
Contents
- 1 Braking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
- 1.1 Breaking News ब्रेकींग न्युज : वेगवेगळ्या जिल्हयांत करत होता चोर्या ; शिरुर पोलिसांनी अखेर पकडला !
- 1.1.1 शिरुर, दिनांक – 8 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 Breaking News ब्रेकींग न्युज हाती !
- 1.1.3 पोलिस आधीच्या मोटर सायकल चोरींचा तपास करत होते….
- 1.1.4 पोलीसांना मिळाली गोपनीय माहिती –
- 1.1.5 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत —
- 1.1.6 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
- 1.1.7 आरोपीला 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी —
- 1.1.8 कारवाईत वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग —–
- 1.1.9 About The Author
- 1.1 Breaking News ब्रेकींग न्युज : वेगवेगळ्या जिल्हयांत करत होता चोर्या ; शिरुर पोलिसांनी अखेर पकडला !
Braking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
Breaking News ब्रेकींग न्युज : वेगवेगळ्या जिल्हयांत करत होता चोर्या ; शिरुर पोलिसांनी अखेर पकडला !
शिरुर, दिनांक – 8 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

Breaking News ब्रेकींग न्युज शिरुर व अनेक जिल्ह्यांसाठी आली आहे. 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. हा वेगवेगळ्या जिल्हयांत चोर्या करत होता. शिरुर पोलिसांनी अखेर या मोटरसायकल चोरास बेड्या ठोकल्या आहेत.
Read more >>
बलात्कार करणार्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड !
शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !
Breaking News ब्रेकींग न्युज हाती !
आज ताजी बातमी हाती येत आहे. ती अशी की
मोटर सायकल चोरी करणारा एक सराईत गुन्हेगार शिरुर पोलीसांनी पकडला आहे. त्याचे एकुण 11मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. एकूण 6 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकल शिरूर पोलिसांनी या गुन्हेगाराकडुन हस्तगत केल्या आहेत.शिरूर पोलिस शोध पथकाची ही मोठी सफलता मानली जात आहे .
पोलिस आधीच्या मोटर सायकल चोरींचा तपास करत होते….

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या काही काळात झालेल्या मोटरसायकल चोर्या उघडकीस आणण्याच्या दृष्टीने शिरूर पोलीस स्टेशन मधील वेगवेगळी तपास काम करत होती. ही पथके वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती.शि रुर पोलीस स्टेशन हे गुन्हा रजिस्टर नंबर 39 / 2025 ; भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 ( 2) व इतर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकल शोधण्याचे काम करत होते.
पोलीसांना मिळाली गोपनीय माहिती –

शिरुर पोलिसांमधील विजय शिंदे व निलेश थोरात यांना गोपनीय व तांत्रिक माहिती मिळाली. तिच्या आधाराने संतोष उर्फ शरद गजानन इंगोले ,राहणार -पांगरी कुटे, तालुका- मालेगाव, जिल्हा -वाशिम हा मोटरसायकल चोरी मध्ये सहभागी असल्याची खात्री झाली.त्यानंतर या आरोपीला मालेगाव, जिल्हा- वाशिम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसुन चौकशी करण्यात आली.
Read more >>
या आरोपीकडून मालेगाव, जिल्हा -वाशिम येथून 9 हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ,
1. हिरो कंपनीची पॅशन ग्रे मोटरसायकल ,
2.धाड पोलिस स्टेशन ,जिल्हा- बुलढाणा 1,
3. चाकण पोलीस स्टेशन 1,
4. भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन 1,
5. लोणीकंद पोलीस स्टेशन 1, 6. खडकी पोलीस स्टेशन 1,
6. आळंदी पोलीस स्टेशन 1,
7. महाळुंगे पोलीस स्टेशन 1 ,
8. दिघी पोलीस स्टेशन 1
9. इतर 1
असे एकूण 11 गुन्हे याने केल्याचे आढळुन आले आहेत.
6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत —
एकूण 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाला आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपी विरोधात
1. जणू का पोलीस स्टेशन, जिल्हा- वाशिम,
2. मालेगाव पोलीस स्टेशन ,जिल्हा- वाशिम, 3.पातुर पोलीस स्टेशन, जिल्हा -अकोला ,
4.जामनेर पोलीस स्टेशन ,जिल्हा- जळगाव ,
5.लोणार पोलीस स्टेशन -जिल्हा बुलढाणा,
6.मेहकर पोलीस स्टेशन, जिल्हा -बुलढाणा येथे चोरी संदर्भात एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
अशी माहिती प्राथमिक तपासात स्पष्ट झाली आहे .
Read more >>
शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण ! आज व पत्नीस शिवीगाळ !
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
या गुन्ह्यातील आरोपी संतोष उर्फ शरद गजानन इंगोले ,राहणार- पांगरी, कुटे, तालुका -मालेगाव, जिल्हा – वाशिम याच्यावर शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 39/ 2025 असा आहे. तर भारतीय संहिता कायदा कलम 303 नुसार याला गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.दि
आरोपीला 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी —
नांक 7 फेब्रुवारी रोजी माननीय न्यायालयात आरोपीला हजर केले गेले. त्याला न्यायालयाने दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत 9 आरोपीला पोलिस कस्टडी आदेश दिलेला आहे .
कारवाईत वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग —–
या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक ,पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक ,पुणे विभाग रमेश चोपडे ,उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर उपविभाग प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शेळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथ साहेब जगताप ,विशाल कोथळकर, विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील ,सचिन भोई ,निखिल रावडे, रवींद्र आव्हाड या पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
1 thought on “Breaking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !”