
Contents
- 1 घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी !
- 1.1 घोडगंगा सहकारी साखर कारखाना ‘बहुचर्चित’ कारखाना ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक – 25 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
- 1.1.2 घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी !
- 1.1.3 घोडगंगा सहकारी कारखान्याच्या उपकेंद्रात चोरीची घटना !
- 1.1.4 फिर्यादी –
- 1.1.5 132केव्ही उपकेंद्र चोरटयांचे टार्गेट ?
- 1.1.6 उप कार्यकारी अभियंता यांच्याकडुन शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.7 त्या ठिकाणी चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे-
- 1.1.8 चोरटा अज्ञात?
- 1.1.9 शिरुर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल !
- 1.1.10 About The Author
- 1.1 घोडगंगा सहकारी साखर कारखाना ‘बहुचर्चित’ कारखाना ?
घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी !
घोडगंगा सहकारी साखर कारखाना ‘बहुचर्चित’ कारखाना ?
शिरुर,दिनांक – 25 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट)

घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी झाली आहे. तसा घोडगंगा सहकारी साखर कारखाना ‘बहुचर्चित’ कारखाना आहे. विशेषत: गेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी हा कारखाना मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.आता या कारखान्यात चोरी झाली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्याच्या नजरा या घटनेकडे वळल्या आहेत.
Read more >>
घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी !
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद केला गेला आहे. त्यानुसार घटना अशी घडली आहे. की
शिरूर पोलीस अंकीत न्हावरे पेालीस दुरक्षेत्र येथे हजर राहुन सरकारतर्फे फिर्यादी जबाब देण्यात आला आहे.तो असा की फिर्यादी अमर दादाराव वाडेकर, वय -44 वर्षे, व्यवसाय- उपकार्यकारी अभियंता, राहणार- बाबुरावनगर, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे हे वरील ठिकाणी राहण्यास आहेत. महाराट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादीत येथील 132 केव्ही उपकेंद्र कुरूळी येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर ते 7 वर्षापासुन कार्यरत आहेत. त्यांच्या कडे न्हावरे येथील घोडगंगा कारखाना येथील 132 केव्ही उपकेंद्राचा अतिरीक्त कार्यभार आहे.
घोडगंगा सहकारी कारखान्याच्या उपकेंद्रात चोरीची घटना !
त्यांनी दिनांक – 22/01/2025 च्या रात्री 20:00 वाजता घोडगंगा कारखाना येथील 132 केव्ही उपकेंद्रांची पाहणी केली.तेव्हा तेथे सर्व व्यवस्थीत होते.
फिर्यादी –
अमर दादाराव वाडेकर, वय -44 वर्षे, व्यवसाय -उपकार्यकारी अभियंता, राहणार- . बाबुरावनगर, तालुका- शिरूर, जिल्हा – -पुणे.
132केव्ही उपकेंद्र चोरटयांचे टार्गेट ?
नंतर तारिख 23/01/2025 रेाजी सकाळी 60:08 वाजण्याचा सुमारास ते घरी बिसर येथे होते. त्यांना घोंडगंगा कारखान्यातील इलेक्ट्रीशनचे काम पाहणारे राजेद्र भगवान खोरे यानी फोनद्वारे कळविळे.ते असे की घोडगंगा कारखान्यातील 132 केव्ही उपकेंद्रात चोरी झाली आहे .
उप कार्यकारी अभियंता यांच्याकडुन शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
असे कळविल्यानंतर ते लगेच घोडगंगा कारखाण्यात आले.त्यांनी पाहीले की 132 केव्ही उपकेंद्रातील स्वीच यार्डातील एक आयसोलेटरचे तीन कॉपर कशाच्या तरी सहायाने कट केले गेले होते. ही चोरी झाल्याचे त्यांना आढळुन आले. तसेच अर्थीगची कॉपर पट्टी , बॅटरी रूममधील कॉपर पट्टी कट करून नुकसान केल्याचेही दिसुन आले. सदर ठिकाणी खातरजमा करून सदर घटनेचा पंचनामा त्यांनी केला. त्यानंतर शिरुर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.
त्या ठिकाणी चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे-
1) 17430/- रुपये आयसोलेटर चे तीन कॉपर रॉड एका कॉपरचे रॉडचे वजन 7 किलो, त्याप्रमाणे तीनरॉडचे वजन 21 कि.लो. प्रत्यकी किलोची कि. 830 रूपये प्रमाणे असे एकुण
17,430/- रूपये अशी एकुण किंमत आहे.
ब्रेकिंग न्युज : अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे?
चोरटा अज्ञात?
तारिख – 22/01/025 रेाजी रात्री 20:00 वाजण्याच्या सुमारास ते तारिख 23/01/2025 रोजी 80:80 वाजण्याच्या दरम्यान न्हावरे, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावचे हद्दीतील घोडगंगा कारखान्यातील 132 केव्ही उपकेंद्रातील कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीषिवाय लबाडीचे इरादयाने 17430/- रूपये असे वरील वर्णनाचे कॉपर रोड कशाच्या तरी सहायाने कट करून, चोरी केली आहे. तसेच अर्थीगची कॉपर पट्टी व बॅटरी रूममधील कॉपर पट्टी कशाच्या तरी सहाय्याने कट करून नुकसान केले आहे.
शिरुर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल !

म्हणुन त्यांची त्या अज्ञात चोरटयाविरूद्ध कायदेषीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्धशिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर – 53/2025 असा आहे.तर भास्तीय विदयुत कायदा कलम 136 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. जाधव हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी श्री .संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.