
Contents
- 1 ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी !
- 1.1 ट्रॅक्टर दोन ट्राली उसासह भरधाव वेगात !
- 1.2 फिर्यादी :
- 1.3 स्वप्निल शांताराम फराटे ,वय- २९ वर्षे, व्यवसाय- शेती ,राहणार- मांडवगण फराटा ,तालुका शिरूर ,जिल्हा -पुणे
- 1.4 आरोपी :
- 1.5 विठ्ठल बाळासाहेब गोलांडे, राहणार – इनामगाव ,तालुका – शिरूर ,जिल्हा – -पुणे.
- 1.6 मृत :
- 1.7 संजय पोपट ओव्हाळ ,वय -५० वर्षे ,राहणार – नांद्रेमळा, इनामगाव तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी !
ट्रॅक्टर दोन ट्राली उसासह भरधाव वेगात !
शिरुर , दिनांक 28 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for featured Image )

ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला आहे.संबंधित ट्रॅक्टर दोन ट्राली उसासह भरधाव वेगात चाललेला होता.असे फिर्यादीने नोंदवले आहे.हा वाहन चालक बेफिकीरपणे ट्रॅक्टर चालवत होता.त्याच्या हयगयपणामुळे एका जणाचा मृत्यु झाला. ही घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा जवळ घडली आहे. शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Road more >>
शिरुर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंद करण्यात आपल्या नुसार घटना पुढील प्रमाणे घडली आहे.
ट्रॅक्टर जात होता भरधाव वेगात?
फिर्यादी :
स्वप्निल शांताराम फराटे ,वय- २९ वर्षे, व्यवसाय- शेती ,राहणार- मांडवगण फराटा ,तालुका शिरूर ,जिल्हा -पुणे
तारिख २५/०१/२०२५ रोजी रात्री १९: ३० वाजण्याच्या सुमार होता.शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा , तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत आरवाद होटेल आहे.त्याच्या समोर मांडवगण फराटा ते तांदळी जाणारा रोड आहे.या रोडवर मांडवगण फराटा बाजुकडून तांदळी बाजुकडे ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली सह भरून जाणारा ट्रॅक्टर जात होता.तो महींद्रा कंपनीचा नोवो ६०५ डी. आय. कंपनीचा त्याचा नंबर MH&12/PZ&8984 असा आहे. त्यावरील चालक विठ्ठल बाळासाहेव गोलांडे, राहणार – इनामगाव ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात, हयगईने , अविवाराने, चुकीच्या साईडला चालवला.
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
आरोपी :
विठ्ठल बाळासाहेब गोलांडे, राहणार – इनामगाव ,तालुका – शिरूर ,जिल्हा – -पुणे.
ट्रॅक्टर ने ठोकले मोटार सायकल ला !
समोरून तांदळी बाजुकडुन मांडवगण बाजुकडे जाणारे फिर्यादी फिर्यादी स्वप्निल शांताराम फराटे ,वय -२९ वर्षे, व्यवसाय -शेती, राहणार – मांडवगण फराटा, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे यांचा मामा संजय, पोपट ओव्हाळ ,वय -५० वर्षे ,राहणार – नांद्रेमळा, इनामगाव, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची एच एफ, डीलक्स मोटारसायकल नंबर MH&12/XS&1315 होती.तीला पाठीमागील ट्रॉलीची जोरदार धडक बसून अपघात झाला .
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
मृत :
संजय पोपट ओव्हाळ ,वय -५० वर्षे ,राहणार – नांद्रेमळा, इनामगाव तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
ट्रॅक्टर अपघात ग्रस्त : दुचाकीस्वार मृत्युमुखी !
अपघातात फिर्यादीचे मामा संजय ओव्हळ यांना किरकोळ व गंभीर दुखापती झाली. त्यातच त्यांचा उपचारापुर्वी मृत्यु झाला. मोटारसायकल चे देखील नुकसानीस झाले. अपघात घडुन देखील अपघाताची खबर न देता तसाच हा चालक बेफिकीरपणे तेथून पळून गेला.
ट्रॅक्टर चालकावर शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
म्हणून फिर्यादीची विठ्ठल बाळासाहेब गोलांडे ,राहणार- इनामगाव ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांच्या तिरुध्द कायदेशीर फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर -६४/२०२५ असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम २८१,१२५ (अ) (ब), १०६ (१),३२४ (४) मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४/१७७ प्रमाणे आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत. तर दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पुढे चालु आहे.