
Contents
- 1 सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
- 1.1 सैफ अली खान प्रकरण केवळ ,’ड्रामा’ आहे का?अशी दुसर्या बाजुला चर्चा !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 24 जानेवारी : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 सैफ अली खानला रिक्षा चालक भजन सिंग राणाने दवाखान्यात नेले !
- 1.1.3 ‘पण भजन सिंग राणा ‘बक्षिस’ मागणार नाही !
- 1.1.4 “मै किसी चीज के लिए लालाच नहीं कर रहा हूं “- भजन सिंग राणा
- 1.1.5 सैफ अली खान च्या घरी वाहन उपलब्ध नसल्यामुळे रिक्षा ?
- 1.1.6 डॉक्टरांच्या नजरेत सैफ अली खान, ‘शेर’ ?
- 1.1.7 भजन सिंग राणाला मोठे (?) ‘बक्षिस’?
- 1.1.8 सैफ अली खान हल्ला प्रकरणात सत्य काही औरच?
- 1.1.9 About The Author
- 1.1 सैफ अली खान प्रकरण केवळ ,’ड्रामा’ आहे का?अशी दुसर्या बाजुला चर्चा !
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
सैफ अली खान प्रकरण केवळ ,’ड्रामा’ आहे का?अशी दुसर्या बाजुला चर्चा !
शिरुर,दिनांक 24 जानेवारी : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली. म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार आहे. अशी बातमी आहे.तर
सैफ अली खान प्रकरण केवळ एक ,’ड्रामा’ आहे अशी चर्चा दुसर्या बाजुला जोर पकडत आहे.नितेश राणे यांनी तसे म्हटले आहे, अशी बातमी आहे. एकुणच या प्रकरणातील सत्य नेमके काय आहे? की त्यातील सत्य हे खान परिवार,पोलिस आणि विविध Story रंगवणार्या काही वाहिन्यांच्या पत्रकारांनाच माहिती राहिल !
सैफ अली खानला रिक्षा चालक भजन सिंग राणाने दवाखान्यात नेले !

सैफ अली खानने जर मला रिक्षा भेट म्हणून दिली तर स्वीकारेल असे रिक्षा ड्रायव्हर भजनसिंग राणा म्हणतो आहे. ‘पण मी असे बक्षिस मागणार नाही ‘ असेही तो सांगतो.संकटसमयी रिक्षा चालकभजन सिंग राणाने सैफ अली खानला चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर लीलावती रुग्णालयात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने सैफ अली खान कडुन बक्षिस मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.
‘पण भजन सिंग राणा ‘बक्षिस’ मागणार नाही !
१६ जानेवारी २०२५ रोजी पहाटे जखमी सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या राणाने सैफ अली खान कडून नवीन रिक्षा स्वीकारण्याची तयारी दर्शविली असली तरी त्याने बक्षीस मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“मै किसी चीज के लिए लालाच नहीं कर रहा हूं “- भजन सिंग राणा
एका माध्यमाशी बोलताना भजन सिंग राणा हिंदीत म्हणाला, “मैं मांग तो नही रहा हुं ! लेकिन मगर सैफ अली खान की इच्छा हुयु और वो बक्षिस देना चाहेंगे .तो मैं नयी रिक्षा जरुर ले लुंगा. तो पुढे म्हणतो की ” मैंने कभी नही कहा की मैने जो किया है उसके लिए सैफ अली खान से मुझे कुछ मिले या मै उस चीज के लिए लालाच कर रहा हू.”
सैफ अली खान च्या घरी वाहन उपलब्ध नसल्यामुळे रिक्षा ?

सैफ अली खान हल्ल्याची घटना पहाटे दोन वाजता घडली .सैद अली खान जेव्हा जखमी आणि रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत होता तेव्हा त्याच्या वांद्रे्यातील घरात हल्लेखोराशी झालेल्या हातापाईनंतर जखमी झालेल्या सैफ अली खानला रुग्णालयात नेण्यात आले होते .सैफच्या घरी वाहन उपलब्ध नसल्यामुळे (?) सैफच्या कुटुंबीयांनी आणि कर्मचाऱ्यांनी राणाची ऑटो-रिक्षा थांबवली. तेव्हा या रिक्षा चालकाने अभिनेता सैफ अली खान याला त्वरीत लीलावती रुग्णालयात नेले होते.
सैफ अली खान सहा दिवस रुग्णालयात राहिला. तेथे त्याच्या हातावर आणि मानेवर झालेल्या जखमांवर उपचार चालु होते.
डॉक्टरांच्या नजरेत सैफ अली खान, ‘शेर’ ?
२१ जानेवारी २०२५ रोजी त्याला रुग्णालयातुन घरी पाठवण्यात आले होते. त्या वेळी सहा तासांच्या गुंतागुंतीच्या (?) शस्ञक्रियेनंतरही तो जणु ‘शेर ‘ असल्यासारखा चालताना दिसला.हे चमत्काराशिवाय काही कमी नाही !
भजन सिंग राणाला मोठे (?) ‘बक्षिस’?
डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफने भजनसिंग राणा राणाला भेटण्याचा निर्णय घेतला म्हणे ! वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी वेळेवर मदत केल्याबद्दल त्याचे वैयक्तिकरित्या आभार मानले.अशी बातमी आहे.सैफ अली खान वर चाकूहल्ला झाल्यानंतर मिका सिंगने रिक्षा चालकाला १ लाख रुपये बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे म्हणे ! मात्र ते ११ लाख रुपये दिल्यास योग्य होईल, अशीही चर्चा सुरु होती. हे काही सन्मान जनक बक्षिस आहे का ? जीवाची किंमत काही फक्त एक लाख रूपये? आणि तीही करोडोंची संपत्ती असणार्या ‘नवाब’ पुत्राकडुन !
सैफ अली खानने रिक्षा चालकाला ‘सन्मानाने’ (?) वागवले आहे हे मात्र खरे (?) डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान याने भजन सिंग राणाची भेट घेतली. अशी माहिती शेअर केली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात सत्य काही औरच?

अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. जसे की पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेवुन अजुन का दिली नाही ? सैफ अली खान याने नेमका काय जबाब दिला आहे? माध्यमांकडुन दाखवले गेलेले सी सी टी व्ही फुटेज ए आय ने बनवले गेले आहेत का? त्यात दिसणारा हल्लेखोर आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी हे दोन वेगळे व्यक्ती आहेत की एकच? फोरेन्सिक अहवाल काय आहे? न्युरो सर्जरी झालेला रुग्ण ऐटीत चालत घरी जातो का ?आणि केवळ सहा दिवसांतच ! असा रुग्ण व अशी शस्ञक्रिया दुर्मिळ नाही का? सैफ अली खान च्या घरात एकुण आठ माणसे होती.सी सी टी व्ही मधे दिसणारा हल्लेखोर आणि आठ माणसे त्याला पकडुन ठेवु शकत नाहीत का? तो सहज पणे चालत जीने उतरताना दिसतो.शिवाय अपार्टमेंटमधील इतर शेजारी यांनी नेमके या प्रसंगी काय केले? सुरक्षा रक्षकांकडुन काही प्रयत्न कसा झाला नाही? एवढेच नाही तर घरातील आठ माणसांपैकीच कुणी काही ‘अज्ञात’ कारणामुळे हे कृत्य केले आहे का? सैफ अली खान ची आधीची पत्नी अमृता सिंग ही एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री देखील तेथे जवळच रहात आहे.तिला दुर करताना सैफ अली खान शी तिने जोरदार भांडण केले होते. शिव्याशाप दिले होते.
असो.पण ज्या ज्या वेगवेगळ्या थिअरी माध्यमांतुन रंगवुन सांगितल्या जात आहेत.ते सत्य आहे.की सत्य काही औरच आहे !
( Thanks to Wikipedia for Images in this content)