
Contents
- 1 Nandgaon नांदगाव दर्शन अनिल आहेर यांची
कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदी निवड !
- 1.1 Nandgaon नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे राजकिय केंद्र!
- 1.1.1 शिरुर, दिनांक – 10 फेब्रुवारी , 2025 : ( सत्य शोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 Nandgaon नांदगाव आणि आहेर घराणे—
- 1.1.3 Nandgaon आहेर घराण्याचा प्रभाव —
- 1.1.4 Nandgaon कृषी उत्पन्न बाजार समिती —
- 1.1.5 वर्तमान राजकारणाशी Nandgaon करांनी जुळवुन घेतले !
- 1.1.6 Nandgaon च्या विद्यमान आमदारांनी दिला पाठिंबा —-
- 1.1.7 About The Author
- 1.1 Nandgaon नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे राजकिय केंद्र!
Nandgaon नांदगाव दर्शन अनिल आहेर यांची
कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदी निवड !
Nandgaon नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे राजकिय केंद्र!
शिरुर, दिनांक – 10 फेब्रुवारी , 2025 : ( सत्य
शोधक न्युज रिपोर्ट )
Nandgaon नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे तालुक्यात ‘आहेर’ हे घराणे प्रभावी घराणे आहे. Nandgaon नांदगाव तालुक्याच्याच नाही.तर जिल्ह्यात ‘आहेर घराण्याचा’ राजकारणावर प्रभाव आहे. डॉ.आहेर हे याच घराण्यातुन पुर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राहिलेले आहेत.
Nandgaon नांदगाव आणि आहेर घराणे—
अशा या घराण्यातील चौथ्या पिढीचे शिलेदार दर्शन आहेर यांची नुकतीच नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झालेली आहे.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत.
Read more >>
Nandgaon आहेर घराण्याचा प्रभाव —
श्री.दर्शन आहेर यांचे पणजोबा शिवराम वेडुजी आहेर, आजोबा गंगाधर शिवराम आहेर, अनिलकुमार गंगाधर आहेर यांच्यानंतर राजकारणातील महत्वाच्या पदावर दर्शन अनिल आहेर यांची निवड झाली आहे. म्हणतात ना ‘माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही’ तसे दर्शन आहेर यांचे झाले आहे. त्यांना मोठा राजकीय वारसा असल्याने तेही संघर्षाच्या या कठिण वाटेवर वाटचाल करण्यास सज्ज झाले आहेत . याबाबत कोणताही संदेह नाही.असे बोलले जात आहे. म्हणूनच योग्यवेळी योग्य ठिकाणी त्यांची सार्थ निवड झाली आहे.
Nandgaon कृषी उत्पन्न बाजार समिती —

या घराण्यातील शिवराम वेडुजी आहेर यांनी नाशिक जिल्हा लोकल बोर्डचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पाठोपाठ गंगाधर शिवराम आहेर यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. नांदगाव Nandgaon पंचायत समितीचे ते सभापती ही राहिले आहेत. अनिल गंगाधर आहेर यांनी मात्र आपल्या राजकीय वारश्याला मोठी झळाळी प्राप्त करून दिली. ग्रामपंचायत ते विधिमंडळ असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचाही मान त्यांना मिळाला आहे. एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांनी आपल्या नाव लौकिकात भर घातली आहे.
Read more >>
शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले !
वर्तमान राजकारणाशी Nandgaon करांनी जुळवुन घेतले !
अलिकडे राजकारण अधिक गतिमान झाले आहे.गुंतागुंतीचे झाले आहेत.अनेक कांगोरे वर्तमान राजकारणाला प्राप्त झाले आहेत.संदर्भ बदलले आहेत.कितीतरी संदर्भ आज काहीसे कालबाह्य ठरत आहेत. काळाप्रमाणे झालेले बदल स्विकारत भारतीय जनता वाटचाल करत आलेली आहे.
ए आय Artificial Intelligence च्या आजच्या या डिजिटल युगात सारंच गतिमान झालं आहे. बदल स्वीकारला नाहीतर नोकिया फोनसारखी गत होते. अशीही काहीशी अवस्था झाली आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नव्हती. अनेक जणांनी तो बदल स्वीकारला. पुढच्या पिढीची योग्य मार्गाने वाटचाल होणे लोकशाहीत अपेक्षित आहे. या दृष्टिकोणातून ‘संपूर्ण यू टर्न’ घेण्याऐवजी आवश्यक तेव्हडा बदल समाजाने स्वीकारला.
Read more >>
‘गावातील रहस्यमय सावली’ : एक हॉरर कथा !
Nandgaon च्या विद्यमान आमदारांनी दिला पाठिंबा —-
यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांची खुलेपणाने पाठराखण युवा नेतृत्व दर्शन आहेर यांनी केली. त्याचेच फळ म्हणून आज Nandgaon नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. राजकारणात ‘दिलेला शब्द’ आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पाळला आहे. हे राजकीय सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
राजकारण आणि व्यक्तिगत संबंध यात त्यांनी गफलत होऊ दिलेली नाही. आहेर घराण्याशी कौटुंबिक नाते कायम ठेवले आहे. ते आजही कायम आहे. म्हणून दर्शन आहेर यांची सभापतीपदी निवड झाली. याचा विशेष आनंद आहे.
दर्शन आहेर यांची सभापतीपदी निवडीसाठी विशेष योगदान देणाऱ्या आमदार सुहास अण्णा कांदे व जेष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब कवडे यांनाही धन्यवाद दिले गेले आहेत.