
Contents
शिरुर मधे गोळीबार करणार्यास आप तासात पकडले !
शिरुर पोलीसांनी तत्काळ सापळा रचुन आरोपीला आठ तासात बेड्या ठोकल्या !
शिरुर, दिनांक 22 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट)

शिरुर मधे गोळीबार करणार्यास आठ तासात पकडले आहे.शिरुर पोलीसांनी घटना घडल्यानंतर तत्काळ ‘सापळा’ रचुन आरोपीला बेड्या ठोकल्या आरोपी जोधपुर राजस्थान मधे पळुन जाण्याच्या तयारीत होता.परंतु अहिल्यानगर बसला स्थानकावर पकडला गेला आहे.
शिरुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. …
पिस्तूलने खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हा घडल्यापासून आठ तासात पर जिल्ह्यातून जेरबंद केले आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची आणखीन एक धडाकेबाज कामगिरी या यशाने आज शिरुर करांना पहायला मिळाली आहे.’शिरुर’
Read more >>
शिरुर मधे गोळीबार?का ,कुठे आणि कोणी केला ? वाचा सविस्तर!
कालच घडली होती घटना !

शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 46/225 असा आहे.तर भारतीय न्याय सहीचा कायदा कलम 2023 च्या कलम 109,351 (2) 352 ,आर्म कलम 325 सह महापोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात काल आला होता.
गैरसमजातुन केला होता हल्ला !
यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती. ती अशी की दिनांक 20 /1/ 2025 रोजी २१:३० वाजण्याच्या सुमारास शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत सरदार पेठ येथील स्वीटी प्रोविजन स्टोअर्स समोर हलवाई चौक मारुती आळी रोड वर कृष्णा वैभव जोशी, राहणार- सरदार पेठ, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे याचा फिर्यादीची त्याच्याविरुद्ध इन्कम टॅक्स ला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाला होता.त्यानंतर आरोपीने दारू पिऊन फिर्यादीच्या दुकानाजवळ येऊन शिवीगाळ केली होती. त्याच्या जॅकेट मधील एक पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीला जिवे मारण्याची मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल फिर्यादीच्या छातीवर रोखले.’ मी तुला आज जिवंत सोडणार नाही !’ अशी धमकी देऊन पिस्तुलचा खटका दाबत असताना फिर्यादीने त्याचा हात बाजूला ढकलला. तरी देखील त्याने त्याचे हातातील पिस्तूल मागेपुढे ओढत होता. त्यातून एक गोळी खाली रोडवर पडली.
Read more >>
जीवे मारण्याची दिली होती धमकी !
त्यानंतर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली होती .आरोपी जोशी हा देऊन तेथून पळून गेला होता .वरील वगैरे मजकुरावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक करत होती.
सदर गुण्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन संदेश केंजळे यांनी तपास पथकाला पुण्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.त्या अनुषंगाने तपास पथकाने तपास पथकाचे अधिकारी शुभम चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली .
Read more >>
जोधपुर राजस्थान येथे पळुन जाण्याच्या तयारीत होता. …
ती अशी की सदर गुन्ह्यातील आरोपीत कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बस स्थानकावरून जोधपुर राजस्थान येथे जाणार आहे. त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तपास पथकाच्या अधिकारी व पोलीसांनी तपास पथके अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रवाना केली होती .तपास पथकांनी अहिल्यानगर बस स्थानकावर सापळा लावला. आरोपी त्या ठिकाणी येताच त्यास सीताफिने ताब्यात घेतली.
गुन्ह्याचे स्वरुप होते गंभीर !
सदरचा अति गंभीर गुन्हा घडल्यापासून आठ तासाच्या आत आरोपी जर बंद करण्यात आला आहे. आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असताना माननीय न्यायालयाने दिनांक 24 /1/ 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी वनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काढून देखील जप्त करण्यात आले आहे .
Read more >>
वरिष्ट पोलिस अधिकार्यांच्या निगरानीखाली झाली कार्यवाही…
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण, पोलिस हवालदार, नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विनोद काळे ,सचिन भोई ,विजय शिंदे, मिरज पिसाळ, नितेश थोरात, निखिल रावडे ,अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने पार पाडली आहे.