
Contents
कारला धडक : दगड व हाताने मारहाण ! एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल !
कारला धडक दिली म्हणून मारहाणीची घटना मलठण येथे !
शिरुर,दिनांक- 2 (जानेवारी 2025 : सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for Images in this content )

कारला धडक बसली म्हणून दगड व हाताने मारहाण करण्याची घटना घडली आहे. एका इसमाविरुद्ध गुन्हा शिरुर पोलीस स्टेशन मधे दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील मलठण दि.31/01/2025 रोजी सकाळी 09.00 वाजता मलठण येथे शिव हनुमान कीराणा दुकानासमोर रोडवर घडली आहे.’कारला धडक’
फिर्यादी –
योगेश मनोहर दंडवते, वय-29 वर्ष ,व्यवसाय- किराणा दुकान ,राहणार- मलठण ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे.
कारला धडक बसली —
फिर्यादी योगेश मनोहर दंडवते, वय-29 वर्ष, व्यवसाय-किराणा दुकान, राहणार- मलठण, तालुका – शिरुर ,जिल्हा-पुणे
यांनी शिरुर पोलीस स्टेशन मधे याबाबत
फिर्याद दिली आहे. ती अशी की दिनांक 31/01/2025 रोजी सकाळी 09.00 वाजण्याचा सुमारास ते त्यांची टोयटा ग्लान्झा कंपनीची कार क. एम एच.12 व्ही एन 3999 ही मलठण येथे शिव हनुमान किराणा दुकानासमोररून रोडवरून काढत होते. ती रिव्हर्स घेत असताना त्यांच्या ओळखीचे बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे ,दोन्ही राहणार- दत्तनगर, मलठण ,तालुका – शिरूर,जिल्हा -पुणे यांनी संगनमत करून त्यांच्या कडील मोटार सायकल ने पाठीमागुन कारला धडक दिली.
कारला धडक दिली म्हणून मारहाण –
या कारणावरून फिर्यादी बाळु भिमाजी बरकडे यांने त्यांना दगड फेकुन मारला. शिवीगाळ केली. तर सावळेराम भिमाजी बरकडे यांने त्यांना हाताने माराहान केली. शिवीगाळ करून दमदाटी केली.
Read more >>
मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ ; 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन झाले लंपास !
आरोपी –
1) बाळु भिमाजी बरकडे 2) सावळेराम भिमाजी बरकडे ,
दोन्ही राहणार- दत्तनगर, मलठण, तालुका – शिरुर,जिल्हा – पुणे.
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

म्हणुन फिर्यादीने या दोघांविरूदध शिरुर पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखलआहे. शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 74/2025 आहे.आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 125(A)115(2)352,351(2)(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. पवार हे आहेत.पुढील तपास पोलिस हवालदार श्री. वारे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलि,स निरीक्षक श्री.संदेश केंजळे,शिरूर पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.