
Contents
- 1 ‘कराड प्रवृत्ती’ बीड जिल्ह्यापूर्ती मर्यादित आहे का?
- 1.1 ‘कराड प्रवृत्ती’ राज्यभर बोकाळली आहे ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक 13 जानेवारी: (संपादकीय )
- 1.1.2 हत्या सरपंचाची…..
- 1.1.3 राजकारणी व गुंडाची हातमिळवणी?
- 1.1.4 गाव पातळी ते राज्य पातळी….
- 1.1.5 गुंडांना आश्रय ?
- 1.1.6 आताचा मिडीया वेगळा…..
- 1.1.7 सुरुवात जागतिकीकरणापासुन?
- 1.1.8 तरुणांना आसरा वाटतो ,’ भाईं’ चा !
- 1.1.9 सामान्य माणुस ,’भयभीत ‘?
- 1.1.10 ‘वाल्मिक कराड’ प्रवृत्ती. ..
- 1.1.11 सरकारांनी कर्जे घेउन पैसा लुटला !
- 1.1.12 महाराष्ट आता पुरोगामी राहिला आहे का?
- 1.1.13 बिहार कडे बोट दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राचे काय ते पहावे?
- 1.1.14 सरपंच, आमदार, खासदार,मंत्री ?
- 1.1.15 नव्याने वैचारिक मंथन गरजेचे !
- 1.1.16 About The Author
- 1.1 ‘कराड प्रवृत्ती’ राज्यभर बोकाळली आहे ?
‘कराड प्रवृत्ती’ बीड जिल्ह्यापूर्ती मर्यादित आहे का?
‘कराड प्रवृत्ती’ राज्यभर बोकाळली आहे ?
शिरुर,दिनांक 13 जानेवारी: (संपादकीय )
‘कराड प्रवृत्ती’ बीड जिल्ह्यापूर्ती मर्यादित आहे का? की ‘कराड प्रवृत्ती’ राज्यभर बोकाळली आहे ? असा एक प्रश्न आहे ! बीड ,परळी वगैरे भागात वाल्मीक कराड आणि त्याचे ,’आका ‘ यांची राज्यभर चर्चा चालली आहे. निमित्त मसनजोगा या बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येनंतर झाली. त्यानिमित्ताने सुरुही आहे. या हत्येमागे वाल्मीक कराड हा बीड परळी भागातील सध्या मंत्रीमंडळात असलेल्या धनंजय मुंडे यांच्याशी वल्मिक कराड याची ‘ अत्यंत नजिकता’ (?) असल्याने ही घटना देशभर चर्चेत आली आहे. म्हणुन या अनुशंगाने जी माहिती पुढे आली आहे. ती पाहता ‘वाल्मिक कराड’ ही एक प्रवृत्ती असून ती सध्या तरी महाराष्टात राज्यभर अस्तित्वात आहे असे म्हणायला जागा आहे. असे म्हटले तर ते अतिशयोक्तीपूर्ण होईल असे वाटत नाही.
Read more >>
” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी ?
हत्या सरपंचाची…..
या प्रकरणामध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत अमानुशपणे करण्यात आली. त्याचे व्हिडिओ आणि इतर माहिती आजमितिला सर्व देशभर पसरली आहे. मात्र ही हत्या राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांशी संबंधित असल्याचे पुढे आले. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले ! तसे पाहिले तर वाल्मिकी कराड हा एक व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती राज्यभर व्यापलेली आहे. असे लक्षात यायला काही हरकत नाही .
राजकारणी व गुंडाची हातमिळवणी?

याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गाव पातळीवरील निवडणुकीपासून राज्य पातळीवरील निवडणुकीपर्यंत सर्व राजकीय क्षेत्रामध्ये या घटनांची आणि माहितीशी साम्य असलेल्या बाबी,घटना आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रमुख म्हणजे बलदंड, माफिया यांना सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी वगैरे हे जवळ करतात. आणि असे माफिया देखील या लोकांचा आसरे घेत असतानाचे चित्र गावपातळीपासुन राज्यभर पाहिले तर दिसून येते.
गाव पातळी ते राज्य पातळी….

प्रत्यक्षामध्ये इतकी क्रूर हत्या गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर झाली नसेल ! परंतु अशा प्रकारच्या हत्या किंवा मारहाण करणे किंवा मारहाण न करता देखील अन्याय दडपणे, केवळ दहशत दाखवून अन्यायग्रस्ताचा आवाज दडपून टाकणे ; त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची आणि प्रसंगी पोलिसांची भूमिका ही अन्यायकर्त्या एखाद्या राजकारण्यांनी पोचलेल्या बाहुबली माफीया असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या ‘उपकारा’ ने पार वाकून गेलेल्या पोलिसांमुळे या घटना जास्त मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात नाहीत. असे महाराष्ट्रात आहे की नाही हे प्रत्येकाला समजते .
Read more >>
ब्रेकींग न्युज : 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात?
गुंडांना आश्रय ?
जाणीवपूर्वक अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि बुद्धिमान असणाऱ्या, संघटन कौशल्य असणाऱ्या, दादागिरी ची भाषा आणि ‘अर्थपुर्ण समन्वयाची ‘(?) पण भाषा अवगत असलेल्या काही गुंडांना गाव पातळीवर ,तालुका पातळीवर ,जिल्हा पातळीवर आणि राज्यपातळीवर देखील राजकारणातील काही लोक हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरत असतात.आहेत.
आताचा मिडीया वेगळा…..
याआधी देखील दाउद इब्राहिम सारखा माफिया आणि त्याचा ‘आका’ देखील कोणी वर होता. वगैरे माहिती आणि इतर हिंसक घडामोडी मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. त्यावेळी प्रसारमागील माध्यमाचे आधुनिक, जलद आणि सर्वत्र क्षणात पोहोचणारी माहिती, सी सी टी व्ही इ.नव्हते. त्यामुळे त्यावेळेस अशा घटना हे फारशा चर्चिल्या जात नव्हत्या.किंवा सतत ‘मारा’ होत नव्हता. सारी भिस्त वर्तमानपत्रांवर होती.आणि सरकारी टी व्ही वर होती. परंतु अशा प्रवृत्ती होत्या .
सुरुवात जागतिकीकरणापासुन?

खरी सुरुवात म्हणजे देशाने ज्यावेळेस जागतिकीकरणाचे, खाजगीकरणाचे, आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारले त्यावेळेस देशामध्ये भरपुर परकीय गुंतवणूक आली. परकीय कंपनी आणि इंडस्ट्री निर्माण झाली. भारतात फार कमी प्रमाणामध्ये वेतन देऊन कामगार मिळत असल्याने भारतातल्या काही भागांमध्ये अशा प्रकारची एक पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आला.कंत्राटी कामगार पद्धतीमुळे ! आजवरच्या बहुतेक सर्व सरकारांनी कर्ज घेऊन परत फेरण्याच्या बाबतीत जास्त विचार न करता प्रकल्प योजना आणि इतर गोष्टी सुरू केल्या.त्यातून ‘कमिशन’ चा प्रकार जो पूर्वी छोटा होता तो मोठ्या करोडोंच्या आण अब्जांच्या कृपयांमध्ये सुरू झाला .
तरुणांना आसरा वाटतो ,’ भाईं’ चा !

तोच पैसा अनेक पद्धतीच्या मोठमोठ्या हॉटेल्स, लॉज ,वाळू माफिया, जमिनी बळकवणे, गुंड पोसणे अशा कामांसाठी वापरण्यात आला. आणि या पैशातूनच पैसा वाढत जाऊन आणखीन पैसा निर्माण झाला .आणि आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये याच पैशाच्या जोरावर अनेक तरुणांना गुंडगिरी कडे जाण्यास प्रोत्साहन’ मिळाले.’भाईगिरी’ करण्याचे आकर्षण तरुणांमध्ये निर्माण झाले. तरुणांना गुंडांच्या अंगाकडील असणारी सोन्याची दागिने, त्यांच्यातील पैशाचे, नोटांचे बंडल यांचे आकर्षण वाटू लागले. त्याची दहशत असणे आणि पोलिसांचा त्याच्यावर धाक नसणे अशा कारणामुळे तरुण अशा भाई अथवा गुंड लोकांच्या पाठीमागे घोळक्याने तरुण येऊन गोळा होतात .असे चित्र प्रत्येक गाव ,तालुका, जिल्हा, औद्योगिक क्षेत्र ,एमआयडीसी, मोठी शहरे, हॉटेल्स, लॉज, बेकायदेशीर दारू, बेकायदा गुटका विक्री, बेकायचा लॉटरी अशा सर्व प्रकारच्या बेकायचा चालणाऱ्या धंद्यांच्या ठिकाणी अशा गुंड प्रवृत्तीचे लोक वावरताना दिसायला लागले.
Read more >>
शिरुर पोलिसांनी पकडला बेकायदा वाळुचा डंपर !
सामान्य माणुस ,’भयभीत ‘?
सर्वसामान्य माणूस हे सर्व पाहत असताना भयभीत होऊन गेला. अशा लोकांकडून सामान्यांना त्रास झाला तर त्यांच्या दहशतीमुळे आपली वाचा देखील उघडू शकत नाहीत. आणि मारहाण किंवा त्यापलीकडे अपहरण, खून वगैरे झाले. ते गरिबांचे असतील तर ते फारसे चर्चेला जात नाहीत. एखादी घटना काही त्याला ‘अन्य कांगोरे’ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चे चर्चेत येतात. बाकीच्या घटना या तशाच राहून जातात .असे चित्र आहे .
‘वाल्मिक कराड’ प्रवृत्ती. ..
या सर्व प्रकारांमधे पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, चौथा स्तर अशा वेगवेगळ्या स्तरांमध्ये गुंड निर्माण होतात आणि पहिल्या स्तरातील गुंड बाकीच्या स्तरातील गुंडांना सांभाळतात.पुष्कळ आमदार, खासदार, मंत्री वगैरे अशा प्रकारच्या गुंडांना सांभाळतात. त्यातीलच एक ‘वाल्मीक कराड’ च्या रूपाने समोर आलेला आहे.
यात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते ! आणि आहे .परंतु यामध्ये पैसा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आणि या घटकांची तोंडे बंद करतो. आपल्या स्वार्थासाठी या घटकातील लोक सत्याच्या बाजूने राहण्याच्या ऐवजी आपल्याला काही माहीत नाही किंवा असे काही घडलेच नाही आणि घडत नाही असा आभास निर्माण करतात. आणि रोज राज्यात शेकडो अन्यायग्रस्तांची प्रकरणे दडली जातात ,मॅनेज केली जातात किंवा दुर्लक्षित केली जातात.
सरकारांनी कर्जे घेउन पैसा लुटला !
लॉकडाऊन मध्ये राज्याच्या तिजोरीत पैसा नव्हता. आणि त्यानंतर अचानक वेगवेगळ्या प्रकारचे पैसे लोकांना द्यायला सुरुवात झाली.हे पैसे कुठून आले होते ? तर ते आशिया बँक, युरोपीय बँक इत्यादी बँकांकडून मोठ्या संख्येने पैसा कर्ज घेऊन राज्यात आला. हा आकडा कित्येक लाख कोटींच्या घरातला आहे. त्यामुळे आणि बेकायदा निर्माण होणाऱ्या पैशामुळे राजकारण खर्चिक बनले .सत्ता महत्त्वाची बनली. सत्तेमध्ये असणे महत्त्वाचे बनले. आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी काहीही करणे महत्त्वाचे बनले. कार्यकर्त्यांनी देखील सत्तेबरोबर जे असतील त्यांच्याबरोबर राहणे महत्त्वाचे बनले. कारण वरून पासून ते खाली पर्यंत प्रत्येकाचा कोणता ना कोणता बेकायदेशीर धंदा चाललेला असतो. त्यांना राजकीय संरक्षण, पोलिसांपासून संरक्षण वगैरे गोष्टी तशाच चालू ठेवण्यासाठी अशाप्रकारे ही सत्तेशी जवळीक महत्वाची बनली. विचारांच्या आधारावर राजकारण करण्याची पद्धत बंद होऊन ‘आर्थिक हितसंबध’च्या आधारावर राजकारण करण्याची पद्धत सुरू झाली. आणि जागतिकीकरणाच्या धोरणानंतर असे होईल .असे भाकीत वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी अनेक अर्थतज्ज्ञांनी, विचारवंतांनी केलेले होते. त्याप्रमाणे आज घडत आहे.
Read more >>
‘अ अदानी ‘चा ही सरकारची नवी बाराखडी!: आप ची टीका !
महाराष्ट आता पुरोगामी राहिला आहे का?
महाराष्ट्र हे देशातील सर्वात पुरोगामी राज्य समजले जाणारे राज्य होते. भारतातल्या सर्व पुरोगामी समजल्या जाणाऱ्या चळवळी महाराष्ट्रातून सुरू जाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यता निवारण आणि जाती व्यवस्था अंताची लढाई, आंदोलन, चळवळ, महात्मा फुलेंची ब्राह्मणेतर चळवळ, शाहू महाराजांची अस्पृश्यता निवारणाची चळवळ, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली स्वातंत्र्याची चळवळ, अगदी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ, महिला सक्षमीकरणाची चळवळ अशा सर्व प्रकारच्या चळवळी महाराष्ट्रातून झालेल्या आपण पाहतो.आणि त्याच महाराष्ट्राचा आता अशा प्रकारची ही आणि खूप क्रुरतेकडे वाटचाल करणारी संस्कृती विशेषता राजकीय संस्कृती निर्माण होण्याची पद्धतही महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे.
बिहार कडे बोट दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राचे काय ते पहावे?
महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे असे म्हटले जाते. परंतु आजचा बिहार पूर्वीचा बिहार राहिला नाही आणि बिहारमध्ये ना महाराष्ट्रात इतका पैसा होता ,ना महाराष्ट्र इतके पुरोगामी विचार, चळवळी, आंदोलने,संतपरंपरा,भक्तीमार्ग होती. तेथे जमीनदारीच्या प्रभावाखाली सरंजामशाही ची एक क्रूर अशी व्यवस्था होती.आणि त्या संदर्भात तेथे अनेक आंदोलने देखील झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आणणारी गुन्हेगारी ,माफिया अशा प्रकारच्या प्रवृत्ती देखील वाढीस लागल्या होत्या.परंतु नंतर नितिश कुमार यांच्या काळामध्ये बिहारची प्रतिमा बदलायला सुरुवात झाली.बिहार आता पूर्वीचा बिहार राहिलेला नाही. आणि बिहारची उपमा देणे आता योग्य राहिलेले नाही. बिहारमध्ये महाराष्ट्र सारखा पैसाही नाही. यूपीएससी परीक्षेमध्ये येणाऱ्या तरुणांमधे देखील बिहारींचा नंबर वरचा आहे.
सरपंच, आमदार, खासदार,मंत्री ?
अशा परिस्थितीत बिहार ,बिहार म्हणून दुसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राचे काय होत चालले आहे याच्याकडे लक्ष द्यायला आणि जाणीवपूर्वक चाललेल्या गोष्टी झाकण्यामध्ये महाराष्ट्रातील सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अशा या राजकीय क्षेत्रातील अनेकांनी महाराष्ट्राची पार वाट लावली . अर्थात याला काही सन्मानानीय अपवाद देखील आहेत. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ‘कराड प्रवृत्ती’ गावापासून राज्यापर्यंत सर्वच दिसायला लागलेली आहे. बुद्धीजीवी काही करू शकत नाहीत. बुद्धिजीवींना बऱ्यापैकी चांगले पगार दिले गेलेले आहेत. आणि तो आपल्या चार भिंतीच्या आत मध्ये कुटुंबामध्ये आनंदाने राहणे पसंद करतो. त्या बाहेरील जगामध्ये चाललेल्या गोष्टींबद्दल त्याला माहीत असून देखील तो वाचा फोडण्याची हिंमत करत नाही. अशा परिस्थितीत योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी कोणत्याच प्रकारची यंत्रणा, विचारवंत, नेते आज महाराष्ट्र मध्ये जवळजवळ शिल्लक राहिलेले नाहीत. हे सर्वच क्षेत्रांमध्ये झालेले आहे.
नव्याने वैचारिक मंथन गरजेचे !
म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा नव्याने वैचारिक दृष्ट्या ढवळून काढला गेला पाहिजे. भांडवलशाही आणि सरंजामशाही यांचे स्वरूप आणि ते निर्माण होण्याची कारणे आणि परिणाम यांची माहिती याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आली पाहिजे. माफिया निर्माण होण्याची कारणे आणि त्याचे परिणाम यांची चर्चा समाजामध्ये घडवून आणली पाहिजे. पैसा नेमका कसा निर्माण होतो? कायदेशीर पैसा कोणता ?बेकायदेशीर पैसा कोणता? तो कुठून येतो? कोठे साठवला जातो ?कुठे लपवला जातो? कुठल्या बँकांमध्ये ठेवला जातो? कोणत्या स्वरूपात ठेवला जातो ?अशा प्रकारच्या विषयांवर सांगोपांग चर्चा महाराष्ट्र मध्ये घडणे आवश्यक आहे. बेरोजगारीचे प्रमाण आणि शिक्षणाचे प्रमाण यांचा गुंडगिरीची, हिंसाचाराची निकटचा संबंध आहे. हे नाकारता येणार नाही. शिक्षणावर खर्च वाढवून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत करणे गरजेचे आहे. कारण फक्त पैसा आला म्हणजे माणूस सुसंस्कृत होत नाही .तर एक वेळेस पैसा नाही आला तरी शिक्षणाने माणूस सुसंस्कृत तरी होतो. कायद्याचे उल्लंघन करत नाही. हे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकूण सर्व वैचारिक महाराष्ट्रात घडणे आवश्यक आहे.