीय)
पाकिस्तान ‘तबाही’ च्या मार्गावर का आहे ? आणि पाकिस्तानचे किमाण चार तुकडे होउ घातले आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न का निर्माण झाला आहे ते थोडक्यात समजुन घेण्याचा प्रयत्न आपण करू !
पाकिस्तान ची निर्मिती धर्माच्या आधारावर. …
पाकिस्तान ची निर्मिती तशी घाईघाईतच झाली ! पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली ! क्षणिक सत्तेचा स्वार्थ पाकिस्तान निर्मात्या नेत्यांना आवरता आला नाही. आणि पाकिस्तान निर्माण झाला. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तान केवळ धर्माच्या आधारावर टिकणे फार कठीण होते. 1971 च्या बांग्लादेश युद्धानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.’पाकिस्तान‘
पाकिस्तानी नेत्यांचे भारत द्वेशाचे ‘राजकारण’..

आज 75 वर्षानंतर अगदी स्पष्ट चित्र समोर येत आहे की पाकिस्तान चे आणखीन चार तुकडे होण्याची वेळ आता आलेली आहे ! या आधी पाकिस्तानचा एक तुकडा बांगलादेश हा नवीन राष्ट्र म्हणून निर्माण झाला .पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पाकिस्तान मध्ये जवळ जवळ सतत अराजक राहत आलेले आहे. लोकशाही नावालाच तिथे उपस्थित असते. पाकिस्तानी लष्कराचा प्रभाव राजकीय सत्तेवर असतो. तेथील राजकारण हे भारत द्वेशावर चालते. आणि सर्वसामान्य पाकिस्तानींच्या प्रमुख प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानी नेते भारत विरोधाचे राजकारण नेहमी करत असतात.
Read more >>
मुस्लिमांचा विकास न करता त्यांना केवळ ,’वोट बेंन्क’ कोणी बनवले?
पाकिस्तान चार बाजूने घेरला गेलेला आहे. …
पाकिस्तान सरकार भारतामध्ये जम्मू-काश्मीर मध्ये फुटिरतावाद निर्माण करण्याला आणि तेथील हिंसाचाराला मोठ्या प्रमाणामध्ये खतपाणी घालत आलेले आहे. काश्मीर भारतापासून तोडण्याचे पाकिस्तानचे मनसुबे होते आणि आहेतच ! परंतु ते वेळोवेळी उधळले गेले आहेत. आता पाकिस्तानची करणी पाकिस्तानच्या अंगलट आलेली आहे. असे नुसते चित्रच नाही तर पाकिस्तान मध्ये आता अंतर्गत युद्धाला सुरुवात झालेला आहे !
Read more >>
खास संपादक डॉ नितीन पवार यांच्या लेखणीतुन….
‘गावातील रहस्यमय सावली’ : एक हॉरर कथा !
पाकिस्तान चार बाजूने घेरला गेलेला आहे . पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ हे आज हतबल झालेले दिसत आहेत. पाकिस्तानला पश्चिमेकडे लागून अफगाणिस्तान हा देश आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवट आहे. परंतु पाकिस्तानचे पश्चिमेकडील भागामध्ये ‘तेहरिक ए तालिबान’ नावाचा एक गट अस्तित्वात आहे. त्या गटाला ‘शरिया‘ कायदा पाहिजे आहे. त्या गटाला पाकिस्तान सरकारने त्या भागात हल्ला करून डिवचले आहे. त्यातून तेहरिक ए तालिबान च्या लढवय्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि सरकार विरुद्ध विद्रोहाचे पाउल उचललेले आहे.यात आजवर 1200 ते 1400 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत अशी माहिती आहे. पाकिस्तानशी या लढवय्यांनी पारंपारिक गनिमी काव्याच्या लढाईला सुरुवात केलेली आहे. अशाच पद्धतीने अफगानिस्तान स्थान आणि तेथील तालिबान हे गेली 20 वर्ष अमेरिकेविरुद्ध लढाई करत होते. शेवटी अमेरिका तिथून माघारी गेला आहे. त्यापूर्वी रशियाला देखील तिथून माघार घ्यावी लागली होती. अशा प्रकारच्या युद्धाचा सततचा अनुभव तेथील लोकांच्या अंगवळणी पडलेला आहे. वेगळी असलेली पारंपारिक पद्धतीने लढण्याची त्यांची ही पद्धत आहेच ! पण त्यांना ‘इतर’ पाकिस्तान विरोधींनी रसद पुरवायला सुरु केली आहे.
तेहरिक ए तालिबान चा पाकिस्तान वर हल्ला बोल !
पाकिस्तान आणिअफगाााणिस्थान हे जवळपास बाराशे ते तेराशे किलोमीटर लांबीच्या असलेल्या सीमेवर जोडलेले आहेत. या असलेल्या सीमेवर तेहरिक ए तालिबान (स्थापना-2007) ने पाकिस्तानी सैनिकी चौक्या, पाकिस्तानी सैनिक यांच्यावरील हल्ले सुरू केलेले आहेत. काही चौक्या ताब्यात घेतल्याचे आणि काही पाकिस्तानी सैनिकांना ‘बंदी’ बनविण्याचे आणि जल्लोष करत असल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि अजूनही पुढे आज चालू आहे.
‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ चा ही पाकिस्तान वर हल्ला बोल !

दुसऱ्या बाजूल ‘बलुचिस्तान’ या पाकिस्तानी प्रांतात ‘बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी’ नावाची संघटना पाकिस्तान विरोधात आक्रमक झालेली आहे. पाकिस्तानातील बलुची लोकांची पाकिस्तान सरकारने कायम अवहेलना, उपेक्षा आणि अन्याय केल्याची भावना बलुचिस्तानमधील जनतेमध्ये होती. आणि यापूर्वीच तेथे त्या बाबतीत असंतोष पसरलेला होता. स्वतंत्र ‘बलुचिस्तान’ निर्माण करण्याची एक भावना एका गटांमध्ये निर्माण झालेली होती. त्यातून ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ चा उदय झाला. आता या घडीला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या पोलीस, शासकीय कार्यालय यांच्यावर हल्ले करणे आणि शहर (खुजदार) ताब्यात घेणे इथपर्यंत हा संघर्ष चिघळला आहे.
तेथील सर्वसामान्य लोक हे पाकिस्तान मधील सरकार हे आपल्याला नको असे म्हणत असताना ‘40 हजार रुपये लाईट बिल’ येत असल्याची माहिती देतात ! हे जगभर वृत्तवाहिनींच्या मधुन सांगितले गेले आहे. तिथे पाकिस्तानच्या विरुद्ध एक आघाडी उभी राहिलेली आहे .
पाक व्याप्त काश्मीर मधे पाकिस्तान विरुद्ध ‘विद्रोह’…

पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता. पाकिस्तान निर्माण होताना पाकिस्तानी टोळ्यांनी जम्मू-काश्मीर चा जो भाग त्यांच्या ताब्यात घेतलेला होता .तो भाग ‘पाकव्याप्त का काश्मीर’ म्हणून अस्तित्वात आहे. आणि तेथील लोकांनी पाकिस्थान सरकार विरुद्ध उठाव केल्याचे चित्र असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देत आहेत. अशावेळी हा भाग पाकव्याप्त पाकव्याप्त काश्मीर मधून भारतात सामील होण्याची किंवा भारत सरकार ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही एक तिसरी आघाडी पाकिस्तानच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे !
भारत सरकारची भूमिका. ..
अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी आणि ट्रम्फ वैयक्तिक मैत्री आणि एकमेकांना पूरक धोरण हे पाकिस्तानला सोयीचे नाही. इराण भारताकडे मदत मागत आहे. भारताने इराण कडुन तेल घ्यावे अशी साकड घालत आहे.कारण अमेरिकेला धुडकावून भारताने रशियाकडून तेल घेतले आहे. तसे अमेरिकेचे निर्बंध झुगारुन इराणकडुन तेल भारताने घ्यावे अशी इराणची इच्छा आहे. ट्रम्फ पुन्हा इराणवर निर्बंध घालण्याची शक्यता ते पुन्हा निवडुन आल्यामुळे आहे.
चीनचा थोडासा अपवाद वगळता पाकिस्तानच्या मदतीसाठी कोणी पुढे येण्याची शक्यता नाही. यावर भारत सरकारने ‘राजकीय मुत्सद्देगिरी’ साठी खास ‘अजित डोवाल‘ यांच्या यांच्या माध्यमातून वगैरे या ठिकाणातील नेत्यांबरोबर आणि संघटनांबरोबर चर्चा करत असल्याची माहिती आहे. अजित डोवाल हे भारताचे पूर्वीचे ‘आय बी’ चे ‘गुप्तचर’ म्हणून काम केलेले ‘खतरनाक’ मानले जाणारे भारताचे सुरक्षा सल्लागार पाकिस्तान मध्ये गुप्तचर म्हणून काम केलेले आहेत. ते भारताच्या शत्रूंसाठी ‘खतरनाक‘ असे ‘इंटेलिजंट‘ मानले जाणारे आहेत.
अशा परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून असणारच आणि योग्य ती पावले उचलून पाकिस्तानला काय तो धडा शिकवणार हे निश्चित आहे !