
Contents
- 1 मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ अनिल डांगे आणि सावळाराम आवारी यांचे शिरूर मध्ये आमरण उपोषण ! (पहा व्हिडिओ सह )
- 1.1 मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची ताजी बातमी आहे !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 29 जानेवारी 2025: (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक !
- 1.1.3 मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी पुन्हा अंतरवली सराठी येथे आमरण उपोषणास !
- 1.1.4 मनोज जरांगे पाटील उपोषणास डांगे व आवारी यांचे समर्थन व आमरण उपोषण !
- 1.1.5 अनिल डांगे व सावळाराम आवारी यांचे निवेदन !
- 1.1.6 मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलतील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
- 1.1.7 About The Author
- 1.1 मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची ताजी बातमी आहे !
मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ अनिल डांगे आणि सावळाराम आवारी यांचे शिरूर मध्ये आमरण उपोषण ! (पहा व्हिडिओ सह )
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची ताजी बातमी आहे !
शिरुर,दिनांक 29 जानेवारी 2025: (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ अनिल डांगे आणि सावळाराम आवारी यांचे शिरूर मध्ये आमरण उपोषण (पहा व्हिडिओ सह ) सुरु झाले आहे.शिरुर तहसिलदार कार्यालय आवारात हे उपोषण आंदोलन चालु आहे. दरम्यान
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची ताजी बातमी आहे ! हे आंदोलन महाराष्ट्रभर होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन तीव्र होत असल्याच्या बातम्या येत आहे. या पार्श्वभूमीवर आणि अनिल डांगे व सावळाराम आवारी हे देखील आमरण उपोषणास बसल्यामुळे शिरुर तालुक्याचे तिकडे लक्ष वेधले गेले आहे.
Read more >>
तहसिलदार शिरुर कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे साखळी उपोषण !
चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात !
मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक !

संघर्ष योद्धा असे मानले जाणारे मराठा/कुणबी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील हे मानले जातात. त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा म्हणून दोन मराठा सेवक म्हणुन बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. ‘सत्यशोधक न्युज’ ने या आंदोलन कर्त्याशी बातचीत केली आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी पुन्हा अंतरवली सराठी येथे आमरण उपोषणास !
मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ , शनिवार पासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी कार्यकर्त्याचा समावेश या आंदोलनात आहे.सर्वांनी सामूहीक आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
Read more >>
मनोज जरांगे पाटील उपोषणास डांगे व आवारी यांचे समर्थन व आमरण उपोषण !
‘मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण घेण्यासाठी आम्ही आता माघार घेणार नाही’ , असे आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
‘त्याच आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाचे आम्ही काही तरी देणे लागतो’ या भावनेतुन मराठा सेवक अनिल किसन डांगे व सावळाराम दादा आवारी हे मनोज जरांगे पाटील आंदोलनातील कार्यकर्ते २८/०१/२५ रोजी मंगळवार पासून तहसिल कार्यालय,शिरूर आवारात उपोषणास बसले आहेत.
‘मराठा/कुणबी आरक्षण व इतर मागण्यासाठी आमरण उपोषणास सकाळी १०:०० वाजता हे कार्यकर्ते बसत आहेत.
अनिल डांगे व सावळाराम आवारी यांचे निवेदन !

त्याच अनुषंगाने या दोन युवकांनी आज तहसील कार्यालय व शिरूर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देत हे आंदोलनाचे रणशिंग फुंकलेले आहे.
Read more >>
मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलतील
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

– ‘सगेसोयरे’ ची जी मागणी आहे. तिची अंमलबजावणी करावी.
– मराठा आंदोलकांवर यापूर्वी महाराष्ट्रभर आंदोलन केले गेले होते.त्यात त्यांच्यावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावेत.
– हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध संस्थानचे गॅझेटिअर्स अशा स्रोतांनुसार जी माहिती मिळते.ती या आरक्षणासाठी लागू करावी.
– या आरक्षण आंदोलनात यापुर्वी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत दिली होती.ती राज्य सरकारने बंद केली आहे. ती पुन्हा सुरु करावी.अशा कुटुंबांंतील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत राज्य सरकारने रुजू करून घ्यावे.
– स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करावा. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी.
– तसेच स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
या प्रमुख मागण्या असलेले निवेदन अनिल डांगे व सावळाराम आवारी यांनी शिरुर स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांना दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन सत्यशोधक न्युज ने प्रत्येक वेळी कव्हर केले आहे. गरीब मराठे यांना आरक्षण व इतर सवलती या मिळाव्यात.यासाठी सत्यशोधक न्युज आग्रही आहे.सत्यशोधक न्युज ने पुणे येथील यशवंतराव चव्हाण चौकातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कव्हर करण्यासाठी तेथे जावुन लाखो मराठा बांधवांच्या समवेत राहुन हा प्रश्न समजुन घेण्याचा प्रयत्न केला होता. ओबीसी बांधवांचे आरक्षण कमी न करता कुणबी मराठा यांना ओबीसी आरक्षणामधे समाविष्ट करणे गरजेचे आहे. अशी सत्यशोधक न्युज भुमिका आहे.मात्र त्यासाठी तामिळनाडूतील 78 % आरक्षणासारखी तरतुद केंद्र सरकारने करणे गरजेचे आहे. पण केंद्रातील मोदी सरकारची इच्छा शक्ती असणे आवश्यक आहे.