
Contents
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
.
उसतोड कामगार जळगाव येथुन आणणार होते ! शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक – 30 जानेवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks for featured Image in this content to pixabay.com )
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला गेला आहे. हा 420 पणा केला गेला आहे. पुढे काय घडले ते वाचा या बातमीत ! उसतोड कामगार जळगाव येथुन आणणार होते खरे पण आणले नाहीत.पाच लाख प हजार रुपये घेतले.पण उस कामगार दिले नाहीत.अशा दोघांवर शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
” मराठीत एक म्हणच पडली.’ 420 पणा करणे’.एखादा फसवणुक करत असेल किंवा खोटेपणा,लबाडपणा करत असेल.तर त्याला ,’ तो 420 आहे’ असा त्याच्यावर शेरा सहज मारला जातो. तर 420 हा आकडा या म्हणीत किंवा वाक्यप्रचारात कसा काय आला ? असा प्रश्न आपल्याला पडत असतो. पण इंग्रजांच्या काळामध्ये कायद्यात अशा प्रकारे फसवणुक करण्यास शिक्षेची तरतुद कलम 420 मधे केली होती. तेव्हापासुन ही म्हण मराठीत आली.हिंदीतही ,’चार सौ बीसी’ करणे अशी म्हण आहे ! आजही असे 420 समाजात आहेतच !”
Read more >>
उसतोड कामगार मिळावेत म्हणुन 2022 ला उचल दिली—–

फिर्यादी वैभव राघू पाठक, वय – 35 वर्ष ,राहणर- कुकडी कॉलनी ,पराग कारखाना , रावडेवाडी, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी ऊसतोड कामगार देण्यासाठी रक्कम दिली. नंतर त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये कारखाना चालू झाला.त्यावेळी रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांचेकडे उसतोड कामगार मिळणेबाबत विचारणा केली . त्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. कारखाना सुरू होवुन सिझन बंद झाला .
Read more >>
उसतोड कामगार 5 लाख 5 हजार रुपयांत देण्याचे ठरवले होते —-
तरी वेळोवळी उसतोड कामगारांची मागणी करूनही त्यांना रोवे मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांनी उसतोड कामगार दिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांनी आपल्याकडुन 5 लाघ 5 हजार रुपये इतके पैसे घेवून आपल्याला उसतोड कामगार पुरवले नाहीत. आपली फसवणूक केली गेली आहे.
फिर्यादी –
वैभव राघू पाठक ,
वय – 35 वर्ष ,राहणार – कुकडी कॉलनी ,पराग कारखाना , रावडेवाडी तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे.
आरोपी –
1) रवी मूलचंद पवार
2) अविनाश मूलचंद पवार,
दोन्ही राहणार- हनुमान खेडा ,तालुका – चाळीसगाव , जिल्हा – जळगाव.
म्हणून त्यांनी त्यांचेकडे घेतलेले 5,05,000/रूपये (पाच लाख पाच हजार) रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांचेकडे वेळोवेळी मागितले. परंतू ते त्यांना उडवा उडवीची देत राहिले . म्हणून फिर्यादी वैभव पाठक यांनी रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांच्या विरुदध फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन ला दिली आहे.
आरोपींवर दाखल कलमे —
भारतीय न्याय संहिता कायदा कलम 420 , 34
त्यांना ‘उसतोडीसाठी उसकामगार पुरवतो ‘ असा विश्वास देवुन त्यांच्याकडुन बँक अकाउंट, फोन पे व्दारे तसेच रोख स्वरूपात एकुण 5,05,000/रुपये (पाच लाख पाच हजार) रक्कम घेतली. पण त्यांना उसतोड कामगार पुरविले नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे वेळोवळी त्यांची वरील रक्कम मागीतली .पण ती रक्कम त्यानी आज रोजी पर्यंत दिली नाही. तर त्यांना उडवा उडवीची उत्तरे दवून त्यांची विश्वासघाताने आर्थिक फसवणुक केली आहे. म्हणुन त्यांच्यावर कायदेशिर गुन्हा दाखल होवून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
Read more >>
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !

आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 420 , 34 नुसार शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर पोलीस स्टेशन मधे दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे आहेत.पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत.
प्रभारी आधिकारी पोलीस निरिक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
1 thought on “उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.”