
Contents
- 1 शिरुर मधील बहुचर्चित ‘असिफ खान हल्ला प्रकरणा’ तील आरोपीस अखेर अटक !
- 1.1 शिरुर पोलिसांनी ‘सापळा’ रचुन आरोपीला केले जेरबंद !
- 1.1.1 शिरूर,दिनांक – 20 जानेवारी : ( ‘सत्यशोधक न्युज रिपोर्ट ‘)
- 1.1.2 शिरुर शहरातील असिफ खान हे प्रभावी व्यक्तीमत्व !
- 1.1.3 धारदार हत्यारांनी जिवे मारण्याच्या प्रयन्त?
- 1.1.4 शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा होता दाखल !
- 1.1.5 गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती ! सापळा रचला गेला !
- 1.1.6 वरिष्ट पोलिस अधिकारी व तपास पथक सहभागी !
- 1.1.7 About The Author
- 1.1 शिरुर पोलिसांनी ‘सापळा’ रचुन आरोपीला केले जेरबंद !
शिरुर मधील बहुचर्चित ‘असिफ खान हल्ला प्रकरणा’ तील आरोपीस अखेर अटक !
शिरुर पोलिसांनी ‘सापळा’ रचुन आरोपीला केले जेरबंद !
शिरूर,दिनांक – 20 जानेवारी : ( ‘सत्यशोधक न्युज रिपोर्ट ‘)
शिरुर मधील बहुचर्चित ‘असिफ खान हल्ला प्रकरणा’ तील आरोपीस अखेर अटक करण्यात आली आहे. शिरुर पोलिसांनी ‘सापळा’ रचुन आरोपीला जेरबंद ! केले आहे. आरोपी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सापडला आहे. हे शिरुर पोलिसांसमोर एक आव्हान होते.पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.पुणे जिल्हा वरिष्ट पोलिस अधिकारी या प्रकरणामधे लक्ष घालुन होते.अखेर शिरुर पोलिस तपास पथकाला हे यश मिळाले आहे.
शिरुर शहरातील असिफ खान हे प्रभावी व्यक्तीमत्व !
खुनाचा प्रयत्न करून एक महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस पर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्यांना जेरबंद केले आहे. शिरूर पोलीस स्टेशन मधे आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर 104/ 2024 असा होता.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 109, 49 ,351(2) मधील फिर्यादी आसिफ अजीम खान, वय -54 वर्षे ,व्यवसाय -ऑटो ॲक्सेसरीज ,राहणार- भाजी बाजार ,शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दिली होती.ती तारिख 23 /12/ 2024 रोजी संध्याकाळी साडेआठ ही होती.’शिरुर’
धारदार हत्यारांनी जिवे मारण्याच्या प्रयन्त?

त्यानुसार शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत जुन्या नगर ते पुणे रोडवर नाज ऑटो ॲक्सेसरीज हे फिर्यादीचे दुकान आहे. त्यांचा पुतण्या जमीर खान ,हुसेन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाच्या कारणावरून दिनांक 17/ 12/ 2024 रोजी समीर शेख यांनी फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीच्या नाज किराणा स्टोअर्स येथे केलेल्या गोंधळ केला होत.त्या कारणावरून आरोपी
1) आयान समीर शेख
2) हुसेन शहीद शहा ,
दोन्हीही राहणार फकीर मोहल्ला ,शिरूर यांच्या सांगण्यावरून यांचा पुतण्या सहिल जमीर खान ,वय -22 वर्षे, राहणार -भाजी बाजार, शिरूर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे यास त्याच्या हातातील कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व हातावर वार केले होते. त्याला गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता .
शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा होता दाखल !

सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास श्री. शुभम चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी शहीद शाह यास 24/ 12/ 2024 रोजी गुन्ह्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली होती. आरोपीत आयान समीर शेख हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन श्री. संदेश केंजळे, पोलीस अधीक्षक, शिरूर यांनी तपास पथकाला गुन्हा्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने तपास पथकाने अधिकारी व अंमलदार हे यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते.
गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती ! सापळा रचला गेला !
त्यानंतर गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की आरोपी आयाम समीर शेख हा तासगाव ,जिल्हा -सांगली येथे आहे. सदर बातमीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकाने श्री. शुभम चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक ,पोलिस अंमलदार विजय शिंदे, मिरज पिसाळ हे तासगाव जिल्ह्यातील सांगली येथे आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले. त्या पोलिसांना यश आले आहे. आरोपी आयान शेख तेथून फरशी बसवण्याच्या कामानिमित्त उंब्रज, तालुका -कराड ,जिल्हा- सातारा येथे गेल्या बाबत माहिती मिळाली. सांगली इथून पुन्हा श्री. शुभम चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक ,पोलिस अमलदार ,विजय शिंदे, मिरज पिसाळ हे उंब्रज येथे जाऊन माहिती घेऊन आले. उंब्रज ,तालुका- कराड, जिल्हा- सातारा येथील एसटी स्टँड जवळून त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. आपला सापळा लावून आरोपीला त्यांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या कामी अटक केली आहे.
वरिष्ट पोलिस अधिकारी व तपास पथक सहभागी !
आरोपी समीर शेख यास माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 20/1/ 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. प्रशांत ढोले ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार, बाळासाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे ,नीरज पिसाळ, विनोद काळे ,नितेश थोरात ,सचिन भोई, निखिल रावडे ,अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली आहे.