Contents
- 1 आटोमोबाइल्स इंजिनिअर बनुन 70 हजार ते अडीच लाख रुपये पगार कसा मिळवाल?
- 1.1 आटोमोबाइल्स इंजिनिअरींग मधे तरुणांसाठी चांगली कमाईची संधी !
- 1.1.1 शिरुर,दि.18 जानेवारी : (संकलन- डॉ नितीन पवार,संपादक, ‘सत्यशोधक न्यूज’)
- 1.1.2 आटोमोबाइल्स इंजिनिअर : प्रस्तावना ; Introduction to Automobiles Engeeniaring.
- 1.1.3 आवश्यक पात्रता-
- 1.1.4 आटोमोबाइल्स इंजिनिअरींग म्हणजे काय? : Automobiles Engeeniaring.Definition
- 1.1.5 आटोमोबाइल्स इंजिनिअरींग म्हणजे काय? : Automobiles Engeeniaring.
- 1.1.6 आटोमोबाइल्स इंजिनिअर्स कोनत्या संधी असतात?
- 1.1.7 आटोमोबाइल्स इंजिनिअर चे शिक्षण देणार्या देशातील प्रमुख संस्था —
- 1.1.8 पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाईल्स इंजिनियरींग चे प्रशिक्षण देणार्या काही संस्था —-
- 1.1.9 आटोमोबाइल्स इंजिनिअर्सचा पगार किती असतो? Automobile Engineering Earning.:
- 1.1.10 About The Author
- 1.1 आटोमोबाइल्स इंजिनिअरींग मधे तरुणांसाठी चांगली कमाईची संधी !
आटोमोबाइल्स इंजिनिअर बनुन 70 हजार ते अडीच लाख रुपये पगार कसा मिळवाल?
आटोमोबाइल्स इंजिनिअरींग मधे तरुणांसाठी चांगली कमाईची संधी !
शिरुर,दि.18 जानेवारी : (संकलन- डॉ नितीन पवार,संपादक, ‘सत्यशोधक न्यूज’)

आटोमोबाइल्स इंजिनिअर बनुन 70 हजार ते अडीच लाख रुपये पगार कसा मिळवाल? याबद्ल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
आटोमोबाइल्स इंजिनिअरींग मधे तरुणांसाठी चांगली कमाईची संधी अर्थातच आहे.मान,सन्मान, प्रतिष्ठा, कमाई,असे बरेच काही या आटोमोबाइल्स इंजिनिअर या क्षेत्रात करियर केल्यास तुम्ही प्राप्त करू शकता.
आटोमोबाइल्स इंजिनिअर :
प्रस्तावना ; Introduction to Automobiles Engeeniaring.
‘ऑटो’ चा शब्दशः इंग्रजी मध्ये अर्थ आहे ‘आपोआप’ किंवा ‘स्वयंचलित’ ! ‘मोबाईल्स’ म्हणजे ‘हलते’ किंवा ‘चालू’ किंवा ‘वाहून नेणारे’ म्हणजेच वाहन ! ऑटोमोबाईल्स म्हणजेच निरनिराळी एक चाकी ,दुचाकी चाकी, चार चाकी, वाहने ,गाड्या ,कार ,ट्रक ,टँकर ,टेम्पो इत्यादी आटोमोबाईल्स या शब्दांतर्गत समाविष्ट होत असतात.याच ऑटोमोबाईल्स या शब्दाविषयी आणि त्याच्या इतर संबंधित माहिती विषयी आपण या लेखांमध्ये आज थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आवश्यक पात्रता-
12 )वी पास (कोनत्याही अधिकृत मान्यताप्राप्त बोर्डातून)
2) फिजिक्स, केमेस्ट्री आणि मथेमटिक्स सह सायन्स माध्यमातुन कमितकमी 50℅ मार्कस पाहिजेत.काही संस्था 60℅ मार्क्सची अट ठेवतात.
3 )बी.इ.किंवा बी टेक ची चार वर्षांची पदवी घ्यावी ललगते.
4 )JEE, JEE Advance, MET Math अशा स्पर्धात्मक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
5) आटोमोबाइल्स इंजिनिअरींग कोर्सची फिस-10 हजार ते 5 लाख पर्यंत असते.
आटोमोबाइल्स इंजिनिअरींग म्हणजे काय? : Automobiles Engeeniaring.Definition

ही माहिती प्रत्येकाला उपयोगी पडणारी अशी आहे त्यामुळे या लेखनाचे प्रयोजन तेच आहे.
आटोमोबाइल्स इंजिनिअरींग म्हणजे काय? : Automobiles Engeeniaring.
ऑटोमोबाईल इंजिनिअर म्हणजे वर उल्लेख केलेल्या ऑटोमोबाईल्स अर्थात वेगवेगळ्या प्रकारची वाहने आहेत .त्या वाहनांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या पाहतात भागांचे जुळवणी करणे म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग.तो डिझायनिंग,डेटेस्टींग,मैन्युफैक्चरिंग, डेव्हलपींग,रिपेअरिंग,पेस्टिंग,सुपरवायझींग करतो.यांना मशीन,इलेक्ट्रॉनिक्स आणि मथेमटिक्स मधे रस असतो.इनोव्हेटिव्ह टेंडन्सी हा महत्वाचा भाग या लोकांमधे असतो. त्यासाठी रिसर्च, प्लॅनिंग करतो. आणि ते जो करतो त्याला ‘ऑटोमोबाईल इंजिनिअर’ असे म्हणतात. अर्थात हे एक फार मोठे क्षेत्र आहे इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या मध्ये ‘इंजीनियरिंग’ चे अनेक प्रकार असतात. त्यापैकी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा एक प्रकार आहे. त्याचबरोबर इतर बरेच प्रकार हे इंजिनिअरिंगच्या कोर्सेस मध्ये अंतर्भूत असतात. हे कोर्सेस शास्त्रोक्त पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने विद्यार्थी आणि इतरही लोक वेगवेगळ्या संस्थांमधून प्रशिक्षणांद्वारे घेत असतात .आणि या प्रशिक्षणानंतर बऱ्याच प्रकारची ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगची कौशल्य स्किल्स व्यक्तीला प्राप्त होतात.विद्यार्थ्याला प्राप्त होतात. आणि त्याद्वारे तो ऑटोमोबाईल इंजिनिअर म्हणून काम करतो. आणि हे काम महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या कामांमध्ये पैसा कमवण्यासाठी चांगला स्कोप असतो.

ऑटोमोबाईल इंजिनिअर हा वस्तू बनवण्यासाठी त्या वस्तूचा अभ्यास करतो. त्याचे एक डिझाईन तयार करतो. त्याप्रमाणे तो वस्तू बनवतो. एकचाकी, दुचाकी, तीन चाकी ,चार चाकी ,टेम्पो, बस, टँकर, रिक्षा इत्यादी सर्व प्रकारची वाहने अशाप्रकारे ऑटोमोबाईल इंजिनियर आधी त्यांचे डिझाईन तयार करुन नंतर त्याप्रमाणे बनवलेले असतात.
आटोमोबाइल्स इंजिनिअर्स कोनत्या संधी असतात?
1.आटोमोबाइल्स इंजिनिअर,
2.कार डिझाईनर,
3.आटोमोबाइल्स डिझायनर,
4.मल्टिनशनल कंपनी,
5.कार्पोरेट वर्ल्ड मधे एक्झिक्युटिव्ह पोझिशन वर काम करता येते.
आटोमोबाइल्स इंजिनिअर चे शिक्षण देणार्या देशातील प्रमुख संस्था —
- 1.जवाहरलाल नेहरु टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, हैदराबाद.
- 2.चंदीगढ युनिव्हर्सिटी, चंदिगढ,
- 3.एस आर एम इंजिनिअरींग काॅलेज , कांचीपुरम,
- 4.मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मनिपाल.
- 5.वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू.
भारतातल्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयटी क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे एक महत्त्वाचे शिक्षण उपलब्ध असते.त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंजिनियर्स ना भारताबाहेर परदेशातही मोठी मागणी असते .आणि भारतातील कित्येक ऑटोमोबाईल इंजिनियर्स हे परदेशातही काम करत असताना आपल्याला दिसतात . चांगली कमाई करत असताना आपल्याला दिसतात . अर्थात हे एक सायन्स क्षेत्रातील क्षेत्र आहे .त्यामुळे त्यासाठी इंग्लिश येणे ,सायन्स मधून शिक्षण होणे आणि ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगचा पदविका ,पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा त्याही पेक्षा अधिक संशोधनात्मक अभ्यास करणे आवश्यक असते.
विद्यार्थी किंवा ज्यांना ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग शिकायचे आहे. ते बी टेक सारख्या कोर्सला, त्याचबरोबर तीन वर्षांचे ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असलेल्या कोर्सला ऍडमिशन घेऊन हे प्रशिक्षण मिळवू शकतात. हा अभ्यासक्रम कष्टप्रद असतो. परंतु त्यातून मिळणारे ज्ञान आणि कौशल्य ही समाजासाठी , देशाच्या तांत्रिक क्षेत्रातल्या प्रगतीसाठी आणि स्वतःच्या चांगल्या पगारासाठी करणे आवश्यक असते .म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण हे ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग च्या क्षेत्राकडे वळताना दिसतात .त्या क्षेत्रात ते यशस्वी ही होत असल्याचे आपण पाहतो.
पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाईल्स इंजिनियरींग चे प्रशिक्षण देणार्या काही संस्था —-
1) CADD सेंटर,पुणे.,
2) स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी,
डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे,
3) ऑथोराइज्ड एबीसी कार्ड अँड आयटी ट्रेनिंग सेंटर गव्हर्नमेंट ॲप रोड वाघोली,पुणे,
4.युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर ,(USDV) Strict पेठ, पुणे,
5) विघ्नहर्ता टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे -नाशिक रोड, भोसरी गाव,पुणे. ( अर्थात नेटवर सर्च केल्यास भरपुर अशी यादी मिळेल.इतर सारी माहिती मिळेल.)
आटोमोबाइल्स इंजिनिअर्सचा पगार किती असतो? Automobile Engineering Earning.:

आटोमोबाइल्स इंजिनिअर्सचा पगार दरमहा 70 हजार ते अडीच लाख रुपये दरमहा इतका असावा.हा आकडा थोडाफार कमी किंवा जास्त असावा.
एकंदरीत आटोमोबाइल्स इंजिनिअर बनुन आपले करियर व आपली स्वप्ने साकार होतील यात शंका नाही.
